Maharashtra Breaking News
05 Sep 2025 12:05 PM (IST)
ओणम हा केरळमधील प्रमुख सण असून, तो राजा महाबलीच्या वार्षिक परत येण्याच्या निमित्ताने साजरा केला जातो. या दिवशी लोक घरे सजवतात, पारंपरिक नृत्य-गाणी करतात, खेळ खेळतात आणि खासकरून नौका शर्यती व बैलांच्या शर्यतींचे आयोजन केले जाते. हा सण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि पीक कापणीच्या हंगामात येतो. देशभरामध्ये ओमण सणाचा मोठा उत्साह दिसून येत आहे.
05 Sep 2025 12:00 PM (IST)
: पाकिस्तानकडून येणाऱ्या पुराच्या पाण्याने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली आणि भारतीय बाजूच्या तटबंदीचे नुकसान झाल्यामुळे पंजाबमधील फिरोजपूर भारत-पाकिस्तान सीमेवरील अनेक किलोमीटर लांबीचे कुंपण पाण्याखाली गेले आहे.
#WATCH | Ferozepur, Punjab: Several kilometers of fencing on the India-Pakistan border submerged, as flood water coming from Pakistan crossed the International Border and damaged the embankment on the Indian side. pic.twitter.com/90ia1wlw4M
— ANI (@ANI) September 5, 2025
05 Sep 2025 11:50 AM (IST)
भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे हे भारत दौऱ्यावर आले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये ते आले आहेत. शेरिंग तोबगे आणि त्यांची पत्नी ओम ताशी डोमा अयोध्येत दाखल झाले आहेत.
#WATCH | Uttar Pradesh: Bhutan PM Tshering Tobgay and his spouse Aum Tashi Doma arrive in Ayodhya. pic.twitter.com/B7P15EYfxr
— ANI (@ANI) September 5, 2025
05 Sep 2025 11:40 AM (IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतो आहे. यामध्ये अजित पवार हे एका महिला अधिकाऱ्यांंवर भडकले आहेत. बेकायदेशीर खडी उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांवर अजित पवार कारवाई थांबवण्यासाठी दबाव आणत असल्याचे दिसून येत आहे.
05 Sep 2025 11:30 AM (IST)
नेहमी शिक्षकाच्या भूमिकेमध्ये राहिलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिन. राधाकृष्णन यांनी देशाचे राजदूत, उप-राष्ट्रपती, राष्ट्रपती अशी पदं भूषवली. परदेशामध्ये शिक्षण घेत असताना ते अध्यापकप्रिय विद्यार्थी होते आणि पुढे शिक्षक झाल्यावर ते विद्यार्थीप्रिय अध्यापक बनले. वयाच्या केवळी विसाव्या वर्षी म्हणजेच 1908 साली इथिक्स ऑफ वेदान्त अॅंड मेटाफिजिक्स प्रसपोजिशन या विषयावर थिसिस लिहिला.आज त्यांचा वाढदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
05 Sep 2025 11:20 AM (IST)
जीएसटी सेक्शनमध्ये बदल करण्यात आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "स्वतंत्र भारतात घेतला गेला हा आजवरचा सर्वात मोठा निर्णय आहे. जीएसटी ही आता अधिक सोपी कररचना बनली आहे. जीएसटी परिषदेने घेतलेले निर्णय म्हणजे दिवाळी आधीचा डबल धमाका आहे." अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे.
05 Sep 2025 11:10 AM (IST)
मुंबईतील लालबागच्या दर्शनाच्या रांगामध्ये एक सामान्य माणसांसाठी तर व्हीआयपी लोकांसाठी वेगवेगळी रांग करण्यात येते. मात्र सामान्य लोक तासनतास रांगेमध्ये उभे असल्यामुळे मानवधिकार आयोगाने नोटीस बजावली होती. मात्र त्यानंतर देखील व्हीआयपी दर्शन रांग सुरु आहे.
05 Sep 2025 10:58 AM (IST)
अनंत चतुर्थीनिमित्त उद्या (६ सप्टेंबर) ११ दिवसांच्या शहरातील गणपतींचे विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे, बँड, ढोल-ताशांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, या प्रचंड आवाजामुळे काहींना गंभीर त्रास सहन करावा लागतो. कान, हृदय यांसारख्या आजारांनी ग्रस्त व्यक्तींना कायमचे अंपगत्व येण्याची किंवा जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे यंदा मिरवणुकांदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी महत्त्वाचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
05 Sep 2025 10:51 AM (IST)
४१ वर्षीय टेलरने सोशल मीडियावर सामोआच्या जर्सीसह एक फोटो शेअर करून ही माहिती दिली. त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये निवृत्तीनंतर बाहेर येत आहे. त्याने निवृतीतून मागे परतल्यानंतर आता तो यावेळी त्याच्या आईच्या देशाकडून खेळेल. ४१ वर्षीय टेलर पुढील महिन्यात ओमानमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक पात्रता स्पर्धेत सहभागी होणार आहे.
05 Sep 2025 10:05 AM (IST)
दुसऱ्या आठवड्यात बिग बॉस १९ च्या घरातून बाहेर काढण्यासाठी नामांकित झालेल्या पाच स्पर्धकांमध्ये तान्या मित्तल, कुनिका सदानंद, मृदुल तिवारी, आवाज दरबार आणि अमाल मलिक यांचा समावेश आहे. हे पाचही स्पर्धक खूप मजबूत आहेत, एकीकडे आवाज दरबार आणि मृदुल, तान्या यांचे चाहते खूप चांगले आहेत, तर दुसरीकडे कुनिका आणि अमाल यांचा घरात चांगला खेळ आहे.
05 Sep 2025 09:50 AM (IST)
बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उपाध्यक्ष नारायण शिंदे यांच्यावर एका शिक्षक महिलेनं लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नारायण शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिला शिक्षिकेने, पुण्यात फ्लॅट घेऊन देतो असे सांगून आरोपी शिंदे यांनी तिची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप पोलिसांच्या तक्रारीत केला आहे.तसेच या प्रकरणात तक्रार दाखल करू नये, यासाठी शिंदे यांनी तिला जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे नमूद केले आहे.
05 Sep 2025 09:45 AM (IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिस्त आणि कामातील वक्तशीरपणा अनेकांनी पाहिला असेल. कधी कठोर तर कधी सौम्य अशी त्यांची ओळख आहे. मात्र, सोलापुरात घडलेल्या एका प्रकारानंतर अजित पवार चांगलेच संतप्त झाले. इतकेच नाहीतर त्यांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला दमदाटीच केली. याबाबतचा व्हिडिओही आता व्हायरल होत आहे. करमाळ्याच्या महिला आयपीएस अधिकारी डीएसपी अंजली कृष्णा या माढा तालुक्यातील कुई गावात रस्ता बांधकामासाठी बेकायदेशीर खडी उत्खनन केल्याच्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी आल्या होत्या. यादरम्यान, गावकरी आणि अधिकाऱ्यामध्ये वाद झाला.
05 Sep 2025 09:20 AM (IST)
या पावसाळ्यात पंजाबात मोठी आपत्ती ओढावली आहे. भयानक पुरामुळे राज्यातील १००० हून अधिक गावे पाण्याखाली गेली असून सुमारे १.७१ लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आतापर्यंत या पुरात ४३ जणांचा बळी गेला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. चौहान यांनी सांगितले की, केंद्र सरकार पीडितांसोबत असून त्यांना सर्वतोपरी मदत दिली जाईल. दरम्यान, भाक्रा धरणातील पाण्याची पातळी कमाल १६८० फूट क्षमतेपेक्षा अवघी एक फूट कमी आहे. आणखी पाणी सोडले जाण्याची शक्यता लक्षात घेता, रूपनगर जिल्हा प्रशासनाने सखल भागात आणि सतलज नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे.
05 Sep 2025 09:15 AM (IST)
अमेरिकेशी टॅरिफवरून वाद सुरू असतानाच भारताने सिंगापूरसोबत अनेक महत्त्वाचे करार केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांची गुरुवारी (४ सप्टेंबर २०२५) नवी दिल्लीत भेट झाली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये ग्रीन शिपिंग, अवकाश, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक सहकार्यासह पाच महत्त्वाचे करार झाले.यामुळे भारत आणि सिंगापूर आशिया-पॅसिफिक प्रदेशातील राजकारण व अर्थव्यवस्थेला नवी चालना देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "सिंगापूर आमच्या अॅक्ट ईस्ट पॉलिसीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. ही केवळ आर्थिक भागीदारी नाही, तर सामायिक मूल्ये आणि विश्वासावर आधारित खोल मैत्री आहे."
05 Sep 2025 09:10 AM (IST)
सप्टेंबर महिना सुरू होऊन पाच दिवस झाले असले तरी महिलांच्या खात्यात ऑगस्टचे पैसे जमा झालेले नाहीत. यामुळे लाभार्थी महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, याबाबत लवकरच माहिती दिली जाईल, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कोणताही खुलासा झालेला नाही. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळणार का, याविषयी चर्चा सुरू आहेत. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
05 Sep 2025 09:06 AM (IST)
पुण्यात लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बलात्कारानंतर आरोपीने लग्नास नकार दिला. त्यानंतर त्याने तरुणीचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडिओ काढून तिला धमकावत लाखो रुपये उकळल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
05 Sep 2025 08:59 AM (IST)
भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये काही दिवसात आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाला (ICC Women’s Cricket World Cup 2025) सुरुवात होणार आहे. भारतीय महिला संघाने मागील काही मालिकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे आता भारताच्या संघांचे लक्ष्य विश्वचषकावर असणार आहे. भारताच्या महिला संघाची एकदिवसीय विश्वचषकासाठी जोरदार तयारी सुरू आहे. भारताच्या संघाने या स्पर्धेसाठी मागील अनेक सातत्याने सराव केला आहे.
05 Sep 2025 08:57 AM (IST)
दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये तीन सामन्यांचे एक दिवसीय मालिका सुरू आहे. पहिला सामनामध्ये दक्षिण आफ्रिकेचे संघाने विजय मिळवून मालिकेमध्ये आघाडी घेतली होती काल दुसरा सामना पार पडला. इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पुन्हा एकदा इंग्लंडच्या संघाला त्यांच्या घरचा मैदानावर पराभूत करून मालिका नावावर केली आहे. मॅथ्यू ब्रीट्झके आणि स्ट्रिटन स्टॅब्स यांच्या जोडीने संघासाठी कमालीची कामगिरी केली.
Marathi Breaking news live updates: गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजधानी दिल्लीतही मुसळधार पाऊस होत आहे. दिल्लीत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या महापुराचा फटका रेल्वेसेवेलाही बसला आहे. 50 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.