Mumbai’s Air Turning Toxic! AQI Crosses 104
Mumbai AQI: मुंबईचा सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) 104 वर पोहोचला असून तो ‘मध्यम’ श्रेणीत नोंदवला गेला आहे. तज्ज्ञांनी यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधित बांधकाम कामे आणि हवामानातील बदल यांना जबाबदार ठरवले आहे.
Mumbai Air Pollution: रविवारी मुंबईचा सरासरी AQI 104 इतका नोंदवला गेला, तर बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) सारख्या काही भागांत तो ‘गंभीर’ श्रेणीत होता. IIT आणि IMD च्या तज्ज्ञांनी या वाढीचे मुख्य कारण म्हणून शहरातील मोठ्या प्रमाणातील बांधकाम प्रकल्प, वाहनांमधून होणारे प्रदूषण आणि हिवाळ्यातील हवामान बदल यांकडे बोट दाखवले आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये AQI वाढीसाठी मुख्यत्वे बांधकाम आणि वाहनांमधून होणारे प्रदूषण कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. IIT मुंबईचे हवामान वैज्ञानिक अंशुमान मोदक यांनीही हे उत्सर्जनच प्रदूषणाचे प्राथमिक स्रोत असल्याचे पुष्टी केली आहे.
शहरात मोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प सुरू
मुंबईत अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प वेगाने सुरू आहेत—मेट्रो रेल्वे लाईनपासून ते रस्ते, पूल आणि इतर बांधकामकामे जोरात सुरू आहेत. झोपड्या, चाळी, मिल आणि औद्योगिक भागांचेही गगनचुंबी इमारतींमध्ये रुपांतर होत आहे, ज्यामुळे बांधकामाची गती वाढली आहे.
IMD मुंबईच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनीही बांधकाम कामे AQI वाढीचे एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले. त्याबरोबर हिवाळी हवामानाचे घटकही परिस्थिती अधिक बिघडवतात असे त्यांनी स्पष्ट केले.
तज्ज्ञ काय म्हणतात?
नायर यांच्या मते, आकाश स्वच्छ असताना आणि वाऱ्याचा वेग कमी झाल्यास जमिनीवरील तापमानात लगेच बदल होतो . यामुळे थंड हवेची एक परत गरम हवेच्या खाली तयार होते. थंड हवा घन असल्यामुळे खाली बसते आणि प्रदूषण हवेतुन जास्त वर जाऊ शकत नाही . त्यामुळे वायू गुणवत्ता खालवते.
मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये उंच इमारतींमुळे वाऱ्याचा प्रवाह मंदावतो, ज्यामुळे प्रदूषणाचा प्रसार आणखी कमी होतो.
0–50: चांगला
51–100: समाधानकारक
101–200: मध्यम
401–500: गंभीर
BMC ची कारवाई
वायू गुणवत्ता सतत घटत असल्याने BMC ने प्रदूषण नियंत्रणासाठी अनेक उपाय केले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये BMC ने 28 मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.
Ans: AQI 104 म्हणजे वायू गुणवत्ता ‘मध्यम’ श्रेणीत आहे. हे संवेदनशील व्यक्तींसाठी काही प्रमाणात घातक ठरू शकते.
Ans: मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली बांधकामकामे, वाहनांचे वाढते उत्सर्जन, हिवाळ्यातील हवामान बदल (थंड हवा, कमी वारा )
Ans: BKC, अंधेरी, गोरेगाव, चेंबूर आणि बांधकाम असलेले अनेक विकसित होणारे भाग.
Ans: हिवाळ्यात थंड हवा खाली बसते आणि प्रदूषण जमिनीवरच अडकतात. कमी वाऱ्यामुळे ते पसरत नाहीत.
Ans: सामान्य लोकांसाठी फारसा धोका नसला तरी दमा - ऍलर्जी हृदयाचे रुग्ण लहान मुले आणि वृद्धसाठी धोकादायक






