लाडक्या बहिणींना मिळणार दिलासा; e-KYC करताना केलेली चूक येणार सुधारता, आता अंगणवाडी सेविका थेट... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहिण’ योजनेतून अनेक महिलांना वगळण्यात आले आहे. काही महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांना अनुदानाचा हफ्ता अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे महिलांची निराशा झाली आहे. आता यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करताना अनेक महिलांनी चुका केल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळणे बंद झाले आहे. लाभ बंद झाल्याने लाभार्थी महिलांमधून रोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ई-केवायसीमधील ही चूक सुधारण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून लाभ बंद झालेल्या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पुढे सुरु ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी राज्य राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अंतिम मुदत दिली होती. परंतु, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करतांना अनेक महिलांनी चुका केल्या आहेत.
हेदेखील वाचा : ‘आम्हाला अनुदानाचे थकित हफ्ते मिळणार तरी कधी?’ लाडक्या बहिणींची सरकारला हाक
दरम्यान, ज्या महिलांनी चुका केल्या अशा महिलांची नावे तात्पुरत्या अपात्र यादीत समाविष्ट झाल्याने या महिलांना लाभापासून वंचित राहावे लागले आहे. ज्या महिलांनी मुदतीच्या आत ई-केवायसी पूर्ण केली नाही, अशा महिलांच्या बँक खात्यात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांमधून शासनाविरोधात रोष व्यक्त केला जात असून, ई-केवायसीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली जात आहे. यावर तोडगा म्हणून योजेनच्या निकषानुसार लाभार्थी महिलांची क्षेत्रिय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात असून, या संदर्भात राज्य शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
ई-केवायसी प्रक्रियेने महिलांची वाढवली डोकेदुखी
लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन ई-केवायसी प्रक्रियेने राज्यभरात महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक महिलांना पैसेच मिळाले नाही. ई-केवायसी करताना त्रुटी राहिल्यामुळे पैसे जमा झाले नसल्याचे समोर आले आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी आता ई-केवायसी करताना झालेल्या चुका दुरूस्त करण्याबाबत महिलांना माहिती दिली.
हेदेखील वाचा : PMC Elections 2026 : लाडक्या बहिणींच्या हातात हप्ता अन् मनात प्रश्न! महिला मतदार कुणाच्या पारड्यात?






