रोहित पवारांचे अशोक चव्हाणांना प्रत्युत्तर (फोटो- सोशल मिडिया)
नांदेड: राज्याच्या राजकारणात सतत काहीतरी घडत असते. राजकारण म्हटले की एकमेकांवर टीका करणे हे आलेच. दरम्यान नांदेडमध्ये एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. त्याला आमदार रोहित पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे ही जाणून घेऊयात.
राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्यानिमित नांदेडमध्ये त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार अशोक चव्हाण बोलत होते. रोहित पवार यांनी मला कर्जत जामखेडमध्ये एका कार्यक्रमाला बोलावले होते. तेव्हा मी दुसऱ्या पक्षात होतो. मात्र तिथल्या लोकांनी मला वेगळेच सांगितले. कर्जत-जामखेडमध्ये खरा माणूस राम शिंदेच आहेत असे मला सांगण्यात आले. या टिकेला आता रोहित पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
रोहित पवारांचे ट्वीट काय?
आदरणीय अशोक चव्हाण साहेब, विचारधारेशी निष्ठा नसेल तर राजकीय अनुभवाला काहीच अर्थ राहत नाही, ही पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या आमच्यासारख्या नव्या पोरांची आपल्यासारख्या जेष्ठ आणि अनुभवी नेत्यांकडे तक्रार आहे.
आदरणीय अशोक चव्हाण साहेब, विचारधारेशी निष्ठा नसेल तर राजकीय अनुभवाला काहीच अर्थ राहत नाही, ही पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या आमच्यासारख्या नव्या पोरांची आपल्यासारख्या जेष्ठ आणि अनुभवी नेत्यांकडे तक्रार आहे.
बाकी, आपल्याबद्दल कायमच आदर आहे,…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 14, 2025
बाकी, आपल्याबद्दल कायमच आदर आहे, होता आणि राहील, परंतु अनेक जेष्ठ नेत्यांच्या भूमिका आणि निष्ठा एवढ्या लवकर बदलतात हे बघून आमच्यासारख्या नव्या पोरांना, कार्यकर्त्यांना दुःख होतं, बाकी काही नाही!
काय म्हणाले होते अशोक चव्हाण?
अहिल्यानगरमधून जो व्यक्ती निवडून येतो तो राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून निवडून येऊ शकतो. राम शिंदे विधान परिषदेचे सभापती म्हणून नियुक्ती झालेली नाही. तर ते बिनविरोध निवडून आल्या आहेत.
रोहित पवारांना होमग्राऊंडवर मोठा धक्का
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना त्यांच्या होमग्राऊंडवरच मोठा धक्का बसल्याची माहिती समोर आली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या नगराध्यक्षा उषा राऊत यांच्याविरोधात १७ पैकी १३ नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यामुळे रोहित पवार गटातील नगरसेवकांमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कर्जत जामखेडच्या राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
Rohit Pawar News: रोहित पवारांना होमग्राऊंडवर मोठा धक्का; कर्जत जामखेडमध्ये राजकीय उलथापालथ
कर्जत नगरपंचायतीत सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे १२, काँग्रेसचे ३ आणि भाजपचे २ नगरसेवक आहेत. पण रविवारी रात्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील ८ आणि काँग्रेसच्या ३ नगरसेवकांनी भाजप आमदार राम शिंदे यांच्यासोबत गुप्त बैठक घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत नगरपंचायतीतील सत्तांतराची रणनीती आखण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आज सकाळी उषा राऊत यांच्या विरोधात हा अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला.