संग्रहित फोटो
एकाच दिवशी दोन्ही महत्त्वपूर्ण शासकीय उपक्रम राबवावे लागणार असल्याने परीक्षा केंद्रावरील सुरळीत व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, कर्मचारी उपलब्धता आणि वाहतूक व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणावर गुंतणार असल्याने एमपीएससी परीक्षेच्या व्यवस्थापनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
एमपीएससी परीक्षा सतत पुढे ढकलल्या जातात आणि वेळेवर होत नाहीत. २१ डिसेंबरला नगरपरिषद निकाल आणि त्याच दिवशी संयुक्त गट-ब पूर्व परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. परीक्षा होणार की पुढे जाणार आयोगानं तात्काळ स्पष्टता द्यावी. -सुदर्शन खरात, परीक्षार्थी
दरम्यान, एमपीएससी दिशेने अद्याप यासंदर्भात कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. त्यामुळे लाखो परिक्षार्थी परीक्षेच्या तारखेच्या निश्चिततेकडे चिंताग्रस्त नजरेने पाहत आहेत.
एमपीएससी आयोगामार्फत घेण्यात येणारी संयुक्त पूर्व गट ‘ब’ २०२५ (अराजपात्रित) ही परीक्षा २१ डिसेंबरला होतं आहे, अशातच आज होणारी नगरपरिषद व नगरपंचायतची मतमोजणी आत्ता २१ डिसेंबरला होणार आहे, त्यामुळे २१ डिसेंबरची संयुक्त पूर्व परीक्षा आहे त्याचंवेळी होणार की पुढे जाणार याबद्दल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींनमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. -महेश घरबुडे, अध्यक्ष स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन
परीक्षेमार्फत भरण्यात येणारी पदे
सहायक कक्ष अधिकारी – ०३ पदे
राज्य कर निरीक्षक – २७९ पदे
पोलीस उपनिरीक्षक – ३९२ पदे
विद्यार्थ्यांसाठी अनिश्चितता हीच सर्वात मोठी अडचण आहे. म्हणूनच आयोगाने २१ डिसेंबरच्या संयुक्त गट-ब परीक्षेबाबत लवकर स्पष्ट करुन निर्णय घ्यावा आणि ती फार अनिश्चित काळासाठी पुढे ढकलू नये. -ओंकार गडवेकर, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी






