हातकणंगले : राज्याचे महत्वाची जबाबदारी सांभाळणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, थोर समाजसेवक महात्मा जोतीबा फुले या महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज भारतीय लोकशक्ती पार्टीच्या वतीने सांगली-कोल्हापुर रस्ता हातकणंगले येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ईश्वर यमगर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध करत भारतीय जनता पार्टीच्या जबाबदार मंडळींकडून वारंवार होत असलेल्या महापुरूषांच्या अवमानाचा बदला जनता नक्कीच घेईल तसेच येणाऱ्या निवडणुकीत यांना जनता सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.
ज्या महापुरुषांमुळे भारतीय लोकशाही समृद्ध झाली, तळागाळातील लोकांपर्यत शिक्षणाची गंगा पोहचली आशा महापुरुषांचा अवमान सहन करून घेणार नाही असा इशाराही यमगर यांनी दिला. यावेळी उपस्थित भारतीय लोकशक्ती पक्षाच्या समर्थकांनी मंत्री पाटील यांच्या निषेधाच्या घोषना देत, जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी भारतीय लोकशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. ईश्वर यमगर, उपाध्यक्ष सचिन कुंभार, सचिव महेश मुराळ, ऋषिकेश गुडे, अक्षय घोळपे, सुधीर कोठावळे, पंकज कोठावळे, आदित्य कोठावळे, रितेश कोठावळे, आकाश कोठावळे, विश्वास डांगे उपस्थित होते.