Maharashtra Breaking News
Marathi Breaking news updates – मनोज जरांगे पाटील यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते मुंबईहून थेट संभाजीनगरमध्ये दाखल झाले. मध्यरात्री त्यांच्या आगमनावेळी मराठा समाजाकडून जंगी स्वागत करण्यात आलं. रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने मराठा तरुणांची गर्दी झाली होती. तरुणांकडून फटाके फोडून आणि जल्लोष करून जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात आलं.
डॉक्टर विनोद चावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपोषणामुळे त्यांना प्रचंड थकवा जाणवत असून त्यांची प्रकृती नाजूक आहे. सर्व तपासण्या करण्यात आल्या आहेत. तब्येतीत सुधारणा होण्यासाठी किमान दोन आठवडे लागू शकतात, असं डॉक्टरांनी सांगितलं.
03 Sep 2025 07:20 PM (IST)
IMD Heavy Rain Alert: भारतीय हवामान विज्ञान विभागाने (IMD) उत्तर-पश्चिम भारतासह देशाच्या अनेक भागांमध्ये पुढील सात दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मान्सूनच्या वाढलेल्या सक्रियतेमुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यामुळे पूर, भूस्खलन आणि पाणी साचण्याचा धोका वाढला आहे.
03 Sep 2025 06:58 PM (IST)
Jalna Violence: महाराष्ट्राच्या जालना शहरात तणाव वाढला आहे. जालन्यात एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहरात एक तणाव वाढला आहे. एक व्यक्ती एका व्हिडिओत गाईची कत्तल करत असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती गाईची कत्तल करताना दिसून येत आहे. त्यामुळे जालन्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
03 Sep 2025 06:16 PM (IST)
Maratha Reservation: मराठा आरक्षणसाठी जीआर काढल्यावर आता ओबीसी समाज देखील आक्रमक झाले आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र त्यानंतर आता ओबीसी समाज देखील आक्रमक झाले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.
03 Sep 2025 06:07 PM (IST)
‘आई, मला घरी जायचे आहे’.., तुम्हालाही भर रस्त्यावर चांगले कपडे किंवा शाळेचा गणवेश घातलेला रडणारा मुलगा दिसला आहे का? रडणाऱ्या मुलाचे अश्रू पुसण्यापूर्वी आणि लगेच त्याला मदत करण्यासाठी धावण्यापूर्वी काळजी घ्या. कारण गुन्हेगारांनी महिलांसाठी एक नवीन सापळा रचण्यास सुरुवात केली आहे. या सापळ्यात गुन्ह्याचे नवीन शस्त्र म्हणजे निष्पाप मुले, ज्यांचा निष्पाप चेहरा कोणालाही फसवू शकतो.
03 Sep 2025 05:50 PM (IST)
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री सिंपल कौलच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. लग्नाच्या १५ वर्षांनंतर ही अभिनेत्री तिच्या पतीपासून वेगळी होत असल्याची बातमी समोर आली आहे. ‘शरारत’ आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेत्री सिंपल कौल लवकरच घटस्फोट घेणार आहे. अभिनेत्रीने स्वतः या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अभिनेत्रीचे लग्न मोडल्याची बातमी ऐकून चाहत्यांनाही धक्का बसला आहे. सिंपल कौलने २०१० मध्ये राहुल लुम्बाशी लग्न केले होते आणि आता १५ वर्षांनंतर, अभिनेत्री तिच्या पतीला घटस्फोट देत आहे.
03 Sep 2025 05:45 PM (IST)
Maharashtra Government On Maratha Reservation: काल महाराष्ट्र सरकारने जीआर काढत मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. जीआर काढल्यानंतर 5 दिवसांचे आमरण उपोषण जरांगे पाटील यांनी लिंबू पाणी पिऊन सोडले. त्यानंतर या जीआरवरुन ओबीसी समाज देखील आक्रमक झाले आहेत. आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील यावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.
03 Sep 2025 05:29 PM (IST)
मीरा-भाईंदरमध्ये बोगस डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेत आरोपी डॉक्टरांना २४ तासांत अटक करण्याची मागणी केली असून कारवाई न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून नागरिकांनीही या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला आहे. मृतकाच्या कुटुंबासोबत मनसे शहराध्यक्ष संदीप राणे, माजी नगरसेविका शर्मिला बघाजी आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
03 Sep 2025 05:29 PM (IST)
सॅमसंग इंडियाने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, वॉशर ड्रायरची मागणी वाढत आहे. कारण, कुटुंबं आता धुळ आणि जंतूंपासून कपड्यांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात आणि कपडे सुकवण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत करू इच्छितात. विशेषतः जास्त कपडे धुणाऱ्या आणि मर्यादित जागा असलेल्या कुटुंबांमध्ये अशा उपकरणांची जास्त गरज आहे. सॅमसंगची नवीन बिस्पोक एआय वॉशर ड्रायर श्रेणी या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केली आहे, जी ‘इझी, सेव्ह आणि केअर’ या तीन मूल्यांवर आधारित आहे.
03 Sep 2025 05:27 PM (IST)
India vs Pakistan match tickets go on sale : आशिया कप २०२५ या स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा थरार २८ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय १५ सदस्यीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे. भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेत शुभमन गिल उपकर्णधार असणार आहे. या वेळी आशिया कप हा टी२० स्वरूपात खेळला जाणार आहे. या स्पर्धेत आशियातील ८ संघ सहभागी होत आहेत. आशिया कपसाठी, आशियाई क्रिकेट परिषदेकडून सामन्यांसाठी तिकिट बुक करण्यासाठी एक पोर्टल सुरू करण्यात आली आहे.
03 Sep 2025 05:06 PM (IST)
मनोज जरांगे पाटील यांनी तीन महिन्यांपूर्वीच आंदोलनाचा इशारा दिला होता, मग सरकारने त्यावर बैठक का नाही घेतली असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. तसेच मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत सरकार गंभीर नव्हतं का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
03 Sep 2025 05:00 PM (IST)
Lakshman Hake On Maratha Reservation: काल महराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी सोडले आहे. मंत्रिमंडळ उपसमितीने अर्थात राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र आता हा जीआर काढल्यावर ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत.
03 Sep 2025 04:55 PM (IST)
Xi Jinping on Donald Trump: चीनची राजधानी बीजिंगमध्ये दुसऱ्या महायुद्धात जपानच्या पराभवाला 80 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भव्य लष्करी परेडचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी 3 सप्टेंबर रोजी चीन 'विजय दिन' म्हणून हा दिवस साजरा करतो. या दिवशी परेड काढली जाते, ज्याचे राष्ट्रपतींकडून अभिवादन केले जाते आणि जगाला आपली लष्करी ताकद दाखवली जाते.
03 Sep 2025 04:45 PM (IST)
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर मंगळवारी यश मिळाले. मराठा समितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचे सांगत गावातील, नात्यातील आणि कुळातील लोकांची चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र देण्यास मान्यता दिली.
03 Sep 2025 04:38 PM (IST)
मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकारच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी(२ सप्टेंबर) आझाद मैदानावर जरांगे यांची भेट घेतली. यावेळी जरांगे यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन राज्य सरकारच्या शिष्टमंडळाकडून देण्यात आले.
03 Sep 2025 04:25 PM (IST)
मुंबई : रेल्वेमार्गापासून कोसो दूर असलेले बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार असून यामुळे अनेक वर्षापासूनचे बीडवासियांचे रेल्वेसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
03 Sep 2025 04:21 PM (IST)
भारताचा दिग्गज अनुभवी खेळाडू विराट कोहलीकडून नुकतीच त्याची फिटनेस टेस्ट उत्तीर्ण करण्यात आली आहे, परंतु कोहलीची फिटनेस टेस्टवरुण आता भारतीय क्रिकेटमध्ये गोंधळ उडाला आहे. कारण त्याने इतर खेळाडूंप्रमाणे बेंगळुरूमध्ये नाही तर लंडनमध्ये फिटनेस टेस्ट दिली आहे.
03 Sep 2025 04:17 PM (IST)
राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये येत आंदोलन केले. आझाद मैदानावर जरांगे पाटील यांनी पाच दिवसांचे उपोषण केले. यानंतर जरांगे पाटील यांच्या आठ पैकी सहा मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत.
03 Sep 2025 04:00 PM (IST)
रील्स पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंस्टाग्राम लवकरच एक असे फिचर आणत आहे, ज्यामुळे युजर्सना रील्स बंद न करता इतर ॲप्स वापरता येतील. याचाच अर्थ, मेसेज पाठवणे असो किंवा ऑनलाइन शॉपिंग, आता तुम्ही हे सर्व काम रील्स पाहता-पाहता करू शकाल.
03 Sep 2025 03:50 PM (IST)
Maharashtra Cabinet News in Marathi : मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानातील उपोषण मंगळवारी स्थगित करण्यात आल्यानंतर बुधवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विविध खात्यांअंतर्गत 15 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तर दूसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या एकट्या नगरविकास खात्याअंतर्गत ९ प्रमुख निर्णय घेण्यात आले.
03 Sep 2025 03:46 PM (IST)
Congress MLA RV Deshpande: कर्नाटकमध्ये कॉँग्रेसने एका नवीन वादाला तोंड फोडले आहे. कॉँग्रेसच्या आमदाराने वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे आता त्यांच्यासह कॉँग्रेसपक्षावर टीकेची झोड उठली आहे. कर्नाटकमधील कॉँग्रेस आमदार अडचणीत आले आहेत. महिला पत्रकाराने रुग्णालयाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर बोलताना या नेत्याने महिला पत्रकाराच्या प्रसुतीबाबत वादग्रस्त विधान केले आहे. या नेत्याचे नाव आरवी देशपांडे असे आहे.
03 Sep 2025 03:45 PM (IST)
'सन मराठी' वरील 'तुझ्यासाठी तुझ्यासंगं' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. पहिल्या नजरेतल्या प्रेमाची गोष्ट प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना आवडली. येत्या ५ सप्टेंबर रोजी रात्री ९:३० वाजता मालिकेत तेजा-वैदहीचं लग्न थाटामाटात पार पडताना दिसणार आहे. मालिकेच्या कथानकानुसार तेजाचा प्लॅन फसतो आणि तेजा चुकून वैदहीला किडन्याप करतो. ही गोष्ट सर्वत्र पसरते. यामुळे तेजा-वैदहीच्या आयुष्याला नवं वळण मिळतं. ही सगळी गंमत प्रेक्षकांना येणाऱ्या नव्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
03 Sep 2025 03:40 PM (IST)
पंचांगानुसार, अनंत चतुर्दशी यावेळी शनिवार, 6 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी भाविक गणेशमूर्तीचे दहा दिवसानंतर विसर्जन करतात. गणपतीला निरोप देणे हा एक भावनिक क्षण आहे, परंतु हा निरोप योग्य पद्धतीने देणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी काही लोक घरामध्ये अनंताची देखील पूजा करतात. विसर्जन करताना कोणत्या चुका करणे टाळले पाहिजे ते जाणून घ्या
03 Sep 2025 03:27 PM (IST)
राज्यभरात सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र हवामान विभागाने येत्या काही दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. आजपासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोणत्या भागात कोणता अलर्ट देण्यात आलेला आहे, याबाबत जाणून घेऊयात.
03 Sep 2025 03:26 PM (IST)
गेल्या काही वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. दोन देशांमधील युद्ध संपायचे काही चिन्ह दिसत नाही. मात्र आता या युद्धाचा पुन्हा एकदा भडका उडणार असे चित्र निर्माण झाले आहे. याला कारण ठरले आहे ते म्हणजे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचा चीन दौरा.
03 Sep 2025 03:25 PM (IST)
IMD Rain Alert: राज्यभरात सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र हवामान विभागाने येत्या काही दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. आजपासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोणत्या भागात कोणता अलर्ट देण्यात आलेला आहे, याबाबत जाणून घेऊयात.
03 Sep 2025 03:25 PM (IST)
Pakistan PM Shehbaz Sharif : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif)यांचा पुन्हा एकदा जागतिक स्तरावर अपमान झाला आहे. यामुळे सर्वत्र त्यांना ट्रोल केले जात आहे. त्यांच्या स्थितीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin)यांनाही हसू फुटले आहे. चीनमध्ये आयोजित झालेल्या शांघाय सहकार्य संघटना (SCO) परिषदेत शहबाज यांची अशी परिस्थिती झाली होती की, ज्यामुळे त्यांना ट्रोल केले जात आहे.
03 Sep 2025 03:20 PM (IST)
सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यामुळे व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे, याचा फायदा घेण्यासाठी, फूड डिलिव्हरी क्षेत्रातील दिग्गज कंपनी झोमॅटोने त्यांचे प्लॅटफॉर्म शुल्क प्रति ऑर्डर १० रुपयांवरून १२ रुपये केले आहे. जरी ही वाढ किरकोळ वाटत असली तरी. परंतु यामुळे ऑर्डरवर अधिक नफा मिळविण्यास आणि कंपनीचा एकूण नफा वाढण्यास मदत होईल.
03 Sep 2025 03:20 PM (IST)
World Marathi News: गेल्या काही वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. दोन देशांमधील युद्ध संपायचे काही चिन्ह दिसत नाही. मात्र आता या युद्धाचा पुन्हा एकदा भडका उडणार असे चित्र निर्माण झाले आहे. याला कारण ठरले आहे ते म्हणजे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचा चीन दौरा.
03 Sep 2025 03:15 PM (IST)
OBC Reservation : मुंबई : राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत मुंबईमध्ये आंदोलन केले. जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर पाच दिवस आमरण उपोषण केले. यानंतर राज्य सरकारकडून जरांगे पाटील यांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. ओबीसी अंतर्गत सर्व मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. यानंतर आता राज्य सरकारकडून ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
03 Sep 2025 03:10 PM (IST)
Junior Hockey World Cup 2025 : पाकिस्तानने पुन्हा एकदा आपले खरे दात दाखवले आहेत. नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ज्युनियर हॉकी आशिया कप २०२५ चे आयोजन भारतात करण्यात येणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाकिस्तानकडून भारतात येण्यास नकार देण्यात आला आहे. चकित करणारी बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी पाकिस्तान भारतात येणार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी पाकिस्तानने सहमति दर्शवली होती. परंतु आता अचानक पाकिस्तानने तसे करण्यास नकार दिला आहे.
03 Sep 2025 03:08 PM (IST)
भंडारा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरत आहे. या योजनेतील काही गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच पारदर्शकता आणण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह भंडारा जिल्ह्यातही विशेष पडताळणी व तपासणी मोहीम युद्ध स्तरावर राबविण्यात आली आहे.
03 Sep 2025 02:56 PM (IST)
राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याची धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने घेतले होते. त्यानुसार २१ ऑगस्ट पासून अटल सेतू सह मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग तसेच समृद्धी महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी करण्यात येत असल्याची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
03 Sep 2025 02:54 PM (IST)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरत आहे. या योजनेतील काही गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच पारदर्शकता आणण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह भंडारा जिल्ह्यातही विशेष पडताळणी व तपासणी मोहीम युद्ध स्तरावर राबविण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात २ लाख ४३ हजार ६०५ लाभार्थी आहेत. भंडारा जिल्ह्यात सुरुवातीला २ लाख ९९ हजार ९७१ लाडके बहिणींचे अर्ज प्राप्त झाले. त्यातून कागदपत्रांच्या अपूर्तमुळे १७१८३ अर्ज अपात्र ठरले. त्यामुळे जिल्ह्यात २ लाख ८२ हजार ७८८ अर्ज पात्र ठरले होते. मात्र, आजपर्यंत पुनर्पडताळणीत बोगस आढळून आलेले २२ हजार लाडक्या बहिणी आढळल्याने लाभ घेणाऱ्या २ लाख ४३ हजार ६०५ लाभार्थी महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार आहे.
03 Sep 2025 02:50 PM (IST)
केंद्र सरकारने शेजारील पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायांच्या नागरिकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. धार्मिक छळापासून वाचण्यासाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधून भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायाच्या सदस्यांना पासपोर्ट किंवा इतर प्रवास कागदपत्रांशिवायही देशात राहण्याची परवानगी दिली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
03 Sep 2025 02:46 PM (IST)
भारत आणि जर्मनी या दोन प्रगतिशील देशांमधील मैत्री गेल्या काही दशकांत अधिक दृढ झाली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, संस्कृती, शिक्षण, व्यापार आणि जागतिक राजकारण अशा सर्व क्षेत्रांमध्ये दोन्ही देश एकमेकांना पूरक ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी नवी दिल्ली येथे भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान डेव्हिड वेडेफुल यांच्यात झालेली भेट विशेष महत्त्वाची ठरली. या भेटीत मुक्त व्यापार करार (FTA) या महत्त्वाच्या मुद्द्यावर भर देण्यात आला. भारताने स्पष्टपणे सांगितले की, युरोपियन युनियनसोबतचा हा करार जलदगतीने पूर्ण करण्यासाठी जर्मनीने पुढाकार घ्यावा. जर्मनी हा युरोपातील भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असल्याने या चर्चेचे महत्त्व आणखी वाढते.
03 Sep 2025 02:43 PM (IST)
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने यावर्षी तिचा ५० वा वाढदिवस साजरा केला, पण तिच्या वयाचा अंदाज लावणे खूप कठीण आहे. ती जितकी फिट आणि सुंदर दिसते तितकीच ती तिच्या आरोग्याकडेही तितकेच लक्ष देते. शिल्पा खूप खवय्यी आहे, पण तिची डाएट रूटीन खूप संतुलित आणि सोपी आहे. शिल्पा शेट्टीचा दैनंदिन डाएट प्लॅन काय आहे आणि ती तिच्या आरोग्याची आणि सौंदर्याची कशी काळजी घेते ते जाणून घेऊया.
03 Sep 2025 02:34 PM (IST)
गौहर खान आणि झैद दरबार यांचे लग्न २५ डिसेंबर २०२० रोजी झाले. त्यांनी १० मे २०२३ रोजी त्यांच्या पहिल्या मुलाचे म्हणजे जेहानचे त्यांच्या आयुष्यात आनंदाने स्वागत केले. तसेच आता दोघांनीही त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माबद्दल पोस्टद्वारे आनंदाची बातमी शेअर केली आहे. गौहर खान आणि झैद दरबार सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये या दोघांनी एका गोंडस बाळाला जन्म दिल्याची घोषणा केली आहे.
03 Sep 2025 02:24 PM (IST)
राज्य सरकरकडून ओबीसी समाजाला दिलासा देण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारकडून ओबीसी समाजासाठी उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत सरकारमधील तीन मित्र पक्षाचे प्रत्येकी दोन मंत्री आणि दोन अधिकारी सदस्य असणार आहेत.
03 Sep 2025 02:18 PM (IST)
Sheena Bora Murder Case News in Marathi : देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या शीना बोरा हत्याकांडात मंगळवारी एक मोठा ट्विस्ट समोर आला. इंद्राणी मुखर्जीची मुलगी विधी मुखर्जीने न्यायालयात साक्ष देताना सीबीआयच्या आरोपपत्रावर प्रश्न उपस्थित केले. विशेष सीबीआय न्यायाधीश जे.पी. दरेकर यांच्या न्यायालयात तिने स्पष्टपणे सांगितले की तपास यंत्रणेने तिच्या नावाने नोंदवलेले जबाब पूर्णपणे बनावट आहे.
03 Sep 2025 02:18 PM (IST)
US national found dead Dhaka : बांगलादेशमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर एक थरारक घटना घडली आहे. ढाका येथील पंचतारांकित वेस्टिन हॉटेल मध्ये अमेरिकन आर्मी स्पेशल फोर्सेस कमांड (एअरबोर्न) चे अधिकारी टेरेन्स आर्वेल जॅक्सन यांचा मृतदेह आढळून आला. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी उघडकीस आली आणि लगेचच संपूर्ण दक्षिण आशियात चर्चेचा विषय ठरली.
03 Sep 2025 02:15 PM (IST)
बांगलादेशमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर एक थरारक घटना घडली आहे. ढाका येथील पंचतारांकित वेस्टिन हॉटेल मध्ये अमेरिकन आर्मी स्पेशल फोर्सेस कमांड (एअरबोर्न) चे अधिकारी टेरेन्स आर्वेल जॅक्सन यांचा मृतदेह आढळून आला. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी उघडकीस आली आणि लगेचच संपूर्ण दक्षिण आशियात चर्चेचा विषय ठरली. बांगलादेशी पोलिसांनी सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगितले. मात्र, मृतदेहाच्या वाहतुकीभोवती पसरलेली गुप्तता आणि अमेरिकन दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे सामान ताब्यात घेतल्याने या कथेत नवा वळण आला. दूतावासाने स्थानिक पोलिसांना शवविच्छेदन करण्याची परवानगी दिली नाही. इतकेच नव्हे तर, हॉटेलमधून त्याच्या खोलीतून बाहेर काढलेले साहित्य पाहून सर्वांचे डोळे विस्फारले. एका कर्मचाऱ्याने सांगितले की जॅक्सनच्या खोलीतून नकाशे, रेखाचित्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, तीन मोठ्या सुटकेस, तसेच लॅपटॉप जप्त करण्यात आले. हे सर्व केवळ एक व्यावसायिक व्यक्तीच्या प्रवासातील सामान होते का? की त्यामागे गुप्तचर कारवायांचे जाळे दडले होते? हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
03 Sep 2025 02:12 PM (IST)
देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या शीना बोरा हत्याकांडात मंगळवारी एक मोठा ट्विस्ट समोर आला. इंद्राणी मुखर्जीची मुलगी विधी मुखर्जीने न्यायालयात साक्ष देताना सीबीआयच्या आरोपपत्रावर प्रश्न उपस्थित केले. विशेष सीबीआय न्यायाधीश जे.पी. दरेकर यांच्या न्यायालयात तिने स्पष्टपणे सांगितले की तपास यंत्रणेने तिच्या नावाने नोंदवलेले जबाब पूर्णपणे बनावट आहे. विधी मुखर्जीने दावा केला की, तिला अनेक कोऱ्या कागदपत्रांवर आणि ईमेलच्या प्रतींवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले गेले. नंतर ते तिचे जबाब म्हणून सादर करण्यात आले. तिने न्यायालयाला सांगितले की, जर तिच्या नावाने आरोपपत्रात खोटे विधान ठेवले गेले असेल, तर हे स्पष्ट आहे की एखाद्याला खोटे गुंतवण्याचा कट रचला जात आहे. या संपूर्ण खेळात पीटर मुखर्जी यांचे पुत्र राहुल आणि रबिन यांची भूमिका संशयास्पद आहे.
03 Sep 2025 01:55 PM (IST)
मध्य प्रदेशमधील एका गावामध्ये अजब घटना समोर आली आहे. रीवा गावामधील एक तलाव चक्क चोरीला गेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मध्य प्रदेशात एकच खळबळ उडाली आहे. लाखो रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेला तलाव चक्क चोरीला गेला आहे. यामुळे मध्यप्रदेश पोलीस यंत्रणा आणि प्रशासन यांच्याकडून तलावाची शोध मोहिम सुरु आहे.चोरट्यांकडून सहसा मौल्यवान दागिने, पैसे, हिरे आणि मोती यांच्यावर डल्ला मारला जातो. चोरांचे लक्ष हे पैशांवर जास्त असते. मात्र मध्यप्रदेशामध्ये पैशांची नाही तर चक्क सार्वजनिक तलाव चोरीला गेला. माहिती अधिकारांतर्गत असे उघड झाले आहे की हा तलाव सुमारे २५ लाख रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. आता गावकरी तलावाच्या शोधात भटकत आहेत. त्यांनी प्रशासन, पोलिस आणि मुख्यमंत्र्यांकडे अपील केले आहे, परंतु तलाव सापडला नाही.
03 Sep 2025 01:45 PM (IST)
गेल्या १८ वर्षांपासून अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका कऱण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कारागृहाच्या मागच्या गेटने मीडियापासून लपवत पोलिसांनी अरुण गवळीची सुटका केली. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज त्याची सुटका करण्यात आली. मुंबई शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा करण्यात आली होती.
03 Sep 2025 01:40 PM (IST)
गेल्या काही दशकांत युद्धाचे स्वरूप वेगाने बदलत आहे. आज केवळ जमिनीवर, पाण्यावर किंवा आकाशात लढाई होत नाही, तर चौथे रणांगण म्हणजेच “अवकाश” (Space) हे जगातील महाशक्तींनी आपली सुरक्षा रणनीती आखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे ठिकाण बनवले आहे. अमेरिकेने याच धोक्याला ओळखून २०१९ मध्ये दोन महत्त्वाच्या संस्था निर्माण केल्या यूएस स्पेस फोर्स आणि यूएस स्पेस कमांड (स्पेसकॉम).
03 Sep 2025 01:36 PM (IST)
बांदेकर कुटुंब सिने क्षेत्रात फार सक्रिय असतात. महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर असो वा त्यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर! अगदी अनेक दशकांपासून दोघेही मराठी सिने क्षेत्रात नाव करून आहेत. दरम्यान, बांदेकर कुटूंबात नव्या पाहुण्याची कायमची एंट्री होणार आहे. बांदेकरांचा दिवा सोहम आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या काही आठवड्यांपासून होताना दिसत आहेत. अशामध्ये बांदेकरांनी स्वतः शेअर केलेली एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
03 Sep 2025 01:35 PM (IST)
पाकिस्तानच्या क्वेटा शहरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. बलुचिस्तानच्या नॅशनल पार्टीने आयोजित केलेल्या रॅलीदरम्यान मोठा स्फोट घडला आहे. या स्फोटात किमान १४ जणांचा मृत्यू झाल्याचे आणि २० हून अधिक लोक जखमी असल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी सांगितले. वृत्तानुसार, मंगळवारी २ सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे.क्वेटामध्ये रात्री सरदार अताउल्लाह मेंगल यांच्या पुण्यतिथीनिमित्त एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हा स्फोट घडला. बलुचिस्तानच्या प्रांताचे आरोग्य मंत्री बख्त मुहम्मद काकर यांनी या घटनेमध्ये १४ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.
03 Sep 2025 01:30 PM (IST)
वस्तू आणि सेवा कर परिषदेची ५६ वी (GST Council Meeting) बैठक बुधवार आणि गुरुवारी देशात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून वस्तू आणि सेवा करातील सुधारणांबद्दल बोलले होते, त्यामुळे या बैठकीकडून बऱ्याच अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. या दोन दिवसांच्या बैठकीत जीएसटी दरात बदल आणि चार ऐवजी दोन कर स्लॅब मंजूर केले जातील. सरकार कर रचनेला सोपे करण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच जीएसटी सुधारणांवर भर दिला जात आहे.
03 Sep 2025 01:25 PM (IST)
बिहारमधील खासदार राहुल गांधी आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांची बिहारमधील मतदार अधिकार यात्रा संपली. या यात्रेदम्यान, एका काँग्रेस कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबद्दल आक्षेपार्ह टिप्पण्णी केली. त्यानंतर त्याच्यावर कारवाईदेखील करण्यात आली. ही यात्रा संपली असली तरी या मुद्द्यावरून मात्र बिहारमध्ये राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याच्या निषेधार्थ सत्ताधारी एनडीएने ४ सप्टेंबर रोजी बिहार बंदची हाक दिली आहे. भारतीय जनता पक्षाव्यतिरिक्त, एनडीएचे सर्व मित्रपक्षही या बंदमध्ये सहभागी होणार आहे.
03 Sep 2025 01:15 PM (IST)
राजधानी दिल्लीत एक खूप मोठा प्रॉपर्टी डील होणार आहे. हा डील देशातील सर्वात महागड्या प्रॉपर्टी डीलपैकी एक असू शकतो. ही मालमत्ता देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे पहिले अधिकृत निवासस्थान होते. ही मालमत्ता लुटियन्स बंगला झोनमधील १७ यॉर्क रोडवर आहे, जी आता मोतीलाल नेहरू मार्ग म्हणून ओळखली जाते. TOI ने दिलेल्या वृत्तानुसार आणि सूत्रांच्या माहितीनुसार, या मालमत्तेचा डील सुमारे ११०० कोटी रुपयांना झाला आहे. तथापि, मालक त्यासाठी १,४०० कोटी रुपये मागत होता. १४,९७३ चौरस मीटरमध्ये पसरलेल्या या मालमत्तेला एका मोठ्या व्यावसायिकाने अंतिम रूप दिले आहे.