महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या मराठा आरक्षणाच्या सर्व्हेचे काम शिक्षकांना देखील आले आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये देखील महापालिका कर्मचाऱ्यांच्या केडीएमसीच्या शिक्षकांवर ही जबाबदारी सोपवण्यात आल्या आहेत. याचा परिणाम शाळांवर दिसू लागला आहे. शाळांच्या परीक्षा महिना-दीड महिना वर येऊन ठेपले असताना शिक्षक सर्वेच्या कामात गुंतल्याने शाळेमधील नियोजनाचे बारा वाजले आहेत सोप्ग्य भाषेत सांगायचे झाले तर शाळेचे नियोजन बिघडले आहे.
कल्याण जवळील बल्यानी येथील बंदे अली खा या शाळेत मराठी व उर्दू माध्यमाचे विद्यार्थी शिकतात. या शाळेत 1 ली ते 7 वी पर्यंतचे वर्ग असून तब्बल 1800 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एकूण 21 शिक्षक दोन सत्रात या शाळेत कार्यरत आहेत. या 21 मधील 18 शिक्षकांना मराठा आरक्षण सर्वेच काम देण्यात आलं आहे. त्यामुळे या शाळेत आजच्या घडीला अवघा एक शिक्षक शिकवत आहे. तीन दिवसांपासून शाळेतील वर्ग बंद ठेवण्यात आले होते. फक्त पहिलीचा वर्ग सुरू आहे. त्यामुळे पालकांनी देखील नाराजी व्यक्त केली.
काही महिन्यांमध्ये महिना दीड महिन्यावर परीक्षा येऊन ठेपली शाळा जर तीन-तीन दिवस बंद राहणार असेल तर विद्यार्थी काय शिकणार आणि परीक्षेत काय लिहणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला जात आहे. तसेच सर्वेच्या कामाचं नियोजन करा अशी मागणी देखील त्यांनी केली. शिक्षक शाळेतील काम, ज्ञान संपादन सोडून सर्व्हेच्या कामाला लागले असल्यामुळे तिकडे शाळांमधील सर्व नियोजनच बिघडून गेल्याने सरकारने याबाबत काहीतरी तोडगा काढावा असे मागणी केली जात आहे.