GG चा TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय(फोटो-सोशल मीडिया)
GG vs RCB, WPL 2026 LIVE : महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर आतापर्यंत अपराजित असणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्यापूर्वी गुजरात जायंट्स संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ प्रथम फलंदाजी करणार आहे.
स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघ चांगलाच फॉर्ममध्ये दिसत आहे. या संघाने महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आतापर्यंत खेळलेल्या चारही सामन्यात विजय मिळवला आहे. यामध्ये १६ जानेवारी रोजी गुजरात गुजरात जायंट्सविरुद्ध आरसीबीने ३२ धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे आरसीबी संघ या सामन्यात देखील आत्मविश्वासाने मैदानात उतरणार आणि आपल्या पाचव्या विजयाची नोंद करण्यासाठी प्रयत्नशील राहणार. संघासाठी जमेची बाब म्हणजे संघाची कर्णधार स्मृती मानधना चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तिने मागील दिल्लीविरुद्धच्या सामन्यात ९६ धावांची खेळी खेळली होती.
🚨 Toss 🚨@Giant_Cricket won the toss and elected to field against @RCBTweets Updates ▶️ https://t.co/KAjH515c64 #TATAWPL | #KhelEmotionKa | #GGvRCB pic.twitter.com/SVSXdsXeeg — Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 19, 2026
तर ॲश्ले गार्डनरच्या नेतृत्वाखालील गुजरात जायंट्स संघाने मात्र या चालू हंगामात चार सामान्यापैकी दोन सामने जिंकले तर दोन सामने गमावले आहेत. गुजरात जायंट्स संघाने त्यांचे मागील दोन्ही सामन्यात पराभव पत्करला आहे. १३ जानेवारी रोजी मुंबईविरुद्ध ७ विकेट्सने पराभव पत्करला तर १६ जानेवारी रोजी आरसीबीनेच त्यांना ३२ धावांनी पराभूत केले होते. त्यामुळे या सामन्यात विजयी रुळावर परतण्याचा गुजरात जायंट्स संघ प्रयत्न करताना दिसणार आहे.
𝗪𝗲’𝗿𝗲 𝗯𝗮𝗰𝗸 with a blockbuster on the cards! 🤩🍿 📍 Vadodara
💻 https://t.co/rG3cQadgHN
📱 Official WPL App#TATAWPL | #KhelEmotionKa | #GGvRCB | @Giant_Cricket | @RCBTweets pic.twitter.com/Zqc9TT9yo1 — Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 19, 2026
गुजरात जायंट्स:बेथ मूनी (यष्टीरक्षक), सोफी डिव्हाईन, अनुष्का शर्मा, कनिका आहुजा, ॲशले गार्डनर (कर्णधार), जॉर्जिया वेअरहॅम, काश्वी गौतम, भारती फुलमाळी, तनुजा कंवर, हॅपी कुमारी, रेणुका सिंग ठाकूर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: ग्रेस हॅरिस, स्मृती मानधना (कर्णधार), जॉर्जिया वॉल, रिचा घोष (डब्ल्यू), गौतमी नाईक, नादिन डी क्लर्क, राधा यादव, प्रेमा रावत, श्रेयंका पाटील, सायली सातघरे, लॉरेन बेल
हेही वाचा : IND vs NZ : सूर्याआर्मी न्यूझीलंडविरुद्धच्या T20I लढतीसाठी सज्ज! भारतीय संघात कोण ‘इन’ आणि कोण ‘आऊट’? वाचा सविस्तर






