
काय आहे आजच्या ठळक घडामोडी
आठवड्याच्या सुरुवातीलाच मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले असून दुहेरी त्रास सहन करावा लागला आहे. मुंबईची लाइफलाइन असणारी मुंबई लोकलबाबत एक मोठी दुर्घटना घडली आहे. डोंबिवलीहून कल्याणच्या दिशेने जाणारी एक डाऊन स्लो लोकल रुळावरून घसरल्याचे समोर आले आहे. यामुळे मध्य रेल्वे ठप्प झाली. तर दुसरी घटना म्हणजे पनवेल स्थानकात प्रवाशांनी भरलेली लिफ्टच खाली कोसळली. या दोन्ही घटनांचा रेल्वे वाहतूकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. हजारो प्रवाशांना याचा फटका बसला आहे. वाचा अधिक माहिती
20 Apr 2026 06:29 PM (IST)
बांगलादेश आणि न्यूझीलंड (BAN vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने ६ गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह बांगलादेशने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
20 Apr 2026 06:26 PM (IST)
Tata IPL PBKS Vs LSG: टाटा आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. काल चंदीगड येथील क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात पंजाब किंग्जने लखनौच्या संघावर एकतर्फी विजय प्राप्त केला आहे. पंजाब किंग्ज आणि संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहेत. याचदरम्यान प्रीती झिंटा आणि अर्शदीप सिंग यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
20 Apr 2026 06:18 PM (IST)
Kia च्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत. कंपनीने कार ऑफर करताना नेहमीच ग्राहकांचा बजेट आणि मागणीवर फोकस केले आहे. यामुळेच तर कंपनीच्या अनेक कार भारतात ग्राहकांच्या आवडत्या कार ठरल्या आहेत. अशीच एक कार म्हणजे Kia Syros.
भारतीय ऑटो बाजारात विविध सेगमेंटमध्ये कार्सची विक्री करणाऱ्या Kia Corporation ने कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपली लोकप्रिय Kia Syros चे 2026 व्हर्जन अधिकृतपणे लाँच केले आहे. या नव्या मॉडेलमध्ये डिझाइन, फीचर्स आणि व्हेरिएंट्समध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. चला याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
20 Apr 2026 06:06 PM (IST)
नीता परब, मुंबई: भांडुप स्टेशन परिसरात स्थानिक बसेसचे होत असलेल्या वारंवार अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची बेफिकीरी आणि निष्क्रियता आता संतापजनक ठरू लागली आहे. नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा महसूल आणि अनधिकृत स्टॉलांना प्राधान्य देणाऱ्या प्रशासनाविरोधात शिवसेना (उबाठा) पक्षाने सोमवारी जोरदार आंदोलन छेडत तीव्र टीका केली आहे.
20 Apr 2026 05:50 PM (IST)
एंजल वन लिमिटेड (एनएसई: एंजनवन, बीएसई: ५४३२३५) या आघाडीच्या फिनटेक प्लॅटफॉर्मने ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी लेखापरीक्षित केलेले एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने सर्व प्रमुख आर्थिक आणि ऑपरेटिंग निकषांवर सातत्यपूर्ण वाढ नोंदवली आहे.
20 Apr 2026 05:35 PM (IST)
भांडुप स्टेशन परिसरात स्थानिक बसेसचे होत असलेल्या वारंवार अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची बेफिकीरी आणि निष्क्रियता आता संतापजनक ठरू लागली आहे. नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा महसूल आणि अनधिकृत स्टॉलांना प्राधान्य देणाऱ्या प्रशासनाविरोधात शिवसेना (उबाठा) पक्षाने सोमवारी जोरदार आंदोलन छेडत तीव्र टीका केली आहे.
20 Apr 2026 05:10 PM (IST)
भारतीय बाजारात कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये Hyundai Venue ही लोकप्रिय एसयूव्ही Hyundai Motor Company कडून विक्रीसाठी उपलब्ध आहे. आता कंपनीने या एसयूव्हीचे नवीन Knight Edition लाँच केले असून, त्यात अनेक आकर्षक बदल करण्यात आले आहेत.
20 Apr 2026 04:50 PM (IST)
कर्जत तालुक्यात पाली खालाटी मध्ये होणाऱ्या जलविद्युत प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे.त्या ठिकाणच्या आदिवासी लोकांना त्रास आणि त्यांच्या जमिनीमध्ये अनधिकृतपणे प्रवेश रोखला जावा अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे वतीने रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली.शेतकऱ्यांनी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन दिले असून टोरंट कंपनी कडून तेथे होणारे अतिक्रमण रोखण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार टोरंट विरोधात कर्जत तालुका शिवसेना ठाकरे पक्ष शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उतरला आहे.
20 Apr 2026 04:40 PM (IST)
आमदार रोहित पवार बारामती तालुक्यामध्ये प्रचारामध्ये सक्रिय झाले आहेत. काटेवाडी या ठिकाणी देवांश लष्कर या चिमुकल्याने केलेले भाषण पाहून आमदार रोहित पवार देखील चकित झाले. त्यांनी त्याचे कौतुक करून उपस्थितांना त्याला शारदानगर शैक्षणिक संकुलामध्ये पुढील शिक्षणासाठी पाठवा, अशी सूचना देखील केली.
20 Apr 2026 04:35 PM (IST)
कल्याणमध्ये काँग्रेसच्या बैठकीत झालेल्या वादानंतर राजकीय वातावरण तापले आहे. कल्याण पूर्वेतील एका सभागृहात झालेल्या बैठकीदरम्यान काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी आणि जिल्हाध्यक्ष राजा पातकर यांच्यात नाश्त्याच्या मुद्द्यावरून वाद झाला. हा वाद चिघळत गेल्यानंतर कांचन कुलकर्णी यांनी पातकर यांच्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप करत त्यांना कानशिलात मारल्याची घटना घडली. या घटनेवर भाजपाने तीव्र प्रतिक्रिया देत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपाचे शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी काँग्रेसमध्ये महिलांना आदर दिला जात नसल्याचा आरोप करत हीच त्या पक्षाची संस्कृती असल्याचे म्हटले. दरम्यान, राजा पातकर यांनी हा वाद संघटनेतील अंतर्गत आणि कौटुंबिक विषय असल्याचे सांगितले. या घटनेमुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले असून, राजकीय पातळीवर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. आता काँग्रेसकडून पुढील प्रतिक्रिया काय येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
20 Apr 2026 04:30 PM (IST)
भिवंडीमध्ये शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कुंदन पाटील यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. अजय नगर येथे झालेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी त्यांचे नियुक्तीबाबत अभिनंदन केले. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना मतभेद विसरून एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संघटन विस्तारावर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
20 Apr 2026 04:25 PM (IST)
सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात मोठी खळबळ उडाली आहे. स्वीकृत नगरसेवक निवडीच्या प्रक्रियेवर गंभीर आरोप करत तब्बल 35 पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी एकत्रित राजीनामे दिले आहेत. आज पक्षाचे अध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडे झालेली स्वीकृत निवड प्रक्रिया पूर्णपणे चुकीची असल्याचा आरोप करत पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “हा लढा तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आहे,” असे सांगत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला. पक्षासाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या व्यक्तींना संधी देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आलाय. “कार्यकर्त्यांनी फक्त कामच करत राहायचं का?” असा सवाल उपस्थित करत या निर्णयाचा निषेध करण्यात आला.
20 Apr 2026 04:20 PM (IST)
सवलतीच्या दरात डिझेल वितरित करणाऱ्या राज्यातील १३६ मच्छीमारी सहकारी संस्थांचे पंप बंद झाले आहेत. मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या डिझेलचा दर ९२ रुपयांवरून वाढून तब्बल १४० रुपये प्रति लिटर झाला आहे. पेट्रोल पंपांवरील डिझेल तुलनेने स्वस्त असल्याने मच्छीमार तिथून डिझेल खरेदी करत आहेत. कंझ्युमर वर्गवारीत बदल होऊन रेल्वे व विमान सेवेसोबत मच्छीमारांचा समावेश झाल्याने ही दरवाढ लागू झाली असून त्यामुळे मच्छीमार बांधव मोठ्या संकटात सापडले आहेत.
20 Apr 2026 04:15 PM (IST)
वसईतील भुईगाव, रानगाव, पाचूबंदर-लांगेबंदर आणि नवापूर किनाऱ्यांवरील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांचे काम CRZ परवानगीअभावी रखडले आहे. 30 कोटींचा निधी मंजूर असूनही प्रकल्प सुरू न झाल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. पावसाळ्यात उधाणाच्या लाटांमुळे कोळीवाडे, शेती आणि किनारी निसर्गसंपदेचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
20 Apr 2026 04:10 PM (IST)
भिवंडीमध्ये शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कुंदन पाटील यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. अजय नगर येथे झालेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी त्यांचे नियुक्तीबाबत अभिनंदन केले. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना मतभेद विसरून एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संघटन विस्तारावर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
20 Apr 2026 04:05 PM (IST)
कर्जतच्या पाली परिसरात टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पाला आदिवासी जनतेने तीव्र विरोध केला आहे. ग्रामपंचायतीची परवानगी न घेता ‘सॉईल टेस्टिंग’ सुरू केल्याचा गंभीर आरोप सरपंचांनी केला आहे. वनहक्क कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनीवर अवलंबून असलेल्या आदिवासींचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. या प्रकल्पामुळे आदिवासींची पारंपरिक संस्कृती आणि जीवनशैलीही धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
20 Apr 2026 03:50 PM (IST)
महाराष्ट्रातील पत्रकारांच्या प्रश्नांसाठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेने सातत्याने लढे दिले आहेत. उदगीर येथे होत असलेल्या या राष्ट्रीय अधिवेशनात पत्रकारांच्या अनेक प्रश्नांचा उहापोह होईल. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करु, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूरचे पालकमंत्री तथा मराठी पत्रकार परिषदेच्या उदगीर येथील राष्ट्रीय अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली
20 Apr 2026 03:45 PM (IST)
सोमवारी (२० एप्रिल) सकाळच्या वेळेत जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात एक बस खोल दरीत कोसळल्याने 20 जणांचा मृत्यू झाला आणि 30 जण जखमी झाले. या संदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी १० वाजण्याच्या सुमारास राम नगर परिसरातील डोंगराळ रस्त्यावरील एका धोकादायक वळणावर बसचा अपघात झाला. या अपघातानंतर आता बचावकार्य सुरू असून घटनास्थळावरून अनेक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
20 Apr 2026 03:40 PM (IST)
प्रसिद्ध लेखिका पल्लवी-माने शिंदे यांच्या नीलकांचन या ललित लेख संग्रहाचं कल्याण येथील मान्यवरांच्या हस्ते दिमाखात प्रकाशन करण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी ललितसंग्रहातील लेखांचं कौतुक करत हा ललितसंग्रह संग्राह्य ठेवावा असा आहे असं मनोगत व्यक्त केलं.या पुस्तकात छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मानवी भावनांवर आधारित आहेत. अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या लेखिका पल्लवी शिंदे-माने यांच्या ‘नीलकांचन’ या ललित लेख संग्रहाचं रविवारी कल्याणच्या बालक मंदिर शाळेच्या सभागृहात प्रकाशन पार पडलं.
20 Apr 2026 03:35 PM (IST)
अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर संभाजीनगर शहरातील बाजारपेठा अक्षरशः गजबजून गेल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. रिअल इस्टेट, सराफा, कापड आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात कोट्यवधींची उलाढाल झाली. खरेदीसाठी नागरिकांनी सकाळपासूनच बाजारपेठांकडे पावले वळवल्याने प्रमुख व्यावसायिक भागांत मोठी गर्दी पाहायला मिळाली. दिवभरात अंदाजे ४०० कोटींहून अधिकची उलाढाल झाल्याचा व्यापारी सूत्रांचा अंदाज आहे.
20 Apr 2026 03:25 PM (IST)
साताऱ्यांमध्ये उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई (Water Shortage) जाणवू लागली आहे. मात्र याचा फटका फक्त सामान्य लोकांना बसत असल्याचे समोर आले आहे. एकीकडे उन्हाळ्याच्या तडाख्यात होरपळणाऱ्या सातारकरांवर पाणी कपातीची सक्ती लादणारी सातारा नगरपालिका, (Satara News) तर दुसरीकडे मंत्र्यांच्या स्वागतासाठी लाखो लिटर पाणी अक्षरशः रस्त्यावर ओतताना दिसत आहे. या दुटप्पी धोरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
20 Apr 2026 03:20 PM (IST)
उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्ख्या मामानेच आपल्या ४ वर्षीय भाचीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या केल्याची समोर आले आहे. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत असून त्याच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते. मात्र तो पोलीस चकमकीत तो ठार झाला.
20 Apr 2026 03:16 PM (IST)
निसर्गाच्या प्रकोपाचा सामना करणाऱ्या जपानमधून एक अतिशय चिंताजनक बातमी समोर येत आहे. आज, सोमवार २० एप्रिल २०२६ रोजी, उत्तर जपानच्या (Japan Earthquake) भूभागाला ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या महाभयंकर भूकंपाने हादरवून सोडले आहे. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की नागरिक भीतीने रस्त्यावर आले असून, त्यापाठोपाठ आलेल्या त्सुनामीच्या इशाऱ्याने संपूर्ण देशात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जपानच्या राष्ट्रीय प्रसारक एनएचके (NHK) ने दिलेल्या माहितीनुसार, किनारपट्टीच्या भागांमध्ये समुद्राचे पाणी वेगाने आत शिरण्याची शक्यता आहे.
20 Apr 2026 02:52 PM (IST)
सायन पनवेल मार्गावर ७ गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. खारघरजवळ मार्गावर ५०० मीटर अंतरात दोन अपघात झाले. यात सुरुवातीला ४ गाड्या एका पाठोपाठ एक धडकल्या, तर तिथून पुढे काही अंतरावर ३ गाड्या एकमेकांवर आदळल्या.. सुदैवाने यात कोणीतीही जिवीतहानी झालेली नाही.
20 Apr 2026 02:40 PM (IST)
अमरावतीच्या परतवाडा येथे घडलेल्या लैंगिक छळ आणि त्रास देण्याच्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे.
या प्रकरणातील आरोपी हुजेर खान याच्यावर आता दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पीडित तरुणीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
20 Apr 2026 02:32 PM (IST)
हावेरी शहराच्या महात्मा गांधी रस्त्यावर रात्रीच्या वेळी काही समाजकंटकांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड केली. "काही समाजकंटकांनी हावेरी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याचे नुकसान केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करत आहेत. नवीन पुतळा पुन्हा बसवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश मंत्र्यांनी यापूर्वीच दिले आहेत. आम्ही देखील हावेरी नगरपालिकेला तशाच सूचना दिल्या आहेत... ही घटना रात्री उशिरा उघडकीस आली... आम्ही या संदर्भात आवश्यक ती पावले नक्कीच उचलू.", असे हावेरीचे जिल्हाधिकारी (DC) विजयमहांतेश यांनी म्हटले.
20 Apr 2026 02:21 PM (IST)
नाशिकच्या सटाणा बाजार समितीबाहेर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलं आहे. बाजार समितीमध्ये व्यापारी-संचालकांचा यांच्यातील वाद उफाळला आणि वातावरण तीव्र झालं.
20 Apr 2026 02:12 PM (IST)
बारामती पोटनिवडणुकीच्या उद्याच्या सभेला सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि खासदार सुप्रिया सुळे व इतर नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पार्थ पवार यांनी दिली.
20 Apr 2026 02:00 PM (IST)
रात्रीच्या शांत अंधारात आकाशभर पसरलेले असंख्य तारे प्रत्येकाच्या मनात कुतूहल निर्माण करतात. हे तारे नेमके कोणते, त्यांची वैशिष्ट्ये काय,चंद्राच्या पृष्ठभागावर नेमके काय दिसते, त्याची निर्मिती कशी झाली असेल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. या नैसर्गिक कुतूहलाला विज्ञानाची जोड देत पन्हाळ्यात आता’ताऱ्यांची सफर’ हा अनोखाउपक्रम सुरू झाला असून,अत्याधुनिक दुर्बिणीतून प्रत्यक्षआकाश दर्शनाचा अनुभव पर्यटकांना दररोज घेता येणारआहे. पन्हाळ्यातील युवक इरफान मुजावर यांनी आपल्याआवडीला नवे रूप देत हा उपक्रम साकारला आहे.
20 Apr 2026 02:00 PM (IST)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यात सभा घेणार आहेत. मात्र, या सभेला आमदार महेश शिंदे उपस्थित राहणार नाहीत. त्यांचा या सभेतील बॅनरवर देखील फोटो नाही. त्यामुळे आमदार शिंदे हे शिवसेनेपासून अंतर राखत असल्याची चर्चा आहे.
20 Apr 2026 01:55 PM (IST)
जागतिक परिस्थिती बेताची असताना त्याचा भारतीय शेअर बाजारावर बऱ्यापैकी परिणाम होताना दिसत आहे. पण असे काही शेअर आहेत ज्यांची ग्रोथ दमदार पाहायला मिळाली. सध्या अशा एका शेअरची चर्चा होताना दिसत आहे ज्याने अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. जो शेअर महिन्याभरापूर्वी अवघ्या ₹२२ वर होता, तो आता ₹४० च्या पार पोहोचला आहे. या जबरदस्त तेजीमुळे नवीन गुंतवणूकदार या शेअरकडे आकर्षित होत आहेत, मात्र आता या स्तरावर गुंतवणूक करणे कितपत फायदेशीर ठरेल, याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
20 Apr 2026 01:50 PM (IST)
लातूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलतीनेच सहा वर्षीय पुतण्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. १७ तासांच्या आत पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्वामी कुटुंबातील दोन अल्पवयीन चुलते बेपत्ता झाले होते. पोलीस तपासात सहा वर्षीय मुलाचा मृतदेह आदळून आला होता. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करत या गुन्ह्याचा १७ तासांच्या आत पर्दाफाश केला. मात्र चुलतीनेच आपल्या पुतण्याची हत्या का केली? जाणून घ्या.
20 Apr 2026 01:35 PM (IST)
आजच्या काळात, एखादी चांगली नोकरी मिळवणे हे एखाद्या प्रचंड कठीण कामाइतकंच कठीण आहे. आपल्या कारकिर्दीत सर्वोच्च शिखर गाठणारे आणि एकाच जागी स्थिर राहणारे यांच्यातील फरक अनेकदा त्यांच्या पदव्यांमध्ये नसून, त्यांच्या दैनंदिन सवयींमध्ये दडलेला असतो. अशी कोणती सवय आहे जी आयुष्याचं एक गुप्त हत्यार म्हणून कार्य करते. ज्याचा वापर जगातील सर्वात यशस्वी व्यक्तींनी एलॉन मस्कपासून ते वॉरेन बफेपर्यंतच्या सर्वांनी केला आहे. जाणून घेऊयात सविस्तर.
20 Apr 2026 01:30 PM (IST)
राज्यात हवामानाचा लहरीपणा पुन्हा एकदा समोर आला असून, पश्चिम महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यावर अवकाळी पावसाचे काळे ढग जमा होऊ लागले आहेत. गेले काही दिवस राज्यात कडाक्याने उन्हामुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अशातच आता उति उष्णतेमुळे कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाची चिन्ह दिसत आहेत. सोमवार, मंगळवार आणि बुधवार दरम्यान प्रामुख्याने दुपारनंतर मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेषतः घाटमाथा आणि ग्रामीण भागात काही ठिकाणी गारपिटीची दाट शक्यता असल्याने बळीराजाच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.
20 Apr 2026 01:25 PM (IST)
देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या भारती एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने अधिकृतपणे त्यांच्या 84 दिवसांच्या व्हॅलिडीटी असलेल्या रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवली आहे. त्यामुळे आतापर्यंत 799 रुपयांत उपलब्ध असणाऱ्या रिचार्ज प्लॅनसाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहेत. कंपनीने जाहिर केलेल्या या निर्णयावर यूजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. जे यूजर्स बजेट फ्रेंडली आणि कमी किंमतीत उपलब्ध असणारे रिचार्ज प्लॅन खरेदी करण्याला प्राधान्य देतात, अशा यूजर्सवर आता कंपनीच्या निर्णयाचा परिणाम होणार आहे.
20 Apr 2026 01:20 PM (IST)
राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू व कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो याचा प्रत्यय सध्या जावळी तालुक्यात दिसत आहे. सातारा-जावळी विधानसभा निवडणूक ही प्रामुख्याने उद्धव ठाकरे गटाचे अमित कदम विरुद्ध विद्यमान मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले अशी अटीतटीची लढत झाली होती.मात्र अवघ्या दोनच वर्षात अमित कदम यांनी भाजपचे (BJP Politics) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासोबत सूत जुळवलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे अमित कदम हे भाजप प्रवेश करणार का? या चर्चांना आता उधाण आले आहे.
20 Apr 2026 01:15 PM (IST)
हिंगोली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी तगादा लावण्याच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपी हा नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक म्हणून कार्यरत आहे. या धक्कादायक घटनेने पोलीस विभागासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
20 Apr 2026 01:06 PM (IST)
प्रसिद्ध चित्रपट निर्माते अॅटली कुमार आणि त्याची पत्नी, निर्माती-अभिनेत्री प्रिया अॅटली कुमार, दुसऱ्यांदा पालक झाले आहेत.अॅटली आणि प्रिया यांच्या घरी एका मुलीचा जन्म झाला असून, या जोडप्याने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. ही बातमी मिळाल्यानंतर, सर्वजण या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत, सर्वांनीच या जोडप्याच्या आनंदात सहभाग घेतला आहे.
20 Apr 2026 01:02 PM (IST)
भाजपाने आणलेले महिला आरक्षण विधेयक प्रत्यक्षात महिलांच्या हितासाठी नसून, लोकसभेचे मतदारसंघ स्वतःला पूरक कसे ठरतील, यासाठी रचलेले एक राजकीय षडयंत्र आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महिला आरक्षण, शेळके अपघात प्रकरण आणि राज्यातील वाढत्या ड्रग्जच्या विळख्यावरून सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
20 Apr 2026 12:48 PM (IST)
गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली ‘स्वीकृत सदस्य’ (नामित सदस्य) नियुक्ती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याच्या विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली असून, यासंदर्भात अधिकृत अध्यादेशही जारी करण्यात आला आहे. राज्यपालांच्या या निर्णयामुळे आता ग्रामीण राजकारणातील अनुभवी कार्यकर्त्यांना ‘बॅकडोअर एन्ट्री’ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पुणे जिल्हा परिषदेत एकूण ७ स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होण्याची शक्यता असून, यातील बहुतांश जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात पडण्याची चिन्हे आहेत. या निर्णयामुळे पुणे जिल्हा परिषदेत लवकरच ७ नवीन सदस्यांची वर्णी लागणार असून, राजकीय वर्तुळात आता कोणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगू लागली आहे.
20 Apr 2026 12:36 PM (IST)
एक मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. पुण्यात पॉस (POS) मशीनवरील नोंद आणि गोदामातील प्रत्यक्ष साठा यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळली आहे. यामुळे पुणे (Pune) जिल्ह्यातील १५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने निलंबित केले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे खत विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
20 Apr 2026 12:12 PM (IST)
उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना व सुट्टीमध्ये आजोळी मामाच्या गावाला जाणाऱ्या मुलांना एसटीच्या १० टक्के हंगामी भाडेवाढचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. याची अंमलबजावणी सुरू झालेली असल्याने प्रवासी पालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पालक सहलींचे आयोजन करतात. उन्हाळ्याच्या दिवसात एसटी बसला होणारी गर्दी लक्षात घेऊन उत्पन्न वाढवण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले आहे.
20 Apr 2026 12:00 PM (IST)
येवला येथील पैठणी हातमाग विणकरांच्या प्रलंबित मागण्यांवर अखेर केंद्र व राज्य सरकारने सकारात्मक दखल घेत मोठा दिलासा दिला आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला “उत्सव भत्ता” मंजूर करण्यात आला असून तो थेट विणकरांच्या बँक खात्यात जमा झाला आहे.
20 Apr 2026 11:50 AM (IST)
भिवंडी तालुक्यातील कोन गावात परिसरात असलेल्या एका टिंबर मार्टमध्ये अचानक भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात घबराट पसरली आणि काही क्षणातच संपूर्ण लाकडाचे गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी आले आहे. घटनेची माहिती मिळताच, कल्याण आणि भिवंडी महानगरपालिकेची अनेक अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली. अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि ती आग आजूबाजूच्या परिसरात पसरण्यापासून रोखली.
20 Apr 2026 11:40 AM (IST)
ऊस पिक , नारळाचे झाड , आंब्याचे झाड व इतर ठिकाणी पडली वीज. सलग चार ठिकाणी विजा पडल्याने नागरिकात भीतीचे वातावरण. विजा पडल्या मात्र सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी नाही...
20 Apr 2026 11:40 AM (IST)
सांगली सह जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात तापमान 41 अंशापर्यंत पोहोचले होते. सांगलीकरांची उन्हाने अंगाची काहीली होत असतानाच सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गारपिटीसह अवकाळी पावसाने अक्षरशः जोडपून काढले. उन्हाच्या कडाक्यात पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता यामुळे सांगलीकरांना दिलासा मिळाला. आज दुपारपासूनच उन्हाचा कडाका वाढला होता मात्र सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. काही क्षणातच अवकाळी पावसाने सांगली शहरासह जिल्ह्यातील काही भागाला अक्षरशः जोडपून काढले. सुमारे पाऊण तास पडलेल्या पावसामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना तिलासा मिळाला. जोरदार पडलेल्या या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले होते.
20 Apr 2026 11:30 AM (IST)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते.दौलताबाद ते छत्रपती संभाजीनगर रोडवरून जात असतांना श्रीकांत शिंदे यांनी ऊसाचा रस पिण्यासाठी ताफा थांबवला.भलामोठा ताफा नेते पोलीस बघून रसवंती चालक गोंधळून गेला.चालकाची अडचण लक्षात घेऊन आ.अर्जुन खोतकर यांनी स्वतः मशीनवर रस तयार करून श्रीकांत शिंदे यांना दिला.यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ हे देखील उपस्थित होते.
20 Apr 2026 11:25 AM (IST)
जागतिक राजकारणाच्या पटावर सध्या एक अत्यंत स्फोटक खेळ सुरू आहे. ओमानचा समुद्र आणि होर्मुझची सामुद्रधुनी आता केवळ पाण्याचे मार्ग राहिलेले नाहीत, तर ते अमेरिका आणि इराण (US-Israel Iran War) यांच्यातील महासंग्रामाचे रणांगण बनले आहेत. अमेरिकेने इराणचे मालवाहू जहाज जप्त करण्याची चूक केली आणि इराणने काही तासांतच आकाशातून मृत्यूचा पाऊस पाडत अमेरिकन नौदलावर थेट ड्रोन हल्ले केले. या घटनेने केवळ आखाती देशांनाच नव्हे, तर संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. इस्लामाबादमध्ये शांतता चर्चेचे वारे वाहत असतानाच, प्रत्यक्ष समुद्रात मात्र युद्धाच्या तोफा धडधडू लागल्या आहेत.
20 Apr 2026 11:20 AM (IST)
पश्चिम आशियात अमेरिका इराणमध्ये वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) यांनी जगाची चिंता वाढवली आहे. उत्तर कोरियाने जपानवर एकाच वेळी अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहे. दुसरीकडे क्लस्टर बॉम्ब वॉरहेड असलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी देखील केली आहे. यामुळे जपानची चिंता वाढली असून देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
20 Apr 2026 11:15 AM (IST)
महाराष्ट्राला प्रचंड कडक उन्हाळा आणि अवकाळी पाऊस असा दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. एका बाजूला 40 अंश पार चढलेला उन्हाच्या पाराने सर्वांच्या जीवाची लाही केली आहे. तर दुसरीकडे अवकाळी गारपिटीने शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लावला आहे. मागील पाच दिवसांपासून उन्हाचा चटका जोरदार वाढलेला असताना कालपासून राज्यात हवामान (IMD Weather Update) बदल झाला आहे. कालपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या असून पूर्वमौसमी पावसाला पोषक असे हवामान तयार झाले आहे.