(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूड इंडस्ट्रीमधील मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपती मंडप लालबागचा राजा येथे ११ लाख रुपयांची देणगी दिली आहे. मात्र, यावेळी अभिनेते तिथे उपस्थित राहिले नाही. त्यांनी त्यांच्या टीममार्फत चेक दिला होता. आता त्यांचे सचिव सुधीर साळवी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते चेक हातात घेऊन पापाराझींसाठी पोज देताना दिसले. आता लोक यावर प्रतिक्रिया देत आहेत आणि संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. काहींनी त्याचे कौतुक केले आहे. तर काहींनी त्यांना पंजाबच्या पूरग्रस्तांना मदत करण्याचा सल्ला दिला आहे.
Bigg Boss 19 Promo : आता अशनूरची सटकली…नेहलच्या आरोपांना लावलं फेटाळून! मित्रासाठी राहिली खंभीर उभी
इंटरनेटवर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन यांचे सचिव पंडपातील एका पुजाऱ्याला चेक सोपवत आहेत, परंतु त्याआधी दोघांनीही पापाराझींसाठी पोज दिली. यानंतर, सुधीर साळवी तो चेक देऊन निघून जातात. आता लालबागचा राजाच्या विश्वस्तांनी या देणगीची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की अमिताभ बच्चन यांनी स्वाक्षरी केलेला ११ लाख रुपयांचा चेक मिळाला आहे. आता यावर वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहेत. चाहते काय म्हणाले जाणून घेऊयात.
अमिताभ बच्चन यांच्या देणगीबद्दल लोकांचा सल्ला
अमिताभ बच्चन यांनी चेक दिल्याबद्दल एका वापरकर्त्याने म्हटले, ‘बच्चन साहेब, कृपया ५०० पूरग्रस्त कुटुंबांना दत्तक घ्या. ते चांगले होईल.’ एकाने लिहिले, ‘येथे दान करण्याचा काही फायदा नाही. यामुळे कोणत्याही गरिबांना मदत होणार नाही.’ एकाने लिहिले, ‘जिथे सर्वात जास्त गरज आहे तिथे हे पैसे दान करा. जिथे इतके पूर आले आहेत, तिथे सर्वात जास्त गरज आहे. देवाकडे सर्वस्व आहे.’ एकाने लिहिले, ‘बाबूजी, पंजाबच्या मदतीसाठीही ते दान करा. देवाला मदत करून काहीही होणार नाही. माणसांना मदत करा.’ एकाने लिहिले, ‘जर तुम्ही पंजाबसाठी हे केले असते तर मी अधिक आनंदी झालो असतो.’ एकाने लिहिले, ‘अमिताभ जी, तुम्ही ११ लाख देऊन तुमचा अभिमान दाखवला. जर तुम्ही हे पैसे पूरग्रस्तांना दिले असते तर काय गमावले असते. तुमचा अभिमान कमी झाला असता. लहान विचारसरणीचे मोठे लोक.’ असे म्हणून अनेक लोकांनी त्यांना सल्ला दिला आहे.
पंजाबमध्ये पूर, गावे पाण्याखाली, लोकांचा मृत्यू
तसेच, बाप्पाचा उत्सव सुरु असताना दुसरीकडे पंजाबमध्ये भीषण पूर आला आहे, ज्यामुळे १३०० हून अधिक गावे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे भातशेतीसह इतर पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. बुधवार, ३ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसानंतर परिस्थिती आणखी बिकट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. येथील मृतांचा आकडा ३७ च्या वर गेला आहे. तसेच अनेक बॉलीवूड सेलेब्रेटींनी त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांना लागेल ती मदत करण्यासाठी ते तयार आहेत.