मोठी बातमी! भाडे न वाढवता सर्व लोकल AC करणार : CM देवेंद्र फडणवीस
मुंब्रा स्टेशनजीक काल सोमवारी लोकलमधून पडून ५ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सरकार आणि रेल्वे प्रशासन खडबडून जागं झालं आहे. मुंबईतील लोकलचे स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय काल घेण्यात आला. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी भाडे न वाढवता सर्व ट्रेनमध्ये एसी बसवण्याचा सरकारचा मास्टर प्लान असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कालच्या दुर्घटनेतून आपल्याला शिकावं लागेल. अशा घटना कशा टाळता येतील यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार मार्ग काढेल. शासकीय कार्यालयांना फ्लेक्सी डायलूट दिला असून खासगी कार्यालयासंदर्भात अडचण येत आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टची कपॅसिटी वाढवण्याचा प्रयत्न करु, असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं.
तसंच देवेंद्र फडणवीस यांनी लोकलमधील वाढलेली गर्दी कमी करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे. मुंबईतील लोकलमधील वाढती गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. खासगी कार्यालयांमध्ये बदल करणं थोडं कठीण आहे. यामुळे कंपन्यांच्या नफा-तोटा यावर परिणाम होतो. मात्र येत्या काळात यावर निर्णय होऊ शकतो, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Mumbai Local Accident News: मुंबई लोकल अपघातात वेगळाच संशय; जखमी प्रवाशाने नेमकं काय सांगितलं?
मुंब्रा दुर्घटनेनंतर काल रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. मध्य रेल्वेकडे ज्या नवीन लोकल दाखल होत आहेत त्यामध्ये ऑटोमॅटिक डोअर क्लोज सिस्टिम असणार आहे. मध्य रेल्वेला २३८ नव्या एसी लोकल मिळणार आहेत. या लोकल डोअर क्लोज फिटमेंटसह दाखल होणार आहेत. तसेच सध्या ज्या लोकल ट्रॅक धावत आहेत, या लोकलचे दरवाजेही रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून आपोआप बंद होतील, अशी सिस्टिम बसवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.