मुंबई : मुलगी ही दानात देता येणारी संपत्ती नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. एका व्यक्तीने आपली १७ वर्षांची मुलगी स्वयंघोषित धर्मगुरुला ‘दान’मध्ये दिली होती. हे प्रकरण न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे मुलगी दान करण्याच्या कृत्यावर न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली. याचवेळी मुलगी दान करण्याच्या प्रवृत्तीवर न्यायालयाने चांगलेच ताशेरे ओढले.
न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांच्या एकल खंडपीठाने या प्रकरणात निकाल दिला. चालू महिन्याच्या सुरुवातीला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला स्वयंघोषित धर्मगुरू शंकेश्वर ढाकणे आणि त्याचा शिष्य सोपान धनके या दोघांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या अर्जावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. दोन्ही आरोपी हे मुलगी आणि तिच्या वडिलांसह जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील मंदिरात राहत होते. मुलीने ऑगस्ट २०२१ रोजी या दोघांविरुद्ध बलात्कार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
न्यायमूर्ती कंकनवाडी यांनी सांगितलं की, २०१८ मध्ये १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपवर मुलीच्या बापाने आणि ढाकने यांच्यादरम्यान एक प्रकारे दानपत्राचा करार करण्यात आला होता. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे की, यात (स्टॅम्प पेपरवर) दिल्यानुसार या व्यक्तीने आपल्या मुलीचं दान एका तांत्रिक बाबाला केलं होतं आणि यात कन्यादान असा उल्लेख आहे. या स्टॅम्प पेपरमध्ये दिल्यानुसार, देवाच्या साक्षीने हे कन्यादान करण्यात आलं आहे. याला स्वत: मुलीच्या बापानेच परवानगी दिली आहे.
न्यायमूर्ती कंकनवाड़ी यांनी हे प्रकरण संतापजनक असल्याचं सांगितलं. मुलगी काही कोणती संपत्ती नाही, जी दान केली जाऊ शकते. न्यायालयाने पुढे सांगितलं की, ती मुलीच्या भविष्याबाबत चिंतेत आहे आणि डोळे बंद करून राहू शकत नाहीत. न्यायालयाने बाल कल्याण समितीला या बाबत तपास करण्यास सांगितलं आणि रिपोर्ट सादर करण्याचीही सूचना दिली आहे. दोघेही जालना जिल्ह्यातीन बदनापूर स्थित मंदिरात मुलगी आणि तिच्या वडिलांसोबत राहतात. मुलीने ऑगस्ट २०२१ मध्ये दोघांविरोधात बलात्कारचा प्राथमिक गुन्हा दाखल केला होता. यानंतर शुक्रवारी न्यायालयाने २५-२५ हजार रुपयाच्या जामिनावर दोघांना जामीन मंजूर करीत पुढील सुनावणी ४ फेब्रुवारी रोजी असल्याचं सांगितलं.