नाशिक – फेसबुकवर टाकलेल्या पोस्ट वरून झालेल भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या इसमाच खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातपूर परिसरातील गोरक्षनाथ रस्ता,काश्मीरे मळा याठिकाणी हा खुनाचा प्रकार समोर आला आहे. लखन नामक इसमाने फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. त्यांनतर संशयित आरोपी मुन्ना निषाद आणि नरसिंग निषाद या दोघा भावांनी स्मायली टाकल्याने फिर्यादी आणि निषाद भावांमध्ये वाद निर्माण झाला आणि या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या संतोष जैस्वाल यालाच संशयित आरोपी मुन्ना निषाद आणि नरसिंग निषाद यांनी लोखंडी रॉड डोक्यात मारला त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या संतोष जैस्वाल याचा या घटनेत मृत्यू झाला असून, सातपूर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर या खुनाच्या घटनेतील एका संशयिताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून आणखी एका संशयित आरोपीचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.