पिंपरी : म्हाडाचे घर मिळवून देतो असे सांगून नागरिकांकडून लाखो रुपये उकळले. याप्रकरणी एका इसमाविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत उत्कर्ष चौक, वाकड येथे ही घटना घडली. याप्रकरणी एका महिलेने 21 एप्रिल रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अनिकेत राजराम यादव (वय 34, रा. उत्कर्ष चौक, वाकड) या इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीने आरोपीकडे विश्वासाने दिलेले चार तोळे आठ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एक लाख 65 हजार रुपयांचा ऐवज तसेच फिर्यादी यांना म्हाडाचे घर मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून दोन लाख 22 हजार चेक आणि रोख स्वरुपात घेतले. तसेच फिर्यादी यांच्या ओळखीचे परमेश्वर शरणअप्पा तेली यांनाही म्हाडाचे घर मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून दोन लाख रुपये आरोपीने घेतले. पैसे घेऊन म्हाडाचे घर मिळवून न देता फसवणूक केली. अन्य नागरिकांना देखील म्हाडाचे घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
[read_also content=”जयंतराव थापा मारून दिवस ढकलणे बंद करा; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आवाहन https://www.navarashtra.com/maharashtra/stop-pushing-the-day-by-slapping-jayantrao-appeal-of-bjp-state-president-chandrakant-patil-nrdm-272097.html”]






