मध्य प्रदेशमध्ये मोठी दुर्घटना (फोटो- सोशल मिडिया )
भोपाळ: मध्यप्रदेशमध्ये एक मोठा अपघात घडला आहे. झाबुआ जिल्ह्यात एक ट्रेलर एका गादीवर पलटला आहे. लग्न सोहळ्यातून परतणाऱ्या गाडीवर एक ट्रेलर पलटी झाला आहे. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे, ते एकाच कुटुंबातील सदस्य असल्याचे समजते आहे.
झाबुआ जिल्ह्यातील मेघनार पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील भरधाव वेगाने येणार ट्रेलर गादीवर येऊन पलटी झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या व्यक्तीमध्ये दोन पुरुष, तीन महिला आणि चार लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातामध्ये गाडीचे देखील प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.
झाबुआ जिल्ह्यात हीं घटना घडल्याचे समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रूग्णवाहिका आल्यानंतर तेथील मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेत दोन मुले जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटना ज्या गावाजवळ घडली, त्या गावातील नागरिक देखील मदतीसाठी घटनास्थळी दाखलझाले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
मंचरच्या घाटात भीषण अपघात
Accident News: मंचरच्या घाटात भीषण अपघात; डंपर पलटी होऊन एक ठार तर…