Maharashtra Breaking News
06 Sep 2025 11:33 AM (IST)
सोलापूरच्या माढा तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा गाजत आहे. अवैध मुरूम उत्खनन प्रकरणात चर्चेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबा जगताप यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या धक्कादायक व्हिडिओमध्ये बाबा जगताप आपल्या कार्यालयात बसून अंमली पदार्थांचे सेवन करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ प्रसारित होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून, या घटनेमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे
06 Sep 2025 11:31 AM (IST)
मुंबईतील लालबाग परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध मार्गावर शनिवारी पहाटेच्या सुमारास २ वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू झाला, तर ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. अज्ञात व्यक्ती भरधाव वाहनाने विरुद्ध दिशेने येत झोपलेल्या मुलांना धडक दिली. या भीषण धडकेत चिमुकली रक्तबंबाळ अवस्थेत जागीच ठार झाली, तर गंभीर जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
06 Sep 2025 10:59 AM (IST)
पुण्यात एकीकडे गणपती विसर्जनाची मिरवणुकीची धामधूम सुरू असताना नाना पेठेत टोळी युद्धाचा भडका उडाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या वर्षी १ सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक व आंदेकर टोळीचा आधारस्तंभ वनराज आंदेकर याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष गणेश कोमकर (Ayush Komkar) याची शुक्रवारी(05 सप्टेंबर) रात्री सुमारे पावणेआठच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
06 Sep 2025 10:56 AM (IST)
लोकप्रिय ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने आगामी सेलची घोषणा केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी दोन्ही प्लॅटफॉर्मवर सेल सुरु होणार आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही कंपन्यांनी आगामी फेस्टिवल सेलची घोषणा केली आहे. तसेच या आगामी सेलमधील ऑफर्स आणि डिस्काऊंटबद्दल देखील माहिती समोर आली आहे...सविस्तर वाचा
06 Sep 2025 10:44 AM (IST)
तुम्ही देखील पॉपुलर बॅटलरॉयल गेम बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) प्लेअर आहात का? मग नक्कीच तुम्ही गेममधील आगामी अपडेटची वाट बघत असणार… सर्व बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया प्लेअर्सससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेमच्या आगामी अपडेटची तारीख आता समोर आली आहे. येत्या काहीच दिवसांत म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी BGMI 4.0 Update रिलीज केलं जाणार आहे. आगामी अपडेट BGMI यूजर्सचा गेमिंग एक्सपीरियंस पूर्णपणे बदलणार आहे. आगामी अपडेटमध्ये कंपनीने अनेक बदल केले आहेत. सविस्तर वाचा...
06 Sep 2025 10:32 AM (IST)
जगदीशाने कशाप्रकारे दिलीप ट्रॉफीच्या उपांत्य सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कशी कामगिरी केली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या. शुक्रवारी दुलीप करंडक उपांत्य सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण विभागाने पहिल्या डावात उत्तर विभागाविरुद्ध ५३६ धावा केल्या. दक्षिण विभागाने ३ बाद २९७ धावांवरून खेळ सुरू केल्यानंतर, संपूर्ण दिवस (८८.२ षटकांत) फलंदाजी केली परंतु उर्वरित विकेट गमावून फक्त २३९ धावा केल्या. बातमी सविस्तर वाचा...
06 Sep 2025 10:26 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरीस न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या (UNGA) अधिवेशनात सहभागी होणार नाहीत. त्यांच्या जागी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताचे प्रतिनिधित्व करतील. पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सहभागी न होण्याचा निर्णय अशा वेळी घेतला आहे जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर दंड ठोठावला आहे, त्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे.
06 Sep 2025 10:19 AM (IST)
आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकरचा 18 वर्षीय मुलगा आयुष कोमकर याला आंदेकर टोळीने टार्गेट करून हत्या केली. या हत्येनंतर पुणे पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. पोलिसांनी गुन्हेगारांना थेट इशारा देत म्हण्टक आहे की, चुकीला माफी नाही. प्रत्येक गोष्ट करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा.
06 Sep 2025 10:10 AM (IST)
सध्या अमेरिकेत यूएस ओपन २०२५ जोरात सुरू आहे. ६ सप्टेंबर रोजी सकाळी लवकर खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कार्लोस अल्काराजने शानदार कामगिरी केली. त्याच्या फिटनेस आणि शानदार खेळाच्या जोरावर त्याने अनुभवी नोवाक जोकोविचला पराभूत करून यूएस ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आर्थर अॅश स्टेडियमवर २ तास २३ मिनिटे चाललेला हा सामना अल्काराजने २४ वेळा ग्रँड स्लॅम विजेता जोकोविचचा ६-४, ७-६ (४), ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
06 Sep 2025 09:57 AM (IST)
चिनी कंपनी शाओमीचा लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड Redmi ने एक नवीन बजेट डिव्हाईस लाँच केले आहे. हा नवीन बजेट स्मार्टफोन सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा नवीन बजेट स्मार्टफोन Redmi 15C 4G या नावाने लाँच केला आहे. कंपनीने हे डिव्हाईस निवडक बाजारात लाँच केला आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनीने लाँच केलेले नवीन डिव्हाईस Redmi 14C चे अपग्रेड मॉडेल आहे. कंपनीने हे डिव्हाईस 2024 मध्ये लाँच केले होते.
06 Sep 2025 09:50 AM (IST)
मुंबई : ठाण्यातील भिवंडीत एका कारखान्याला भीषण आग लागली. कामतघर परिसरात असलेल्या बालाजी डाईंग फॅक्टरीत ही आग लागल्याची माहिती दिली जात आहे. ज्या इमारतीत आग लागली ती इमारत दोन मजली इमारत असून, ती आगीच्या भक्ष्यस्थानी होती. कारखान्यात ठेवलेल्या कपड्यांमुळे आग वेगाने पसरली आणि आजूबाजूच्या मजल्यांनाही वेढले. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल असून, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु करण्यात आले. त्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली.
06 Sep 2025 09:43 AM (IST)
आणखी एकदा रोहितचे कौतुक करण्यासारखा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शर्माच्या स्वभावाचे कौतुक करताना प्रत्येकजण कधीही थकत नाही. आता त्याने पुन्हा एकदा असे काही केले आहे ज्याने मन जिंकले आहे. रोहितने हात जोडून चाहत्यांना शांत केले आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्रत्येकजण रोहितचे कौतुक करत आहे.
06 Sep 2025 09:33 AM (IST)
मीरा भाईंदर : वसई विरार पोलिसांनी ड्रग्स फॅक्टरीचा भांडाफोड करण्यात आला आहे. पोलिसांनी हैदराबाद येथील ड्रग्स फॅक्टरीवर धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. मीरा रोडमधील एमडी ड्रग्सच्या एका प्रकरणात तपास सुरू असताना हैदराबाद कनेक्शन सामोर आले. दरम्यान, मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिटने १४ पोलिसांना सोबत घेऊन हैदराबाद येथे छापेमारी केली आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्स किंमत 5000 कोटी असल्याची माहिती मिळाली आहे. ही कारवाई शुक्रवारी (5 सप्टेंबर 2025) ला करण्यात आली.
06 Sep 2025 09:23 AM (IST)
भारतात आज सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर काल म्हणजेच 5 सप्टेंबर 2025 रोजी देशभरात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली होती. जीएसटी कौन्सिलची 56 वी बैठक संपल्यानंतर सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र आज पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीनी मोठा टप्पा पार केला आहे.
06 Sep 2025 09:20 AM (IST)
Novak Djokovic vs Carlos Alcaraz : सध्या अमेरिकेत यूएस ओपन २०२५ जोरात सुरू आहे. ६ सप्टेंबर रोजी सकाळी लवकर खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कार्लोस अल्काराजने शानदार कामगिरी केली. त्याच्या फिटनेस आणि शानदार खेळाच्या जोरावर त्याने अनुभवी नोवाक जोकोविचला पराभूत करून यूएस ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आर्थर अॅश स्टेडियमवर २ तास २३ मिनिटे चाललेला हा सामना अल्काराजने २४ वेळा ग्रँड स्लॅम विजेता जोकोविचचा ६-४, ७-६ (४), ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
06 Sep 2025 09:13 AM (IST)
आज बिग बॉस 19 दुसरा वीकेंडचा वार होणार आहे. सलमान खान कोणाला खडसावणार त्याचबरोबर कोणाचं कौतुक करणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. झालेल्या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांनी धुमाकूळ घातला. फरहाना आणि अभिषेक बजाज यांच्यात जोरदार वाद पाहायला मिळाला. मागील आठवड्यामध्ये कोणत्याही सदस्याला घराबाहेर काढण्यात आले होते या आठवड्यात पुन्हा पाच सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहे. सलमान खानचा नवा एक प्रमुख सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे यामध्ये तो आता घरातला सदस्यांना ओरडताना दिसत आहे.
06 Sep 2025 09:03 AM (IST)
मुंबई : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ या जयघोषात शनिवारी लाडक्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. अनंत चतुर्दशीला गणराय पुन्हा त्यांच्या घरी जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. घरोघरी लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची तयारी सुरू झाली असून, सार्वजनिक मंडळांसह यंत्रणा सज्ज आहे. बाप्पाचे विसर्जन करताना मन अतिशय निराश होते, पण परंपरेनुसार दरवर्षी बाप्पाला थाटामाटात निरोप देऊन पुढच्या वर्षी परत येण्याची विनंती केली जाते.
06 Sep 2025 08:55 AM (IST)
यंदा गणपती बाप्पाला निरोप देताना पावसाची (Mumbai Rain) हजेरी लागण्याची शक्यता आहे. कालपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू असून आज पहाटेपासूनही संततधार कोसळत आहे. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केल्याने पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे प्रणाली हळूहळू वायव्य दिशेकडे सरकत असून त्याची तीव्रता वाढत आहे. सध्या समुद्रसपाटीपासून तब्बल ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शनिवारी मुंबईत कालप्रमाणेच पावसाचा जोर कायम राहील. दक्षिण मुंबईत रिमझिम सरी तर उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. शुक्रवारप्रमाणे शनिवारीही पावसाळी वातावरण कायम राहील. मात्र, सोमवारनंतर पाऊस उघडीप देईल, असा अंदाज आहे. त्यामुळे गणपती विसर्जन मिरवणुकीत पावसाची हजेरी एकीकडे नाचणाऱ्यांचा उत्साह दुणावणारी ठरेल. परंतु सततचा पाऊस सुरू राहिल्यास मूर्ती झाकून न्याव्या लागतील आणि मिरवणुकीचा वेगही मंदावण्याची शक्यता आहे.
06 Sep 2025 08:45 AM (IST)
Pune News : अनंत चतुर्दशीच्या तयारीदरम्यान पुण्यात गँगवॉरची धक्कादायक घटना घडली आहे. नाना पेठ परिसरात एका तरुणावर गोळ्या झाडण्यात आल्या असून, या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला आहे.ही घटना एका वर्षापूर्वी झालेल्या नगरसेवक खुनाच्या प्रकरणाशी संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हल्लेखोरांनी तरुणावर तब्बल तीन गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. मृत तरुणाची ओळख गोविंद कोमकर अशी झाली असून, तो गणेश कोमकर यांचा मुलगा आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
06 Sep 2025 08:40 AM (IST)
IND vs PAK Asia Cup 2025 : आशिया कप क्रिकेट स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरुवात होत आहे. यंदाही भारत–पाकिस्तान संघ आमनेसामने येणार असून, हा हाय-वोल्टेज सामना 14 सप्टेंबर रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर या सामन्याबाबत अनेक शंका उपस्थित होत होत्या. मात्र बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. भारत–पाकिस्तान सामन्यासंदर्भात बीसीसीआय केंद्र सरकारच्या धोरणाचे पूर्ण पालन करते आणि त्यात कोणतीही अडचण नाही, असही त्यांनी सांगितलं आहे.
06 Sep 2025 08:32 AM (IST)
पुणे शहरातील यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. यंदा मिरवणुकीची सुरुवात नेहमीपेक्षा एक तास लवकर, म्हणजेच शनिवारी (दि. ६) सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. मागील वर्षी ही मिरवणूक सकाळी साडेदहा वाजता सुरू झाली होती.यासंदर्भातील माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मानाच्या गणेश मंडळांनीही या नियोजनास सहमती दर्शवली असून, मिरवणूक वेळेत पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
मानाचा पहिला कसबा गणपती सकाळी ९.३० वाजता टिळक पुतळा, मंडई येथे आगमन करून बेलबाग चौकाकडे मार्गस्थ होईल. त्यानंतर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती सकाळी १०.३० वाजता, मानाचा तिसरा गुरुजी तालिम गणपती सकाळी ११ वाजता, तर मानाचे चौथा तुळशीबाग गणपती व पाचवा केसरीवाडा गणपती दुपारी १२ वाजेपर्यंत बेलबाग चौक पार करून पुढे जातील.याप्रमाणे दुपारपर्यंत सर्व मानाचे गणपती लक्ष्मी रोडवर मार्गस्थ होतील, असे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.
Marathi Breaking news live update: अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत श्री गणरायाचे विसर्जन आज होणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील गिरगाव चौपाटीसह विविध ठिकाणी हजारो सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन (Ganesh Immersion 2025) पार पडणार आहे. यंदा प्रथमच गणेश विसर्जन सोहळ्याच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांकडून एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. शहरातील सुमारे ६५०० सार्वजनिक मंडळे आणि दीड लाख गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका आज निघणार आहेत.
विसर्जन मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात असून गर्दीच्या भागांत १० हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले आहेत. तसेच ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनही मिरवणुकीवर लक्ष ठेवले जाईल. लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी यांच्या विसर्जन मिरवणुका नेहमीप्रमाणेच विशेष आकर्षण ठरणार आहेत.