मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. लता मंगेशकर यांचं पार्थिव प्रभुकुंज वरून शिवाजी पार्कवर दाखल झालं असून काही वेळ पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. सायंकाळी शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. मंगेशकर कुटुंबिया यावेळी उपस्थित असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह छगन भुजबळ, राज ठाकरे, पियुष गोयल, अमित ठाकरे, अजित पवार, शरद पवार, शाहरुख खान, सचिन तेंदुलकर दीदींच्या अंत्यसंस्कराला हजर आहेत. पुरोहितही दाखल झाले असून अंत्यविधीला सुरुवात होणार आहे. नुकतचं या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोंदीच आगमन झालं असून त्यांनीही लतादीदींच अत्यंदर्शन घेतलं. सोबत राज्यपाल भगत सिंग कोश्यारीदेखील उपस्थित आहेत. शासकीय इतमामात लतादीदींच्या अंत्यसंस्काराल सुरुवात झाली आहे.
लतादीदींच्या अंतीम संस्कारासाठी शिवाजी पार्कवर तयारी करण्यात आली आहे.
लतादीदींना प्रभूकुंज येथे शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली.
महानायत अमिताभ बच्चन प्रभूकुंज येथे दाखल
[read_also content=”लता दीदींचा सूर भारतीय संगीतात अढळ, संगीताचा भावस्पर्शी स्वर हरपला https://www.navarashtra.com/maharashtra/kokan/mumbai/lata-didis-tune-steadfast-in-indian-music-the-emotional-tone-of-music-is-lost-nraa-233340/”]
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह संगीतकार गीतकार गायक अजय- अतुल यांनीही प्रभुकुंज येथे लतादीदींच्या पार्थिवाचं दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. तसेच दिग्दर्शक मधुर भांडारकर, अभिनेत्री भाग्यश्री आणि श्रद्धा कपूर, जावेद अख्तर हे प्रभू कुंजवर जाऊन अंत्यदर्शन घेतले.
तसेच बाळा नांदगावकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आई आणि पत्नी यांनी प्रभू कुंजवर जाऊन लतादीदींच अंत्यदर्शन घेतलं.
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुलगी प्रणिती शिंदे, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर प्रभुकुंजवर यांनीही लतादीदींना श्रद्घाजंली वाहिली.