Photo Credit- Social Media
नवी मुंबई: नवी मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एनआर कॉम्प्लेक्स इमारतीच्या 17 व्या मजल्यावर आज (14 ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याने इमारतीतील रहिवाशांनी आरडाओरडा करत बाहेर पडले. पाहता पाहता आगीचे स्वरूपही वाढले. रहिवाशांनी अग्निशामन दलाकडे संपर्क साधल्यानंतर काही मिनिटातच अग्निशमन दलाचे ३ बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले.
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीमुळे परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या इमारतीच्या सर्व मजल्यांवरील रहिवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात आगीच्या घटना सातत्याने घडत आहेत.
हेही वाचा: दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने, नाश्त्यात बनवा पालक थालीपीठ
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे नवी मुंबईतील एनआर कॉम्प्लेक्समधील इमारतीच्या 17व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागली. आगीची माहिती मिळताच सर्वत्र आरडाओरडा झाला. इमारतीतील रहिवाशांनी जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. आगीची माहिती स्थानिकांनी अग्निशमन विभागाला दिली.
ज्या इमारतीला आग लागली ती उच्चभ्रू इमारत असल्याने नवी मुंबई पालिकेचे ब्रोंटो वाहनही घटनास्थळी पोहोचले. सध्या अग्निशमन दल आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत घर पूर्णपणे जळून खाक झाले. आगीचे स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही.
हेही वाचा: हरियाणात नायब सिंह सैनी होणार पुन्हा मुख्यमंत्री; 17 ऑक्टोबरला होणार शपथविधी