हायकोर्टाकडून चेतन पाटीलला जामीन मंजूर (फोटो- टीम नवराष्ट्र)
सिंधुदुर्ग: काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग येथील मालवणच्या राजकोट किल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली होती. या प्रकरणावरून राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. तसेच यातील आरोपीना अटक करण्यात आली होती. दरम्यान या पुतळा दुर्घटनेतील मुख्य आरोपी चेतन पाटील आणि जयदीप आपटे यांना अटक करण्यात आली होती. त्या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान चेतन पाटील याला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान हायकोर्टाने चेतन पाटीलला जामीन मंजूर केला आहे. 25 हजारांच्या जातमुचलक्यावर हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मात्र दूसरा आरोपी जयदीप आपटे अजूनही तुरुंगातच आहे. या दुर्घटनेवरून राज्यात वातावरण चांगलेच तापले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदल दिनाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.
ऑगस्टमध्ये कोसळला होता महाराजांचा पुतळा
मालवणमधील सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना आज, सोमवारी दुपारी घडली. पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतत्प झाले आहेत. 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याच अनावरण करण्यात आले होते. निकृष्ट बांधकामामुळे हा शिवरायांचा पुतळा कोसळ्याचाा आरोप शिवप्रेमी करत आहेत. येथील शिवपुतळा परिसर सुशोभीकरणासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च करण्यात आला होता.
राजकोट येथील शिवपुतळा संकुलाचे सुशोभीकरण व इतर व्यवस्थेसाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली यांच्या कार्यालयाकडून सुमारे 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. राज्य सरकार आणि नौदल विभागाने निर्णय घेतल्यानंतरच राजकोट येथे पुतळा उभारण्याचे काम सुरू झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुमारे ४३ फूट उंच आहे.
हेही वाचा: मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, कारण अद्याप अस्पष्ट
राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 35 फूटांचा होता. मालवणमधील तारकर्ली येथील समुद्र किनाऱ्यावर नौदल दिनाच्या कार्यक्रमावेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण झाले होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जातात. भारतीय नौदलानेही आपल्या ध्वजावर शिवरायांचा शाही शिक्का छापला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या स्मरणार्थ 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिन साजरा करण्याचा निर्णय नौदलछायाच्या वतीने घेण्यात आला. याचनिमित्ताने राजकोट किल्ल्यावार नौदल आणि महाराष्ट्र सरकारने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले.
चुकीच्या वेल्डिंग कामामुळे राजकोट येथील महाराजांचा पुतळा कोसळला. तसेच गंज आणि कमकुवत फ्रेममुळे ३५ फूट उंच शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, असा अहवाल मालवण दुर्घटना प्रकरणी चौकशी समितीकडून 16 पानी सादर करण्यात आला. दरम्यान कोणत्याही पुतळ्याचा पाया अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी PWD ची परवानगी घ्यावी लागते.