रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक,ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल; सूत्रांची माहिती (फोटो सौजन्य-X)
जगातील मोठे उद्योगपती आणि टाटा समूहाच्या टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना मुंबईतील रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी रतन टाटा यांची अचानक बिघडल्याची बातमी समोर येत होती. मात्र त्यांनी स्वतः आयसीयूमध्ये दाखल केल्याच्या दाव्याला अफवा असल्याचे म्हटले आहे.
आयसीयूमध्ये दाखल केल्याच्या दाव्याचे खंडन करताना रतन टाटा स्वतः म्हणाले, ‘माझ्या प्रकृतीबद्दल अलीकडे पसरलेल्या अफवांची मला माहिती मिळाली.मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो की हे दावे निराधार आहेत. माझे वय आणि तब्येत यामुळे मी सध्या आवश्यक वैद्यकीय तपासणी करत आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. मला बरे वाटत आहे. मी तुम्हाला विनंती करतो की जनता आणि माध्यमांनी चुकीची माहिती पसरवणे टाळावे, अशी माहिती रतन टाटा यांनी सोशल मीडियावरुन दिली होती.
डॉ.शारुख अस्पी गोलवाला यांच्या नेतृत्वाखालील तज्ञांचे पथक रतन टाटा यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. रतन टाटा यांच्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट करत त्यांच्या आरोग्याबाबत माहिती देण्यात आली आहे.86 वर्षीय टाटा यांनी सोमवारी सांगितले की, त्यांचे वय आणि संबंधित वैद्यकीय परिस्थितीमुळे त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी केली जात आहे. मात्र आता टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना मुंबईतील रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
रतन नवल टाटा, एक भारतीय उद्योगपती, गुंतवणूकदार, परोपकारी आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आहेत. ते टाटा समूहाचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांना भारताचे दोन सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मविभूषण (2008) आणि पद्मभूषण (2000) प्रदान करण्यात आले आहेत. ते प्रतिष्ठित कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, बिशप कॉटन स्कूल (शिमला), कॉर्नेल विद्यापीठ आणि हार्वर्डचे माजी विद्यार्थी आहेत.






