आरोपी रोहित आर्याचा एन्काउंटर (फोटो - सोशल मीडिया)
आरोपी रोहित आर्याचा पोलिसांकडून एन्काउंटर
पवईत रंगले होते ओलिसनाट्य
अनेक मुलांना ठेवले होते डांबून
Deepak Kesarkar: मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलीस कारवाईदरम्यान त्याला गोळी लागली आणि गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आता या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकरणात माजी मंत्री आणि शिवसेना नेते दीपक केसरकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईतील पवई येथे रोहित आर्याचा पोलिसांनी एन्काउंटर केला होता. दरम्यान आता या प्रकरणात दीपक केसरकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. रोहित आर्याचा एन्काउंटर झाला त्या दिवशी पोलिसांनी दीपक केसरकर यांना रोहित आर्यशी बोलण्याची विनंती केल्याचे समजते आहे.
पोलिसांनी केसरकर यांना रोहित आर्यशी बोलण्याची विनंती केली होती. मात्र दीपक केसरकर यांनी रोहित आर्यशी बोलण्यास नकार दिला होता. त्यामुळे आता त्यांची बाजू समजून घेण्यासाठी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा त्यांचा जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. त्यामुळे दीपक केसरकर यांच्या अडचणी वाढणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पवई ओलीस प्रकरणावर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया
आरोपी रोहित आर्य याचा पोलिसांकडून चकमकीमध्ये एन्काऊंटर झाला. त्याला सरकारी कामामधून 2 कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र ते थकवल्यामुळे रोहित आर्य याने आंदोलन आणि उपोषण देखील केले. या प्रकरणी त्याने तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन देखील फायदा झाला नाही असा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणी आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “रोहित आर्या यांची स्वच्छता मॉनिटर नावाची कॉन्सेप्ट होती. माझी शाळा, सुंदर शाळामध्येही त्यांना काम देण्यात आलं होतं. पण त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले. हे मॅटर त्यांनी संबंधित डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे. मात्र अशा पद्धतीने कोणालाही ओलीस धरणं हे चुकीचं आहे,” अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे.
पुढे ते म्हणाले की, “मी रोहित आर्य याला ओळखतो. मी रोहित आर्यला चेकने पैसे दिले होते. रोहित आर्या यांची स्वच्छता मॉनिटर नावाची कॉन्सेप्ट होती. माझी शाळा, सुंदर शाळामध्येही त्यांना काम देण्यात आलं होतं. पण त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले. हे मॅटर त्यांनी संबंधित डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे,” असं केसरकर म्हणाले. अशा पद्धतीने कोणालाही ओलीस धरणं हे चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पवई ओलीस प्रकरणावर दिली आहे.






