जोगेश्वरी परिसरातील इमारतीला आग, इमारतीचे चार मजले आगीच्या भक्ष्यस्थानी (फोटो सौजन्य-X)
Jogeshwari Mumbai Fears : मुंबईतील जोगेश्वरी इमारतीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी १०.५० च्या सुमारास जोगेश्वरी पश्चिमेतील जेएनएस बिझनेस सेंटरमध्ये आगीची घटना घडली. या इमारतीमध्ये काहीजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. इमारतीत मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट कार्यालये आहेत. इमारतीत मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट कार्यालये आहेत. त्यामुळे आग आजूबाजूच्या भागात पसरण्याची शक्यता जास्त आहे. या आगीत कोणीही मृत्युमुखी पडले नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या भीषण आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
आगीची माहिती मिळताच इमारत ताबडतोब रिकामी करण्यात आली. मात्र, या आगीत काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रयत्न सुरू आहेत.
#WATCH | Maharashtra: People seen stranded on the top floor of JMS Business Centre in Jogeshwari West area of Mumbai where a massive fire has broken out. Fire tenders present at the spot. More details awaited. pic.twitter.com/htbPRNz5nM — ANI (@ANI) October 23, 2025
आग कशी लागली याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता आहे. आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवल्यानंतरच्या तपासात आगीचे कारण समोर येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांसह, पोलीसदेखील उपस्थित आहेत.
या आगीत आतापर्यंत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आग कशी लागली, त्याचं कारण अद्याप कळलेले नाही. अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. अखेर बऱ्याच प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवून ती आटोक्यात आणली. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांकडून इमारतीत अडकलेल्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.