Mahayuti Politics : महायुती सरकारमध्येही अर्थमंत्री अजित पवार यांची दादागिरी सुरूच आहे. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. याच नाराजीतून एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी काल एकनाथ शिंदे यांच्यासमोर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर, शिंदे गटाच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत दोन तास स्वतंत्र बैठक घेतली. यावेळी त्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याबद्दल तक्रार केली.
महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना अविभक्त शिवसेनेच्या मंत्र्याना तत्त्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी दिला जात नाही, अशी तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांकडून सातत्याने केली जात होती. याच नाराजीतून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात काही मंत्र्यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर याच गटाने भाजपसोबत हातमिळवणी केली आणि सत्तेत सामील होण्याचा निर्णय़ घेतला. आता अशीच तक्रार महायुती सरकारमध्येही केली जात आहे. त्यामुळे शिंदे आणि अजित पवार गटातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
Madhya Pradesh Accident: लग्न सोहळ्यावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ट्रेलर गाडीवर उलटला अन्…
दरम्यान, सह्याद्री अतिथी गृहावर काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीत शिंदे गटाच्या मंत्र्यांनी अजित पवार आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी देत नसल्याचे सांगितले. तसेच निधी अभावी मतदारसंघातील आणि विभागातील लोककल्याणकारी कामे करण्यात अडचणी येत असल्याची तक्रारही त्यांनी यावेळी केली.
या बैठकीत त्यांनी आपल्या मंत्र्यांच्या विभागांमध्ये आणि मतदारसंघांमध्ये सुरू असलेल्या विकासकामांचा एक-एक करून आढावा घेतला आणि शिंदे यांनी त्यांना प्राधान्याने जनहिताच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्याचा, कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा, फायली प्रलंबित न ठेवता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा सल्ला दिला. परंतु, सर्व मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे एकच तक्रार केली. जित त्यांच्या क्षेत्राच्या आणि विभागाच्या विकासकामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना काम करण्यासाठी पुरेसा निधी दिला जात नाही, असे सांगत त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.
Raigad News: सर आली धावून रस्ता गेला वाहून; पावसाला सुरुवात होत नाही तोच गावातील रस्ता वाहतुकीस बंद
अजित पवार हे नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या वर्चस्वासाठी ओळखले जातात. अलिकडेच भाजप आमदारांनी अजित यांच्याविरुद्ध केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार केली होती. शहा यांनी भाजप आमदारांना आठवण करून दिली होती की, भाजप हा महाआघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. म्हणून, भाजप आमदारांनी अजित पवारांनाही कामासाठी त्रास द्यावा. तुम्ही अजित पवारांंबाबत तक्रार करू नका पण अजितने तुमच्याबद्दल तक्रार करण्यासाठी माझ्याकडे यावे, असे काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला होता.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेत ऐतिहासिक बंड झाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील त्या बंडाच्या वेळी, शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले अजित पवार यांच्यावर गुंडगिरी आणि निधी न देण्याचा आरोप केला होता. तथापि, नंतर भाजपच्या पाठिंब्याने शिंदे स्वतः महायुती सरकारचे मुख्यमंत्री झाले आणि नंतर अजित देखील त्या सरकारमध्ये सामील झाले. एवढेच नाही तर शिंदे यांनी अजित यांना त्यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री बनवून सर्वांना आश्चर्यचकित केले होते.