रामटेक फिल्मसिटीसाठी जागेचा प्रश्न सुटेना? दोन महिन्यांत होता हस्तांतरणाचा प्रयत्न (फोटो सौजन्य-X)
नागपूर : विदर्भात चित्रपट निर्मिती आणि रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी रामटेक येथे चित्रनगरी उभारण्यात येत आहे. मात्र या चित्रनगरीसाठी येत्या दोन महिन्यात जमीन हस्तांतरित करण्याचा आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हा कालावधी लोटल्यानंतरही अद्याप जागेचा प्रश्न सुटेनासा झाला आहे. तर, जागेचा तिढा सुटत नसल्याने प्रकल्प सल्लागाराचीही नियुक्ती रखडली आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी नागपुरात येऊन ही घोषणा केली होती. परंतु गेल्या दोन महिन्यात विदर्भांतील सांस्कृतिक क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाच्या ठरू पाहणाऱ्या या प्रकल्पाचे नेमके काय होणार, याबद्दल नागपूरवासियांसह वैदर्भीय कलावंतांचेही लक्ष लागले आहे.
रामटेक जवळच्या नवरगाव येथे प्रस्तावित चित्रनगरीच्या जागेची पाहणी सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी दोन महिन्यात जमीन हस्तारण व प्रकल्प सललागार नियुक्तीची घोषणा केली होती. रामटेकच्या प्राचीन गड मंदिर परिसरात भाविकांसाठी अद्ययावत सोयी सुविधा उभारण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
रामटेकमध्ये चित्रनगरी उभारण्यासाठी, विशेषतः नवरगाव येथे, शासनाने प्रक्रिया सुरू केली असली तरी ती संथगतीने होत आहे. या चित्रनगरीमुळे विदर्भात चित्रपट निर्मितीला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, परंतु, तुर्तास हा प्रकल्प अधांतरी अडकल्याची चिंता पसरली आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे ६० एकर जमीन हस्तांतरित करण्यासोबत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमग्याचेही ठरले आहे. परंतु त्यापुढे प्रशासनस्तरावर कुठेही काहीच झाले नाही. त्यामुळे या प्रकल्पाबाबत चिता व्यक्त केली जात आहे. विदर्भातील कलावंतांना वाव मिळावा, यासाठी नागपुरात चित्रनगरी साकारण्याचा निर्णय तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यानी निर्णय घेतला होता. त्यानंतर जागेचा शोध घेत रामटेक येथील डिसीजवळील जागा निश्चित करण्यात आली, येथे शासनाच्या मालकीची १२८ एकर जागा आहे. चित्रपटाच्या निर्मितीसाठी आवश्यक सर्व प्रकारचे लोकवान्स, शूटिंग स्टुडिओ, विद्युत उपकरणे, उच्च दाबाची जनरेटर्स, कॅमेरा, लेन्सेस, ट्रैक, ट्रॉलीज, कपडेपट मेकअप व्यवस्था, प्रीव्वा विएटर्स, संकलन स्टुडिओ, प्राविवस तंत्र अशा अनेक गोष्टीची उभारणी या प्रकल्पांतर्गत केली जाणार आहे.
२०२३ मध्ये महापालिकेकडे जंबुदीप प्रॉडक्शन प्रा. लिमिटेड या चित्रपटनिर्मिती कंपनीचा अर्ज आला होता. २०२४ मध्ये या कंपनीला वित्रीकरणासाठी परवानगी दिली होती. २६ नोव्हेंबर असे या चित्रपटाचे नाव होते. सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, विजय पाटकर, मुश्ताक खान आणी नावाजलेल्या अभिनेत्याचा या चित्रपटात समावेश असल्याचे कंपनीने नमुद केले होते. संविधान बौक, मोरभवन, सक्करदरा बाजार, सोमलवाडा, फुटाळा तलाय, महान, भगवाननगर येथे एकूण १२ दिवसांच्या शुटींगसाठी परवानगी मागण्यात आली होती, महापालिकेने या कंपनीला मार्च २०२४ मध्ये चित्रीकरणासाठी परवानगी दिली होती.
१८ व २८ फेब्रुवारीला महापालिकेकडे अनुक्रमे रिव्हरलैंड एन्टरटेन्मेंट प्रा. लि. मुंबई व अरिंज सिटी प्रॉडक्शन कंपनीकडून चित्रीकरणासाठी परवानगीचे अर्ज आले आहेत. रिव्हरलँड एन्टरटेन्मेंट प्रा. लि. मुंबई व हॉसशु मिडिया प्रा. लि. हरियाणा या दोन प्रॉडक्शन कंपन्यांनी संयुक्तपणे अर्ज केला. या कंपन्यांनी फ्रिडम पार्क मेट्रो स्टेशन, झिरो माईल, रामझुला, वर्धमाननगर कॉलनी, रामबाग ले-आऊट, इस्कॉन, आयटी पार्क, मिहान, आयआयएम, व्हीएनआयटी, नॅशनल कॅन्सर इर्नस्टट्यूट, दीक्षाभूमी आदी ठिकाणी चित्रीकरणासाठी परवानगी मागितली होती. रिंज सिटी प्रॉडक्शन हाऊसनेही शहरातील विविध ठिकाणी चित्रीकरणासाठी परवानगी मागितली आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून ही परवानगी दिली जाते. विशेष म्हणजे या चित्रीकरणासाठी आकाशचिन्ह विभागाकडून महापालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्यान विभाग व झोन सहायक आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे.






