कल्याण इमारत दुर्घटना, स्लॅबखाली दबून चिमुकलीसह चार जणांचा मृत्यू
कल्याण पूर्वमध्ये मंगलराघोनगर चिकणीपाडा परिसरातील मोठी दुर्घटना घडली आहे. एका चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात तीन महिला आणि एका दीड वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. आज दुपारी सप्तश्रृंगी इमारतीचा स्लॅब कोसळला होता. त्यानंतर काहीजण स्लॅबखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. बचावकार्यत सुरू असताना चार जणांचे मृतदेह आढळून आले.
पुण्यातील कोंढव्यात भीषण अपघात; भरधाव कारने 13 वर्षाच्या मुलाला चिरडले
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी कल्याण पूर्व महाराष्ट्र नगर चिकणी पाडा येथे सप्तश्रृंगी इमारतीचा स्लॅब कोसळला. आजबाजूच्या नागरिकांनी माहिती दिल्यानंतर अग्नीशमन दल आणि पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखले झाले. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं होतं. यादरम्यान पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. मात्र अजूनही काहीजण अडकल्याची शक्यता होती. एक वृद्ध महिला आणि लहान मुलगी दुसऱ्या मजल्यावर अडकले होते. अखेर सायंकाळी ५ वाजता चार मृतदेह बचावपथकाच्या हाती लागले. यात दीड वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. शिवाय ५ जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
टोचन करून निघालेल्या ‘कार’ला भरधाव ट्रॅव्हल्सची धडक; जखमींचा आकडा आला समोर
इमारतीच्या चौथ्या मजल्यावर कोबा घालण्याचं काम सुरू होतं. जितेंद्र गुप्ता आणि व्यंकट चव्हाण हे काम करत होते. दरम्यान जितेंद्र हे दुपारी जेवण्यासाठी बाहेर गेले आणि याच दरम्यान स्लॅब कोसळला. त्यामुळे ते बचावले मात्र त्याचे मीत्र व्यंकट स्लॅबच्या मलब्याखाली अडकले आहेत. अजूनही तीन ते चार जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. मलब्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं जात आहे.