जोपर्यंत हिंदू मजबूत होणार नाहीत तोपर्यंत...; मोहन भागवतांचे सूचक विधान
Hindu-Muslim Politics: “भारताची एकता ही हिंदूंच्या सुरक्षिततेची हमी आहे. हिंदू समाज आणि भारत यांच्यात खोल संबंध असून, हिंदू समाज जबाबदार आणि सक्षम झाला तरच भारताला खरे वैभव प्राप्त होईल.’ असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. इतकेच नव्हे तर, “जोपर्यंत हिंदू समाज स्वतः मजबूत होत नाहीत, तोपर्यंत जगात कोणीही त्यांची चिंता करणार नाही.” असंही त्यांनी म्हटलं आहे. ऑर्गनायझर वीकली या संघाच्या मुखपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत, भागवत यांनी शेजारील देशांमध्ये सुरू असलेल्या हिंदूंवरील अत्याचारांवर आणि मानवाधिकार संघटनांच्या या संदर्भातील मौनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदू समाजाच्या एकतेवर भर देताना म्हटले आहे की, “जर भारतातील हिंदू शक्तिशाली झाले, तर जगभरातील हिंदूंनाही त्याचा आधार आणि बळ मिळेल.हिंदू समाज आणि भारत हे एकमेकांशी खोलवर जोडलेले आहेत. त्यामुळे हिंदू समाजाची प्रतिष्ठा ही भारताच्या गौरवाशी थेट संबंधित आहे.जे लोक आज स्वतःला हिंदू मानत नाहीत, तरी एक काळ असा होता की त्यांच्या पूर्वजांचे मूळ हिंदू संस्कृतीतच होते. अशा सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे आणि एकत्र ठेवण्याचे कार्य केवळ एक मजबूत व समावेशक हिंदू समाजच करू शकतो.” तसेच, “जर भारतातील हिंदू समाज मजबूत झाला, तर स्वाभाविकपणे जगभरातील हिंदूंनाही मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक बळ मिळेल. हे कार्य सध्या सुरू आहे, आणि जरी ते अद्याप पूर्ण झालेले नसले तरी, हळूहळू ही परिस्थिती विकसित होत आहे.” असंही त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे.
‘कभी खुशी कभी गम’मधील छोटी करीना होणार लवकरच आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचा संदर्भ देत भागवत म्हणाले, “या वेळी या घटनांविरोधात व्यक्त झालेला जनक्षोभ यापूर्वी कधीही पाहायला मिळाला नव्हता. विशेष म्हणजे आता तिथले हिंदूही ठामपणे सांगत आहेत. ‘आम्ही पळून जाणार नाही, आम्ही आमच्या हक्कांसाठी लढू . त्यांच्या मते, ही प्रतिक्रिया म्हणजे हिंदू समाजात निर्माण होत असलेल्या अंतर्गत शक्तीचा प्रत्यय आहे. ही वाढती ताकद आणि जनजागृती भविष्यात हिंदू समाजाच्या अधिक सशक्तीकरणाला कारणीभूत ठरेल, असे त्यांनी विश्वासाने सांगितले.
भागवत यांनी हेही स्पष्ट केले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जगभरातील हिंदू समाजाच्या हितासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेल, मात्र आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करत. संघाचे स्वयंसेवक धर्म, संस्कृती आणि समाजाचे रक्षण करताना हिंदू राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतःला समर्पित करतात आणि त्या उद्दिष्टासाठी कार्य करण्याची शपथ घेतात.”
एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवीच्या आई- वडिलांची भेट; आरोपींवर कठोर कारवाईचं दिलं आश्वासन
मोहन भागवत म्हणाले की, ‘हिंदू’ या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे. काळानुरूप बदलाला वाव आहे. संघाच्या शपथेत असेही म्हटले आहे की “मी संघाचा एक भाग आहे”. याचा अर्थ असा की मी संघटन बांधण्यास मदत करतो. म्हणून, कोणत्याही गोष्टीवर वेगवेगळे मत असण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. जेव्हा सर्वजण एखाद्या गोष्टीवर सहमत असतात तेव्हा प्रत्येकजण स्वतःचे मत विसरून तो निर्णय स्वीकारतो. मग सर्वजण एकत्र काम करतात आणि त्याच दिशेने जातात. आपण कायम टिकणाऱ्या गोष्टी जपतो आणि काळाबरोबर बदलणाऱ्या गोष्टी बदलतो.