Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस

Marathi Breaking News Updates : देश-विदेशसह राजकारण, क्रीडा, समाजकारण, मनोरंजन यांसह इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 23, 2025 | 06:56 PM
आजच्या ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

आजच्या ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking Live Updates : गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा दमदार हजेरी लावल्याचे पाहिला मिळत आहे. राज्यातील अनेक भागांत मुसळधार तर काही भागांत तुरळक पाऊस होत आहे. मुंबईसह पुणे आणि आसपासच्या भागात सोमवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यातच आता पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे अनेक भागात पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जनजीवनावर याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले होते. असे असताना आता पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. अनेक दिवसांनी पडलेल्या मुसळधार पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. मुंबईत सोमवारी सकाळी पावसाचा जोर अधिक होता. त्यानंतर दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती.

संपूर्ण राज्यात गुरुवारपासून पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकणार असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

The liveblog has ended.
  • 23 Sep 2025 06:55 PM (IST)

    23 Sep 2025 06:55 PM (IST)

    इस्लामिक जगताला धक्का! सौदी अरेबियाच्या ग्रॅंड मुफ्ती शेख अब्दुलअझीझ यांचे निधन

    Saudi Arabia News in Marathi : रियाध : एक मोठी बातमी समोर आली आहे. सौदी अरेबियाचे (Saudi Arabia) ग्रॅंड मुफ्ती आणि वरिष्ठ विद्वान परिषदेचे प्रमुख शेख अब्दुलअझीझ बिन अब्दुल्ला यांचे निधन झाले आहे. मंगळवारी (२३ सप्टेंबर) सौदीच्या सरकारी वृत्तसंथेने याची घोषणा केली. शेख अब्दुलअझीझ यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सौदीने दिलेल्या माहितीनुसार, अस्रच्या नमाजानंतर रियाधमध्ये इमाम तुर्की बिन अब्दुल्ला मशिदीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

  • 23 Sep 2025 05:00 PM (IST)

    23 Sep 2025 05:00 PM (IST)

    बुलढाण्यात ‘अव्वाच्या सव्वा’ बिलांवर कारवाईची मागणी

    बुलढाणा जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून अवाजवी देयके वसूल केली जात असल्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. प्रशांत वाघोदे यांच्या नेतृत्वाखालील या निवेदनात रुग्णांची होणारी लूट आणि मनमानी कारभार तातडीने थांबवण्याची मागणी करण्यात आली.

  • 23 Sep 2025 04:55 PM (IST)

    23 Sep 2025 04:55 PM (IST)

    जामखेड तालुक्यात शेतीपिकांचे मोठे नुकसान, सरकारकडून सरसकट कर्जमाफीची मागणी

    मागील चार-पाच दिवसापासून अहिल्यानगरच्या सर्वच भागांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली आहेत. प्रामुख्याने सोयाबीन, ऊस, कांदा, उडीद, तुर, मग या पिकांचं पूर्णतः नुकसान झाला आहे. जिल्ह्यातील 87 हजार हेक्टर वरील शेती पिकाचे नुकसान झाल्याची आकडेवारी प्रशासनाकडे आहे यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अनेक भागात असलेल्या शेतीमध्ये दीड ते दोन फुटापर्यंत पाणी साचलं आहे. अशाच जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण या गावात देखील दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याने स्थानिक सोसायटी, बँकेकडून पिकांसाठी लाखोंचे कर्ज घेतलेले आहे. तब्बल वर्षभर पिकांची निगा राखल्यानंतर आज पिके काढणीला आलेली असताना पावसाने हाताचे पिके उध्वस्त केल्याची भावना शेतकऱ्यांनी मांडली आहे. सरकारने कुठलाही वेळ न दडवता सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी यावेळी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. जामखेड तालुक्यातील बाळ गव्हाण येथील शेतीपिकाच्या नुकसानीचा आढावा घेतला आहे.

  • 23 Sep 2025 04:45 PM (IST)

    23 Sep 2025 04:45 PM (IST)

    सोलापूरात गरबा कार्यक्रमातील कथित अश्लीलतेविरोधात हिंदू संघटनांचा तीव्र निषेध

    गरबा-दांडिया या पारंपरिक उत्सवामध्ये हिंदू संस्कृतीचे विकृतीकरण होत असल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजाने सोलापूरात कन्ना चौक येथे निषेध आंदोलन केले. या वेळी डिजिटल पोस्टर फाडून संतप्त कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला.

  • 23 Sep 2025 04:40 PM (IST)

    23 Sep 2025 04:40 PM (IST)

    कर्ज काढून पेरणी केली उभे पीक पाण्याने उद्ध्वस्त सरसकट कर्जमाफीची मागणी

    मुसळधार पावसामुळे जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, ऊस, कांदा, उडीद, तुर, मूग यासह इतर पिके पूर्णपणे पाण्यात गेली आहेत.

  • 23 Sep 2025 04:35 PM (IST)

    23 Sep 2025 04:35 PM (IST)

    छाया रुग्णालयात स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान

    बी.जी. छाया उपजिल्हा रुग्णालयात येत्या शनिवारी शासनाच्या 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' अभियानांतर्गत विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मधुमेह, रक्तदाब, नेत्र तपासणी, दंतरोग, स्तन कर्करोग, क्षयरोग, रक्तक्षय तसेच गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण सेवा, रक्त व हिमोग्लोबिन तपासणी यांसह सर्व आवश्यक तपासण्या एका ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, निरोगी जीवनशैली व पोषण मार्गदर्शन, रक्तदान शिबिर, निक्षय मित्र स्वयंसेवक नोंदणी तसेच अवयवदान नोंदणीची सेवा देखील उपलब्ध असेल. रुग्णांना एका दिवसात सर्व तपासण्या करण्याची सुवर्णसंधी मिळणार असल्यामुळे मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. शुभांगी वाडेकर यांनी केले आहे.

  • 23 Sep 2025 04:30 PM (IST)

    23 Sep 2025 04:30 PM (IST)

    सत्ताधाऱ्यांची मेट्रोच्या नावाने निवडणुकीची चाचपणी

    दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूककोंडीने ठाणेकर नागरिक त्रस्त असून वेळीवेळी विविध राजकीय पक्ष,घोडबंदर पट्ट्यातील नागरिक,खाजगी संस्था रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी करत असताना प्रशासन मात्र हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.अशावेळी सत्ताधाऱ्यांकडून महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मेट्रोमुळे ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि ठाणेकरांना मोठा दिलासा मिळेल असे चित्र उभे करत अनेक वर्षांपासून रखडलेल्या मेट्रोची मोठा गाजावाजा करत चाचणी घेण्यात आली मात्र ही चाचणी नसून आगामी निवडणुकीसाठी केलेली चाचपणी असल्याचा आरोप काँग्रेस ने केला आहे.

  • 23 Sep 2025 04:25 PM (IST)

    23 Sep 2025 04:25 PM (IST)

    चांदूरबाजार तहसीलमध्ये संतप्त शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, पिकं फेकून सरकारचा निषेध

    अमरावतीत सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे मात्र शासनाकडून शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाले नाही. त्यामुळे आज अमरावतीच्या चांदूरबाजार तहसील कार्यालयावर प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकऱ्यांच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला यात शेतकऱ्यांनी पाण्यामुळे नुकसान झालेले सोयाबीन संत्रा केळी कपाशी हे पिके घेऊन तहसील कार्यालयावर धडक दिली. व तहसीलदार यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना ता

  • 23 Sep 2025 04:20 PM (IST)

    23 Sep 2025 04:20 PM (IST)

    पूराच्या पाण्यानं शेतं झालीत उदध्वस्त, शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची आर्त हाक

    बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.. मांजरा, गोदावरी, सिंदफणा, बिंदुसरा यासह इतर स्थानिक च्या नद्यांना पूर आल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे शेती पिके वाहून जाण्याबरोबरच शेतातील माती देखील वाहून गेल्याने दगड गोटे उघडे पडले आहेत तर विहिरींमध्ये गाळ भरला असून सिंचनाचे साहित्य देखील वाहून गेले आहे अशा स्थितीत आता सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून एकरी एक लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे

  • 23 Sep 2025 04:15 PM (IST)

    23 Sep 2025 04:15 PM (IST)

    कुडाळमध्ये ओबीसींचे लाक्षणिक उपोषण ; नागपूरच्या ओबीसी मोर्चाला पाठिंबा

    ओबीसींच्या नागपूर येथील मोर्चास पाठिंबा दर्शवण्यासाठी कुडाळ येथील ओबीसी समाजाने लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे.

  • 23 Sep 2025 04:10 PM (IST)

    23 Sep 2025 04:10 PM (IST)

    कार्यकर्त्याला नेसवली साडी कल्याणमधील काँग्रेस आक्रमक

    कल्याणमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याला जबरदस्तीने साडी नेसवल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर राजकारणात तणाव निर्माण झाला असून भाजप- काँग्रेस वाद पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

  • 23 Sep 2025 04:07 PM (IST)

    23 Sep 2025 04:07 PM (IST)

    वसईत फुटलेल्या ट्रान्सफार्मरमुळे 4 वर्षीय चिमुकलीसह दोन जखमी

    वसईतील नालासोपारा पश्चिमेच्या डांगेवाडी परिसरात महावितरणच्या ट्रान्सफार्मरच्या फुटण्यामुळे भीषण घटना घडली. या घटनेत चार वर्षीय चिमुकली नसरीन परवीन आणि 30 वर्षीय जावेद अन्सारी यांना गंभीर जखमा झाल्या. दोघांना प्राथमिक उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले गेले, त्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबईच्या कस्तुर्भा रुग्णालयात हलवण्यात आले. या दोघांच्या जखमांची गंभीरता 80 ते 95 टक्के आहे. भरपावसात घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात मोठा घाबरटा पसरला.

  • 23 Sep 2025 03:52 PM (IST)

    23 Sep 2025 03:52 PM (IST)

    इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी किती वर्षे टिकते?

    भारतीय ऑटोमोबाइल बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची (EVs) मागणी वेगाने वाढत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि सरकारच्या सबसिडीमुळे लोक EV कडे आकर्षित होत आहेत.

  • 23 Sep 2025 03:43 PM (IST)

    23 Sep 2025 03:43 PM (IST)

    Women’s ODI World Cup पूर्वी ऑस्ट्रेलियाला झटका! ‘ही’ स्टार खेळाडू संघाबाहेर

    आयसीसी महिला विश्वचषक २०२५ (ICC Women’s ODI World Cup 2025)च्या तोंडावर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.

  • 23 Sep 2025 03:35 PM (IST)

    23 Sep 2025 03:35 PM (IST)

    कॉलेजच्या विद्यार्थ्यासोबत भयानक Ragging

    तामिळनाडू राज्यातून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तामिळनाडूच्या तिरूमंगलम येथे असलेल्या एका कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थ्याचे रॅगिंग करण्यात आले आहे.

  • 23 Sep 2025 03:21 PM (IST)

    23 Sep 2025 03:21 PM (IST)

    चप्पलने मारले, संपूर्ण हॉस्टेलमध्ये निर्वस्त्र फिरवले अन्...; कॉलेजच्या विद्यार्थ्यासोबत भयानक Ragging

    Tamilnadu Crime: तामिळनाडू राज्यातून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तामिळनाडूच्या तिरूमंगलम येथे असलेल्या एका कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थ्याचे रॅगिंग करण्यात आले आहे. या विद्यार्थ्याला चप्पलने मारहाण देखील करण्यात आली आहे. या कॉलेजमध्ये नेमक काय घडले आहे, ते जाणून घेऊयात.

  • 23 Sep 2025 03:21 PM (IST)

    23 Sep 2025 03:21 PM (IST)

    राहुल गांधींची चार राज्यांमध्ये नवी रणनीती; काँग्रेसची बूथ रक्षक योजना काय आहे?

    विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या विरोधात मोहिमेमुळे प्रोत्साहित होऊन, काँग्रेस पक्षाने आता चार राज्यांमधील पाच लोकसभा जागांवर “बूथ रक्षक योजना” सुरू केली आहे.

  • 23 Sep 2025 03:10 PM (IST)

    23 Sep 2025 03:10 PM (IST)

    बंदुकीच्या सेलिब्रेशनवर इरफान पठाणचा पाकिस्तानी खेळाडूवर भडका

    आशिया कप २०२५ (Asia cup 2025)च्या सुपर ४ सामन्यात २१ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ६ विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला.

  • 23 Sep 2025 02:58 PM (IST)

    23 Sep 2025 02:58 PM (IST)

    दिग्दर्शकानं ‘बाबुली’ समोर जोडले हात

    दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांचा दशावतार हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाची कथा कोकणातील घनदाट जंगलात घडते. यात थरार, सस्पेन्स आणि भरपूर ड्रामा आहे. कोकणातील रूढीपरंपरा, लोककला आणि निसर्गाचे सुंदर दर्शन घडते.

  • 23 Sep 2025 02:36 PM (IST)

    23 Sep 2025 02:36 PM (IST)

    IPL मधून पहिल्यांदा निवृत्तीनंतर आता आर. अश्विन फ्रँचायझी क्रिकेटमध्ये परतणार

    बॉर्डर गावास्कर ट्रॉफी मध्ये चालू मालिकेत भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनी निवृत्तीची घोषणा केली होती यावेळी सर्वांनाच धक्का बसला होता. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतल्या आहेत त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी त्यांनी आयपीएलमधून देखील क्रिकेटला रामराम केला होता. आता आश्विन हा परदेशी भूमीवर त्याच्या गोलंदाजीची जादू दाखवायला सज्ज झाला आहे. आर अश्विनने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

  • 23 Sep 2025 02:35 PM (IST)

    23 Sep 2025 02:35 PM (IST)

    युवराज सिंग ईडी चौकशीसाठी पोहोचला, इतर अनेक क्रिकेटपटूंवर देखील असणार नजर

    आशिया कप आधी बेटिंग ऍप ड्रीम इलेव्हन, माय इलेव्हन सर्कल यासारख्या ॲपवर बंदी घालण्यात आली आहे. बीसीसीआयने या ॲपवर पूर्णपणे बंदी घातली आहे. माजी भारतीय स्टार क्रिकेटपटू युवराज सिंग मंगळवारी, २३ सप्टेंबर रोजी एका ऑनलाइन बेटिंग अॅपशी संबंधित प्रकरणात अंमलबजावणी संचालनालया (ईडी) समोर हजर झाला. ईडीने युवराज सिंगला ऑनलाइन बेटिंग अॅप ‘वनएक्सबेट’शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.

  • 23 Sep 2025 02:30 PM (IST)

    23 Sep 2025 02:30 PM (IST)

    जीएसटी दर घटल्याचा फायदा, AC आणि TV च्या विक्रीत विक्रमी वाढ

    नवीन जीएसटी दर लागू झाल्यामुळे सणासुदीच्या हंगामाने भारतीय बाजारपेठेत पुन्हा उत्साह आणला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून टीव्ही आणि एअर-कंडिशनरसारख्या घरगुती उपकरणांच्या विक्रीत वाढ झाली आहे. वापर वाढविण्यासाठी जीएसटी कौन्सिलने केलेल्या मोठ्या कर दर सुधारणांनंतर, ५ टक्के आणि १८ टक्के अशी दोन-स्तरीय कर रचना आता लागू झाली आहे, ज्यामुळे महागाईशी झुंजणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • 23 Sep 2025 02:24 PM (IST)

    23 Sep 2025 02:24 PM (IST)

    सत्ताधाऱ्यांची मेट्रोच्या नावाने निवडणुकीची चाचपणी

    ठाणे / स्नेहा जाधव : दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूककोंडीने ठाणेकर नागरिक त्रस्त असून वेळीवेळी विविध राजकीय पक्ष,घोडबंदर पट्ट्यातील नागरिक,खाजगी संस्था रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी करत  आहे. मात्र  प्रशासन याबाबत हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.अशावेळी सत्ताधाऱ्यांकडून महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मेट्रोमुळे ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि ठाणेकरांना मोठा दिलासा मिळेल असे चित्र उभे करत अनेक वर्षांपासून रखडलेल्या मेट्रोची मोठा गाजावाजा करत चाचणी घेण्यात आली मात्र ही चाचणी नसून आगामी निवडणुकीसाठी केलेली चाचपणी असल्याचा आरोप काँग्रेस ने केला आहे.

  • 23 Sep 2025 02:24 PM (IST)

    23 Sep 2025 02:24 PM (IST)

    अखेर पावसाने घेतला ब्रेक! वरूणराजा करणार आराम

    Weather Update: गेले काही दिवस देशभरात मुसळधार पाऊस सुरू होता. मात्र अनेक राज्यात आज पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे दिसून येत आहे. तर काही राज्यांना पाऊस झोडपून काढत आहे. दिल्ली, उत्तराखंड राज्यांमध्ये हवामान मोकळे राहण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने कोणत्या राज्यांमध्ये पाऊस होण्याचा अलर्ट दिला आहे, त्याबाबत जाणून घेऊयात.

  • 23 Sep 2025 02:24 PM (IST)

    23 Sep 2025 02:24 PM (IST)

    शेतकऱ्यांना १० हजार कोटींची मदत तात्काळ जाहीर करावी

    Marathwada Heavy Rainfall:  महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या प्रचंड नुकसानीसाठी केंद्र सरकारने किमान १०,००० कोटी रुपयांची मदत तत्काळ जाहीर करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

  • 23 Sep 2025 02:06 PM (IST)

    23 Sep 2025 02:06 PM (IST)

    धक्कादायक! विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा अफगाणी मुलगा

    Afghanistan News in Marathi : काबूल : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अफगाणिस्तानमधील (Afghanistan) एक अल्पवयीन मुलाने विमानाच्या चाकात बसून भारतात प्रवेश केला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी ही घटना घडली आहे. एक १३ वर्षांचा अफगाणी मुलगा विमानच्या मागील लॅंडिग गियरमध्ये बसून भारतात आला.

  • 23 Sep 2025 01:55 PM (IST)

    23 Sep 2025 01:55 PM (IST)

    गणेश कंझ्युमर IPO पहिल्या दिवशी 12 टक्के सबस्क्राइब

    गहू आणि हरभरा-आधारित उत्पादनांचे उत्पादक गणेश कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचा आयपीओ पहिल्या दिवशी फक्त १२% सबस्क्राइब झाला होता. तो उद्या, २२ सप्टेंबर रोजी उघडेल. किरकोळ गुंतवणूकदार २४ सप्टेंबरपर्यंत या इश्यूसाठी बोली लावू शकतील, किमान ऑफर ₹१४,८१२ असेल. गणेश कंझ्युमर प्रोडक्ट्स या ऑफरमधून ₹४०८.८० कोटी उभारण्याचा विचार करत आहे. कंपनीचे शेअर्स २९ सप्टेंबर रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर सूचीबद्ध केले जातील.

  • 23 Sep 2025 01:45 PM (IST)

    23 Sep 2025 01:45 PM (IST)

    श्रीदेवींच्या साडीत जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लुक, ‘होमबाउंड’च्या प्रीमियरमध्ये वेधलं लक्ष

    बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. मात्र यावेळी ती चर्चेत आली तिच्या लूकमुळे. जान्हवीनं आपल्या आई, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी घातलेली एक जुनी, पारंपरिक साडी घालून ‘होमबाउंड’ या शॉर्ट फिल्मच्या खास स्क्रीनिंगला उपस्थिती लावली. ही साडी एक काळात श्रीदेवी यांनी अनेकदा परिधान केली होती आणि ती चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध झाली होती. जान्हवीने हीच साडी घालून त्या आठवणींना उजाळा दिला. तिच्या या खास लुकमुळे सर्वांचं लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं.

  • 23 Sep 2025 01:42 PM (IST)

    23 Sep 2025 01:42 PM (IST)

    घायवळनंतर आता 'दुधानी' गँगची दहशत

    कुख्यात गुंड घायवळ गँगच्या टोळीकडून झालेल्या गोळीबारानंतर आता स्वारगेट भागात दुधानी गँगने दहशत माजवली आहे. मोक्का रिर्टन आणि सराईतांनी दहशत माजवून एकावर कोयत्याने वार केले आहेत. कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्नही केला आहे. नंतर परिसरात हवेत हत्यारे फिरवून दहशत माजवत गोंधळ घातला. शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास डायसप्लॉट येथे ही घटना घडली. त्यामुळे शहरातील गुन्हेगारांची दहशत कायम असल्याचेही दिसत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आबा सरोदे (वय ३९) यांनी तक्रार दाखल केली आहे.

  • 23 Sep 2025 01:40 PM (IST)

    23 Sep 2025 01:40 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं, पण…; पडळकरांच्या जयंत पाटलांवरील टीकेवर शरद पवारांची प्रतिक्रीया

    भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर अतिशय खालच्या शब्दांत टीका केला आहे. त्यांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख केलाच आहे. त्यासोबत त्यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत पातळी सोडून टीका केली आहे. गोपीचंद पडळकर यांचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गोपीचंद पडळकर यांच्या या टीकेवर आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

  • 23 Sep 2025 01:35 PM (IST)

    23 Sep 2025 01:35 PM (IST)

    हातातोंडाशी आलेला घास हिरावला! राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार?

    राज्यातील अनेक भागात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारने त्या दृष्टीने हालचालीदेखील वाढवल्या आहेत. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार असून यावेळी सर्व मंत्री ओला दुष्काळ जाहीर करण्याचा प्रस्ताव मांडू शकतात. त्यासंदर्भात राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहे.

  • 23 Sep 2025 01:25 PM (IST)

    23 Sep 2025 01:25 PM (IST)

    आज लाँच झालेल्या 10 IPO मध्ये गुंतवणुकीची मोठी संधी

    मंगळवारी दलाल स्ट्रीटवर एकाच दिवसात १० आयपीओ लाँच झाल्याने गुंतवणूकदारांची गर्दी आहे. गुंतवणूकदारांसाठी हा एक उत्तम मेळा आहे, ज्यामध्ये अनेक पर्याय आहेत. या यादीत आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स, शेषासाई टेक्नॉलॉजीज, जारो इन्स्टिट्यूट, सोलरवर्ल्ड एनर्जी सारखी मोठी नावे आणि इकोलाइन एक्झिम, मॅट्रिक्स जिओ सोल्युशन्स, ट्रू कलर्स, अपटस फार्मा, एनएसबी बीपीओ सोल्युशन्स आणि भारतरोहन एअरबोर्न इनोव्हेशन्स सारख्या लहान एसएमई इश्यूजचा समावेश आहे.

  • 23 Sep 2025 01:20 PM (IST)

    23 Sep 2025 01:20 PM (IST)

    गोंदियात २ पोत्यांमध्ये आढळले शरीराचे तुकडे

    गोंदियायच्या सालेकसा तालुक्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. २ पोत्यांमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याचे समोर आले आहे. या मृतदेहाची ओळख पटली असून तरुण हा मध्यप्रदेशचा असल्याचे समोर आले आहे. मृतकाचे नाव शुभम वाहने (26) रा. दैतबर्रा जिल्हा बालाघाट मध्यप्रदेश असे आहे. ही घटना सालेकसा तालुक्यातील दशरथटोला (बाह्मणी) परिसरात घडली आहे.

  • 23 Sep 2025 01:15 PM (IST)

    23 Sep 2025 01:15 PM (IST)

    दिमाखदार सोहळ्यासह साजरा होणार स्टार प्लसची गौरवशाली २५ वर्षे

    भारतातील सर्वात आवडत्या मनोरंजन वाहिन्यांपैकी एक असलेल्या स्टार प्लसने स्टार परिवार पुरस्कार २०२५ सह त्यांची वार्षिक परंपरा साजरी केली. चॅनेलच्या प्रतिष्ठित शो आणि पात्रांना सन्मानित करण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी आयोजित केले जातात. हा आवृत्ता आणखी खास आणि रोमांचक आहे, कारण तो एका भव्य प्रसंगासह साजरा केला जातो.स्टार प्लसने मनोरंजन उद्योगात २५ गौरवशाली वर्षे पूर्ण केली आहेत. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त, ही संध्याकाळ उत्साह, उत्कृष्ट कामगिरी आणि अभिमान आणि आठवणींनी भरलेल्या अमूल्य क्षणांनी भरलेली दिसून आली. या समारंभाची सुरुवात एका विशेष पत्रकार परिषदेने झाली, ज्यामुळे या पुरस्कार आवृत्तीला संस्मरणीय बनवण्यात आले.

  • 23 Sep 2025 01:10 PM (IST)

    23 Sep 2025 01:10 PM (IST)

    फेसबुकवर मैत्री, गुंगीचं औषध आणि अत्याचार

    भंडाऱ्यातून एक धक्कदायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. फेसबुकवर मैत्री करणं एका तरुणीला खूपच महागात पडलं आहे. फेसबुकवरती ओळख झाल्यानंतर मैत्री झाल्यानंतर गुंगीचं औषध देत तरुणीवर दोघांनी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे.

  • 23 Sep 2025 01:02 PM (IST)

    23 Sep 2025 01:02 PM (IST)

    आंदेकर टोळीची दहशत? तपासातून धक्कादायक माहिती उघड

    आंदेकर टोळीवरील कारवाईचा फास पुणे पोलिसांनी आणखीनच आवळला असून, मध्यभागातील मासे विक्रेते आणि यात असलेले व्यावसायिकांकडून संघटितरित्या प्रोटेक्शन मनी म्हणून खंडणी उकळल्याप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर, माजी नगरसेवक वनराजची पत्नी सोनालीसह ११ जणांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गेल्या १२ वर्षात या टोळीने २० कोटींहून अधिक रक्कम खंडणी स्वरूपात घेतली असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.

  • 23 Sep 2025 12:55 PM (IST)

    23 Sep 2025 12:55 PM (IST)

    वर्षभर सामूहिक बलात्कार, थरारक घटना ऐकून पोलिसही हादरले

    एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. एका तरुणाने ओळख लपवून एका लहान मुलाच्या आईशी लग्न केले. तिला सत्य समजताच तरुणाने तिला बंदिस्त केले. तिच्यावर वर्षभर चार मित्रांसह सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आलं आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

  • 23 Sep 2025 12:40 PM (IST)

    23 Sep 2025 12:40 PM (IST)

    गर्भवती महिलांसाठी पॅरासिटामॉल धोकादायक

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरासिटामॉलबाबत एक मोठे विधान केले आहे. ट्रम्प यांच्या मते, गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉल घेतल्याने मुलांमध्ये ऑटिझमचा धोका वाढू शकतो, यासंदर्भात इशाराही देण्यात आला आहे.

  • 23 Sep 2025 12:30 PM (IST)

    23 Sep 2025 12:30 PM (IST)

    एकनाथ शिंदेंची त्यांच्याच मंत्र्यांच्या कामावर नाराजी

    एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील मंत्र्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली आणि त्यांना त्यांच्या केबिनमध्ये जास्त वेळ घालवण्याऐवजी जमिनीवर काम करण्याचे आणि सार्वजनिक प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले. अकार्यक्षम मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांना सुनावल्याची माहिती आहे. मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. पक्ष संघटनेसाठी वेळ न देणाऱ्या मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांनी झापलं.

  • 23 Sep 2025 12:26 PM (IST)

    23 Sep 2025 12:26 PM (IST)

    पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर

    पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पावसाने कहर केला आहे. मुसळधार पाऊस आणि वीज कोसळल्याने आतापर्यंत विविध भागात सात जणांचा मृत्यू झाला आहे.   शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेले आहेत. विमानतळ देखील धोकादायक स्थितीत आहे. एअर इंडिया आणि इंडिगोने प्रवाशांसाठी सूचना जारी केल्या आहेत. कोलकाता महानगरपालिकेच्या (केएमसी) मते, शहराच्या दक्षिण आणि पूर्व भागात पाऊस अधिक तीव्र होता. गरिया कामदहारी येथे काही तासांत ३३२ मिमी पाऊस पडला, तर जोधपूर पार्क येथे २८५ मिमी पाऊस पडला. कालीघाट येथे २८० मिमी, टोप्सिया येथे २७५ मिमी, बालीगंज येथे २६४ मिमी आणि उत्तर कोलकात्यातील थंटानिया येथे १९५ मिमी पाऊस पडला.

  • 23 Sep 2025 12:14 PM (IST)

    23 Sep 2025 12:14 PM (IST)

    बांग्लादेशशी होणार टीम इंडियाचा सामना

    बांगलादेशच्या संघाने पहिल्या सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या संघाला पराभूत करून पहिला विजय नोंदवला होता तर भारताच्या संघाने पाकिस्तानच्या संघाला पराभूत करून पहिला विजय नावावर केला आहे. भारताच्या संघाने पाकिस्तानला या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा पराभूत केले. आतापर्यंत भारताचा संघाने या स्पर्धेमध्ये एकही सामना जिंकलेला नाही त्यामुळे टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश संघाला विजय मिळवणे नक्कीच आव्हानात्मक असणार आहे.

  • 23 Sep 2025 12:02 PM (IST)

    23 Sep 2025 12:02 PM (IST)

    गरबा खेळण्यासाठी येणाऱ्यांवर गोमूत्र शिंपडा - धीरेंद्र शास्त्रींचे विधान

    बागेश्वर धाम पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी लव्ह जिहादचे उच्चाटन करून हिंदू मुलींचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे. गरबा मंडपात इतर धर्मातील लोकांच्या उपस्थितीबाबत ते म्हणाले की जर हिंदू हजला जात नसतील तर त्यांनी गरबाला उपस्थित राहू नये. शिवाय, गरबा मंडपात येणाऱ्यांवर गोमूत्र शिंपडण्याचा सल्ला त्यांनी दिला.

     

  • 23 Sep 2025 11:55 AM (IST)

    23 Sep 2025 11:55 AM (IST)

    दिल्लीत गव्हाचे पीठ खाण्यात वापरल्याने २०० लोक आजारी पडले.

    दिल्लीत बकव्हीट पीठ खाल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली. जहांगीरपुरी, महिंद्रा पार्क, समयपूर, भालस्व डेअरी, लाल बाग आणि स्वरूप नगर येथील सुमारे १५० ते २०० लोक आजारी पडले. उलट्या आणि जुलाबाच्या तक्रारींसह त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालयात त्यांना प्राथमिक उपचार मिळाले आणि आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. बीजेआरएम रुग्णालयाने रुग्णांना दाखल करण्याची गरज नसल्याचे वृत्त दिले आहे. सुरुवातीला त्यांची प्रकृती गंभीर वाटत होती, परंतु आता सर्व रुग्ण बरे होत आहेत.

  • 23 Sep 2025 11:45 AM (IST)

    23 Sep 2025 11:45 AM (IST)

    नवीनGST दरामुळे मारुती सुझुकीच्या दिवसाला हजारो बुकिंग

    जीएसटी रिफोर्म लागू झाला असून यापुढे देशामध्ये जीएसटीचे केवळ दोन स्लॅब असणार आहेत. यानंतर मारुती सुझुकीच्या बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे.दिवसाला सुमारे १५,००० बुकिंग होत असून जीएसटी सुधारणा लागू केल्यानंतर कार विक्रीत वाढ झाल्याचे मारुती सुझुकीने सांगितले आहे.

  • 23 Sep 2025 11:35 AM (IST)

    23 Sep 2025 11:35 AM (IST)

    राजधानी दिल्लीमध्ये मध्यरात्रीपर्यंत हिंदू सणांना लाऊडस्पीकरची परवागनी

    राजधानी दिल्लीत लाऊडस्पीकरसाठी वाढवलेल्या वेळेच्या मर्यादेबद्दल, मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या की "मी नेहमीच लक्षात घेतले आहे की आपल्या हिंदू सणांना अडचणी येतात, कारण रामलीला किंवा दुर्गा पूजा कधीच रात्री १० वाजता संपू शकत नाही. जेव्हा गुजरातमध्ये दांडिया रात्रभर चालू शकतो, जेव्हा इतर राज्यांमध्ये कार्यक्रम रात्रभर होऊ शकतात, तर दिल्लीतील लोकांसाठी असे का होऊ शकत नाही? म्हणून यावेळी आम्ही सर्व रामलीला, दुर्गा पूजा आणि सांस्कृतिक-धार्मिक उत्सवांना रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे..."

  • 23 Sep 2025 11:25 AM (IST)

    23 Sep 2025 11:25 AM (IST)

    खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कुटुंबाला वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी

    धारशिव जिल्हातील वडनेर, तालुका परंडा येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील आजी, २ वर्षांचा मुलगा व दोन व्यक्ती रात्रीपासून घराच्या छतावर अडकले होते. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर ह्यांनी NDRF च्या जवान आणि गावकऱ्यांच्या मदतीने त्यांची सुखरूप सुटका केली. ओमराजे निंबाळकर यांनी पाण्यात उतरुन कुटुंबाची सुटका केली.

    बाळासाहेबांचा शिवसैनिक हे काय रसायन आहे याची प्रचिती आज धाराशिव जिल्ह्यात दिसून आली!!

    धारशिव जिल्हातील वडनेर, तालुका परंडा येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील आजी, २ वर्षांचा मुलगा व दोन व्यक्ती रात्रीपासून घराच्या छतावर अडकले होते.
    शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर… pic.twitter.com/VEftZcfytu

    — ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 22, 2025

  • 23 Sep 2025 11:15 AM (IST)

    23 Sep 2025 11:15 AM (IST)

    एवढी अतिवृष्टी या आधी कधीही पाहिली नाही - शरद पवार

    राज्यामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुफान पाऊस झाल्यामुळे शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. यावर दुष्काळासाठी प्रसिद्ध आणि जिथे पाऊस-पाण्याची कमतरता असते अशा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्याचा प्रचंड परिणाम शेतीवर, गुराढोरांवर आणि शेतक-यांच्या संसारांवर झालेला आहे.एवढी अतिवृष्टी या आधी कधीही पाहिली नाही, अशी प्रतिक्रिया जेष्ठ नेते शरद पवार यांनी दिली आहे.

  • 23 Sep 2025 11:05 AM (IST)

    23 Sep 2025 11:05 AM (IST)

    आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांची पुण्यतिथी

    भारतवर्षामध्ये संताची आणि संन्यासी परंपरा मोठी आहे. देवाच्या साक्षीने जीवनाचे सार अगदी साध्या भाषेमध्ये समजून सांगणारे अनेक महान संन्यासी होऊन गेले. त्यापैकी एक म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती.  ते एक भारतीय समाजसुधारक, धर्मसुधारक आणि आर्य समाजाचे संस्थापक होते. त्यांनी वेदांच्या मूळ तत्त्वांकडे परत जाण्याचा संदेश दिला आणि अस्पृश्यता व बालविवाह यांसारख्या सामाजिक प्रथांविरुद्ध आवाज उठवला. ‘सत्यार्थ प्रकाश’ हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे. आजच्या दिवशी स्वामी दयानंद सरस्वती हे स्वर्गवासी आहे. मात्र आजही त्यांचे अनुयायी त्यांचा विचार सर्वदूर पसरवत आहेत.

  • 23 Sep 2025 10:59 AM (IST)

    23 Sep 2025 10:59 AM (IST)

    ७१ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज होणार प्रदान

    २०२३ च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची घोषणा १ ऑगस्ट रोजी करण्यात आली. विजेत्यांना आज सन्मानित केले जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुरस्कार प्रदान करतील. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे होणार आहे. यावर्षी विजेत्यांच्या यादीत अभिनेते शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि विक्रांत मेस्सी यांचा समावेश आहे. मोहनलाल यांना त्याच समारंभात दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

  • 23 Sep 2025 10:56 AM (IST)

    23 Sep 2025 10:56 AM (IST)

    ग्राहकांचे बजेट बिघडणार का?

    भारतात आज 23 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,308 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,366 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,482 रुपये आहे. भारतात काल 22 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,214 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,279 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,410 रुपये होता. भारतात 21 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,215 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,280 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,411 रुपये होता.

Web Title: Marathi news live updates breaking news political news trending news national and international news updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 08:54 AM

Topics:  

  • Breaking News
  • political news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today: बंगालमध्ये पावसाचा धुमाकूळ, शाळा-कॉलेज बंद
1

Top Marathi News Today: बंगालमध्ये पावसाचा धुमाकूळ, शाळा-कॉलेज बंद

सार्वजनिक ठिकाणी नेत्यांचे पुतळे उभारण्यास बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
2

सार्वजनिक ठिकाणी नेत्यांचे पुतळे उभारण्यास बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

‘केबिनमध्ये जास्त वेळ घालवण्याऐवजी जमिनीवर जाऊन कामं करा’; एकनाथ शिंदेंची त्यांच्याच मंत्र्यांच्या कामावर नाराजी
3

‘केबिनमध्ये जास्त वेळ घालवण्याऐवजी जमिनीवर जाऊन कामं करा’; एकनाथ शिंदेंची त्यांच्याच मंत्र्यांच्या कामावर नाराजी

Sharad Pawar News : अशी अतिवृष्टी याआधी पाहिली नव्हती…; माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी राज्य सरकारला दिला मोठा सल्ला
4

Sharad Pawar News : अशी अतिवृष्टी याआधी पाहिली नव्हती…; माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी राज्य सरकारला दिला मोठा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.