• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Msn Raj Thackeray On Dr Babasaheb Ambedkar Jayanti In Marathi

Raj Thackeray : “मुसलमानांनी भारतावर-हिंदूंवर आक्रमणं केली म्हणून…”, आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

Raj Thackeray On Dr Babasaheb Ambedkar Jayanti : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (14 एप्रिल) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने खास पोस्ट लिहिली आहे. राज ठाकरेंची ही पोस्ट चर्चेत आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 14, 2025 | 01:18 PM
आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत (फोटो सौजन्य-X)

आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Raj Thackeray On Dr Babasaheb Ambedkar Jayanti in Marathi : आज भारतीय संविधानाचे शिल्पकार, महान समाजसुधारक, सामाजिक समतेचे प्रखर पुरस्कर्ते, भारतरत्न बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांची आज (14 एप्रिल) जयंती आहे. डॉ. भीमराव आंबेडकर यांनी केवळ दलित, वंचित, मागास आणि गरीबांच्या हक्कांसाठी लढा दिला नाही तर ते महिलांच्या हक्कांचे मोठे समर्थक देखील होते.आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचा उत्साह देशभरात दिसून येत आहे. भीम जयंतीच्या उत्साहासह त्यांच्या विचारांना जागर केला जात आहे. याचदरम्यान आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने खास पोस्ट लिहिली आहे. राज ठाकरे यांची ही पोस्ट चर्चेत आली.

भारतीय घटनेचे शिल्पकार कलाप्रेमी देखील होते; जाणून घ्या राजकारणापलीकडचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर

राज ठाकरे यांची पोस्ट

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची आज जयंती. आज या जयंतीनिमीत्त संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला बाबासाहेबांनी या लढ्याला कसा पाठींबा दिला होता आणि इतकंच नाही तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र नको म्हणून जे काही तर्क पुढे केले जात होते त्याला त्यांनी कसं सडेतोड उत्तर दिलं होतं, याचं स्मरण होणं आवश्यक आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या सुरुवातीच्या काळात, कॉम्रेड डांगे, एस.एम. जोशी, आचार्य अत्रे आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या इतर नेत्यांनी, बाबासाहेबांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती आणि या लढ्यासाठी त्यांचं आणि त्यांच्या अनुयायांचे सहकार्य मागितलं होतं. यावेळेस बाबासाहेबांनी देखील माझा शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीशी जिब्राल्टरच्या खडकासारखा उभा राहील असं सांगितलं होतं. इतकंच नाही तर पुढे मुंबईतील राजगृह हे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बैठकांचे केंद्र बनलं. या बैठकांमध्ये आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे देखील उपस्थित असायचे.

स्वतः बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९४८ रोजी धार कमिशनला मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य असावं या मागणीला पाठींबा देणारं निवेदन दिलं होतं. या निवेदनात मुंबई हा महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग कसा आहे याचं विस्तृत विवेचन आहे. आणि हे विवेचन Maharashtra As A Linguistic Province मध्ये वाचता येईल.

हे सगळं सविस्तर सांगायचं कारण असं की बाबासाहेबांनी पुढे जाऊन मुंबई हा महाराष्ट्राचा भाग कधीच नव्हता किंवा मुंबईत फक्त मराठी भाषिकांची लोकसंख्या अधिक आहे म्हणून मुंबई महाराष्ट्राचा भाग कसा होऊ शकतो असे जे तर्क पुढे केले जात होते त्याला सडेतोड उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते की मुसलमानांनी भारतावर-हिंदूंवर आक्रमणं केली म्हणून हिंदू-मुसलमानांची मूळ ओळख पुसली गेली नाही. मुंबईत गुजराती किंवा इतर भाषिक आले म्हणजे मुंबईची मूळ ओळख पुसली गेली असं होत नाही, मुंबईची मूळ ओळख ही मराठी भाषिकांचा प्रांत अशीच आहे आणि ती बदलता येणार नाही.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची आज जयंती. आज या जयंतीनिमीत्त संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला बाबासाहेबांनी या लढ्याला कसा पाठींबा दिला होता आणि इतकंच नाही तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र नको म्हणून जे काही तर्क पुढे केले जात होते त्याला… pic.twitter.com/CiFzSYDRu6 — Raj Thackeray (@RajThackeray) April 14, 2025

पुढे बाबासाहेबांचं निधन झालं. पण त्यानंतर दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर बी.सी. कांबळे यांच्यासारखे नेते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्वेषाने उतरले. बॅरिस्टर बी.सी. कांबळे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलकांवर होणाऱ्या पोलिसी कारवायांवर विधानसभेत प्रश्न उपस्थित करून मोरारजी देसाईंना जेरीस आणलं होतं.

पुढे १९६० ला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. हा प्रसंग पहायला बाबासाहेब नव्हते. पण या लढ्यातील बाबासाहेबांचं योगदान हे विसरता येणार नाही.

आज पुन्हा एकदा मुंबईत मराठी भाषेला, मराठी माणसाला दुय्यम दर्जा दिला जात असताना, या लढ्यासाठी किती उत्तुंग माणसांनी आपली शक्ती खर्ची केली होती, हे मराठी माणसाने विसरू नये. आणि हे जर आपण विसरलो आणि मराठी म्हणून एकत्र नाही आलो तर या लढ्याला काय अर्थ?

आपण मराठी म्हणून एकत्र येणं, मराठी समाजाने जातीच्या भिंती उध्वस्त करणं आणि या प्रांताला वैभव प्राप्त करून देण्याची शपथ घेणं हे आजच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं योग्य स्मरण ठरेल. अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे.

Ambedkar Jayanti: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त असे द्या भाषण

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि बाबासाहेबांनी दिलेला पाठिंबा यावर भाष्य करताना मुंबईत सध्या मराठी माणसाच्या मुंबईतील स्थितीवर चर्चा केली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पुढे 1960 ला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. हा प्रसंग पहायला बाबासाहेब नव्हते. पण या लढ्यातील बाबासाहेबांचं योगदान हे विसरता येणार नाही असेही राज ठाकरे यांनी नमूद केले.

Web Title: Msn raj thackeray on dr babasaheb ambedkar jayanti in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 01:18 PM

Topics:  

  • Ambedkar Jayanti 2025
  • Dr. Babasaheb Ambedkar
  • MNS
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Rohit Pawar Meet Raj Thackeray : रोहित पवारांच्या लढ्याला आले बळ! FIR संबंधित राज ठाकरेंनी सुपुर्द केले दोन दाखले
1

Rohit Pawar Meet Raj Thackeray : रोहित पवारांच्या लढ्याला आले बळ! FIR संबंधित राज ठाकरेंनी सुपुर्द केले दोन दाखले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Eknath Shinde : “पक्षाकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम”, एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde : “पक्षाकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम”, एकनाथ शिंदेंचा विश्वास

Mar 05, 2026 | 05:36 PM
Middle East War : भारतासाठी ऊर्जा संकट! कतारमधील इराणी हल्ल्यामुळे LNG पुरवठा ठप्प; किंमती दुप्पट होण्याची शक्यता

Middle East War : भारतासाठी ऊर्जा संकट! कतारमधील इराणी हल्ल्यामुळे LNG पुरवठा ठप्प; किंमती दुप्पट होण्याची शक्यता

Mar 05, 2026 | 05:14 PM
रामराव वडकुतेंच्या उमेदवारीने सर्वांनाच धक्का! नांदेडला मिळाले राज्यसभेत आणखी एक नेतृत्व

रामराव वडकुतेंच्या उमेदवारीने सर्वांनाच धक्का! नांदेडला मिळाले राज्यसभेत आणखी एक नेतृत्व

Mar 05, 2026 | 05:10 PM
MSRTC: आता एसटीचा प्रवास होणार सुखकर, चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची

MSRTC: आता एसटीचा प्रवास होणार सुखकर, चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची

Mar 05, 2026 | 05:08 PM
Michael Trailer: मायकेल ट्रेलर रिलीज; मायकेल जॅक्सनच्या आठवणींना उजाळा, पुतण्या निभावणार डान्सरची भूमिका

Michael Trailer: मायकेल ट्रेलर रिलीज; मायकेल जॅक्सनच्या आठवणींना उजाळा, पुतण्या निभावणार डान्सरची भूमिका

Mar 05, 2026 | 05:00 PM
Summer special List : उन्हाळ्यात पिकनिकला जाताय ? मग ‘या’ वस्तू तुमच्या बॅगेत असल्याच पाहिजेत

Summer special List : उन्हाळ्यात पिकनिकला जाताय ? मग ‘या’ वस्तू तुमच्या बॅगेत असल्याच पाहिजेत

Mar 05, 2026 | 04:58 PM
नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेखाली महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक; प्रशासनाला दिले ‘हे’ निर्देश

नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेखाली महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक; प्रशासनाला दिले ‘हे’ निर्देश

Mar 05, 2026 | 04:57 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM
Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Mar 05, 2026 | 03:15 PM
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.