Maval Politics: मावळचा विकास की केवळ घोषणाबाजी? सुनील शेळके यांचा बाळा भेगडेंना थेट सवाल
“मावळच्या जनतेने मला आमदार म्हणून निवडून दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर विकासकामांना गती मिळाली. मात्र विरोधकांनी दहा वर्षांत तरी २० कोटी रुपयांचा निधी आणला आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विकास, स्थैर्य आणि कामगिरीच्या मुद्द्यावर विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
BMC Mayoral Suspense: आरक्षणाच्या अनिश्चिततेमुळे मुंबईच्या महापौर पदाचा सस्पेन्स कायम
या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, गणेश आप्पा ढोरे, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत, नारायण भालेकर, युवक अध्यक्ष अजित सातकर यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीतील सर्व गट व गणांतील महिला उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीच्या दहा गणांमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व अधिकृत उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात व जल्लोषात भव्य मिरवणूक काढत शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
जिल्हा परिषद – गटनिहाय उमेदवार
टाकवे बुद्रुक–नाणे : अनंता पावशे
वराळे–इंदोरी : पल्लवी संदीप दाभाडे
खडकाळा–कार्ला : दीपाली दीपक हुलावळे
कुसगाव–काले : संतोष गबळू राऊत
सोमाटणे–चांदखेड : मनीषा नितीन मुन्हे
पंचायत समिती – गणनिहाय उमेदवार
टाकवे बुद्रुक : प्राची देवा गायकवाड
नाणे : आशा ज्ञानेश्वर मोरमारे
इंदोरी : दिलीप नामदेव ढोरे
कार्ला : रेश्मा राजू देवकर
खडकाळा : समीर खंडू जाधव
कुसगाव : योगेश मुरलीधर लोहोर
काले : शैला रामचंद्र कालेकर
सोमाटणे : साहेबराव नारायण कारके
चांदखेड : सुनिता मनोहर येवले
Nashik News : तब्बल चार वर्षात 1985 बालकाचा मृत्यू , नाशिकमधील धक्कादायक आकडेवारी समोर
या सर्व उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आले आहेत. “मावळ तालुक्यातील विकासकामे, स्थैर्य आणि आमची ठोस कामगिरी पाहता जनता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसलाच कौल देईल,” असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.






