फोटो - सोशल मीडिया
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि कॉन्ट्रॅक्टर चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राजकोट किल्ला परिसरारत भेट दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.
हेदेखील वाचा : ‘माझ्याकडे कोणतीही वर्कऑर्डर नाही’; पुतळा कोसळण्याच्या घटनेवर चेतन पाटील यांचा दावा
राजकोट किल्ला परिसरात गेलेले संजय राऊत म्हणाले, ‘पुतळा प्रकरणात सरकार यामध्ये अडकलं आहे. पुतळा कोसळ्याची घटना घडल्याने या कामातील भ्रष्टाचार समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली असली तरी त्यांची माफी महाराष्ट्राने स्वीकारायला पाहिजे. तुमच्या माफीला विचारतोय कोण? काम देण्याची शिफारस कोणाची? कोणामुळे काम मिळेल? हे आधी समजणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत ही घटना घडल्याने तुम्हाला नाक रगडावचं लागेल. अनुभवशून्य कलाकाराला काम दिल्याने ही घटना घडली’, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच ते पुढे म्हणाले, ‘सरकार निर्लज्जपणे आरोपींना पाठीशी घातलंय. ‘सरकारला जोडो मारो आंदोलन’ हीच सरकारची लायकी आहे. ही सुपारी आहे, त्याची सुपारी कोणी दिली? कारवाई नाही. या पुतळाप्रकरणात कोट्यवधींचा व्यवहार झाला आहे. आता सरकार काहीही करू शकतं. त्यांनी जरी माफी मागितली. माफी मागून असा विषय सुटतो का? 40 गद्दारांना माफी करायची का मग? असा सवालही त्यांनी केला.
हेदेखील वाचा : मतं खाण्यासाठी राज्यात तिसरी आघाडी, राज ठाकरे होणार सामील? रोहित पवार यांची सूचक राजकीय भविष्यवाणी
उद्धव ठाकरे यांचा माजी राज्यपालांवर निशाणा
यावर उद्धव ठाकरे म्हणाले होते की, तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी स्वतः शिवाजी महाराजांचा अपमान केला असता. पण कोश्यारीची टोपी वाऱ्याने उडाली असं कळलं नाही. गद्दार केसरकर म्हणाले, ‘काही तरी चांगल घडेल. त्यामुळे आम्ही आता ठरवलं आहे की, 1 सप्टेंबर रोजी दुपारी 11 वाजता हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या गेटवर जाऊन सरकारचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.