मयुर फडके, मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दाखल केलेला मनी लाँड्रिंगचा खटला (Money Laundering Case) रद्द करण्याच्या मागणीसाठी (Cancellation Request) माजी ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Former Rural Development Minister and NCP leader Hasan Mushrif) यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात (High Court Mumbai) धाव घेतली आहे. याचिकेवर मंगळवारी तातडीने सुनावणी पार पडणार आहे (The petition will be heard immediately on Tuesday).
कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुश्रीफ यांच्या पश्चिम महाराष्ट्र शहरातील निवासस्थानी ईडीने झडती घेतली आणि मुश्रीफ यांना सोमवारी ईडीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मुश्रीफ यांचे मुलगे नवी, आबिद आणि साजिद हे संचालक अथवा भागधारक असलेल्या सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यासह अन्य एका कंपनीमार्फत कोणताही मोठा व्यवसाय होत नसताना अनेक कोटी रुपयांची संशयास्पद उलाढाल झाल्याचा दावा ईडीने केला आहे. त्याविरोधात मुश्रीफ यांनी न्यायालयात धाव घेतली असून ईडीने नोंदवलेला ईसीआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. याचिका न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आली असता खंडपीठाने या याचिकेवर मंगळवारी सुनावणी घेण्याचे निश्चित केले.
[read_also content=”छातीवर काढला होता गर्लफ्रेंडचा टॅटू, तिथंच मारला चाकू, अडल्ट स्टारने घेतला प्रियकराचा जीव केला घात आणि… https://www.navarashtra.com/crime/inside-story-shocking-news-onlyfans-star-courtney-clenney-fatally-stabbed-boyfriend-christian-obumseli-on-his-chest-explained-full-case-nrvb-375850.html”]
भाजपचे किरीट सोमय्या यांच्यामार्फत राजकीय प्रतिस्पर्ध्यांकडून मुश्रीफ यांना लक्ष्य केले जात आहे. मुश्रीफ यांना ईडीच्या खटल्यांमध्ये अडकवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न होत असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. कोणताही खटला नसताना तसेच अधिसूचित गुन्ह्याशी संबंधित स्थगिती असतानाही ईडीकडून त्यांना अटक करण्याच प्रयत्न केला जात असल्याचा दावाही याचिकेत केला आहे.
[read_also content=”डेटिंग ॲपवर प्रेम, ब्रेकअप आणि ब्रायफ्रेंडच्या फ्लॅटवरच झाला मृत्यू…एअर होस्टेसच्या हत्येचे उकलले गूढ, तुम्हीच वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/crime/bengaluru-crime-news-a-murder-case-registered-in-airhostess-who-died-from-4th-floor-of-apartment-boyfriend-in-police-custody-nrvb-375804.html”]
मुश्रीफ यांच्यावर सूड उगवण्यासाठी ईडीने द्वेषयुक्त आणि चुकीच्या हेतूने ही कार्यवाही करीत आहे. अलीकडच्या काळात ईडीचा वापर सूडबुद्धीने राजकीय कारकिर्द उध्वस्त आणि गंभीर नुकसान पोहोचवण्यासाठी केला जात असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे ईडीकडून मुश्रीफ यांना बजावण्यात आलेले समन्स रद्द करण्यात यावे आणि ईडीला कोणतीही जबरदस्तीची कारवाई करण्यापासून रोखण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही याचिकेत केली आहे.