महाराष्ट्रात १० दिवसापूर्वीच मान्सून दाखल झाला आहे. सोमवारी पहाटेपासून मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली. मुंबईत आकाशात काळ्या ढग जमले असल्यामुळे सकाळचे १० वाजले असले तरी अंधार पाहायला मिळत आहे. सकाळी 10 वाजता वाहनांच्या हेडलाईट सुरु असल्याचे अनोखे चित्र सध्या मुंबईत पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन तासांत मुसळधार पाऊस आणि वेगाने वारे वाहतील, असा अलर्ट दिला होता. त्यानुसार, गेल्या तासाभरापासून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे.
Mumbai Rain News: मुंबईत पावसाची संततधार कायम, लोकलसेवा कोलमडली, प्रवाशांचा संताप!
मुंबईकर घराबाहेर निघताय, ऑफिस ला जातायेत, तर मग व्हा सावधान. कारण पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगरात सखल भागात पाणी वाचायला सुरवात झाली आहे. आणि सोबतच मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकात रूळांवरही पाणी साचायला सुरवात झाली आहे. किंग्ज सर्कल, वडळा, सायन आणि माटुंगा या परिसरात जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. चुनाभट्टी येथील एका चाळीतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे.
पावसामुळे माटुंगा रेल्वे स्थानकात आणि मस्जिद बंदर रेल्वे रुळावर जास्तीत जास्त पाणी साचला आहे. साचलेले पाणी जवळपास फलाटाच्या उंचीला पोहोचली आहे. कुर्ला ते सायन रेल्वे स्थानकादरम्यान लोकल उभ्या आहेत. मध्य रेल्वेवर CSTM कडे जाणारी स्लो लोकल ठप्प झाले आहे. मस्जिद बंदर रेल्वे आणि चुना भट्टी स्थानकांवर पाणी साचल्यामुळे, मानखुर्द स्टेशन फलाट क्रमांक २ सीएसएमटीला जाणारी लोकल पीएल ५४ मानखुर्द येथे थांबवण्यात आली आहे.
पावसामुळे आज सकाळपासूनच मुंबईतील मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेचा वेग मंदावला आहे आणि आता माटुंगा रेल्वे स्थानकात जास्त पाणी साचल्याने लोकल ट्रेनचा वेग आणखी मंदावण्याची शक्यता आहे. यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची हाल होण्याची शक्यता आहे.
असाच जर पावसाचा जोर कायम राहिला तर रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो. पुढील दोन तासात पावसाचा जोर कायम राहिल्यास मध्य रेल्वेमार्गावरील अन्य स्थानकांवरही रेल्वे ट्रॅकवर पाणी साचू शकते. मुंबईत पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी मुंबई महानगरपालिकेने युद्धपातळीवर तयारी केली होती. मात्र, पालिकेचे हे सर्व दावे पहिल्याच पावसात फोल ठरताना दिसत आहेत.
RAIN NEWS: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर; सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट