संगमनेर रेल्वेमार्गावरून आमदार सत्यजित तांबे अधिवेशनात आक्रमक
या हिवाळी अधिवेशनात नाशिक-पुणे रेल्वेचा प्रश्न आमदार सत्यजित तांबे आणि आक्रमकपणे उचलून धरला. अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, तालिका सभापती कृपाल तुमाने होते तर विविध मंत्री व इतर सदस्य सभागृहामध्ये उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, नाशिक पुणे रेल्वे करता बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या माध्यमातून रेल्वे मंजूर झाली. राज्य शासन महारेल विभागाच्या वतीने रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण झाले.
Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये महाबळेश्वरचा फील! पार थेट ७ अंशांपर्यंत घसरले
तांबे म्हणाले, या रेल्वेमार्गाकरता 100 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण झाले असून यासाठी राज्य शासनाकडून 316 कोटी रुपये खर्च झाला आहे. हा मार्ग अत्यंत नैसर्गिक आणि सोयीस्कर असताना आता मार्ग बदलण्याचा घाट घातला जात आहे. नाशिक सिन्नर संगमनेर जुन्नर नारायणगाव खेड चाकण असा हा मार्ग अत्यंत गरजेचा आणि
योग्य आहे.
या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला सुद्धा आहे. त्यामुळे शिवनेरी किल्ला त्याचबरोबर अष्टविनायकांमधील ओझर आणि लेण्याद्री हे तीर्थस्थळ सुद्धा जोडता येणार आहे. मात्र आता शिर्डी अहिल्यानगर हा मार्ग कोणत्या उद्देशाने झाला. हे काही कळत नाही. या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र घेऊन राज्य शासनाने केंद्राकडे पाठपुरावा करून हा मार्ग संगमनेर मार्गेच केला पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे. याशिवाय ३१६ कोटी रुपये खर्च करून राज्य सरकारने जी १०० हेक्टर जमीन ताब्यात घेतली आहे. त्याचे राज्य सरकार काय करणार आहे हा मोठा प्रश्न आहे.
पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी सहा हजार कोटींचा खर्च; मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांना भेटणार
बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गेच झाली पाहिजे याकरता आमदार सत्यजित तांबे यांनी सर्वपक्षीय नागरिकांची बैठक घेतली असून, या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींची ते बैठक घेणार आहेत. सोशल मीडिया कॅम्पेन, सह्यांची मोहीम, ऑनलाइन ई-मेल असे जन आंदोलन सुरू असून, अधिवेशनामध्ये सुद्धा आमदार तांबे यांनी आक्रमक पद्धतीने रेल्वेची मागणी लावून धरली आहे. राजकारण न करता सर्वांनी संगमनेर मार्गे रेल्वे करता पाठिंबा द्यावा असे आवाहन रेल्वे समितीच्यावतीने करण्यात आले आहे.






