1.20 लाख मजुरांच्या हाताला मिळालं काम, या जिल्ह्यात 474 ठिकाणी सुरुवात
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हयात आठही तालुक्यांत मग्रारोहयोंतर्गत 474 कामे सुरू असून त्या माध्यमातून 1 लाख 20 हजार 681 मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.
मनरेगा अंतर्गत अहल्यादेवी सिंचन विहीर, अमृत कुंड शेततळे, भू-संजीवनी वर्मी कंपोस्टिंग, भू संजीवनी नाडेम कंपोस्टिंग, कल्पवृक्ष फळबाग लागवड, निर्मल स्वच्छालय, निर्मल शोष खड्डा, समृद्ध अंकुर रोपवाटिका, गाव तलाव, इतर जलसंधारणाची कामे, नंदनवन वृक्षलागवड व संगोपन यासह समृद्ध ग्राम योजनेंतर्गत क्रीडांगणे, अंगणवाडी इमारत बांधकाम, स्मशानभूमी सुशोभीकरण, ग्रामपंचायत भवन, घरकूल बांधकाम, गावांमधील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, गुरांचा गोठा, कुक्कटपालन शेड, शेळीपालन शेड, मत्स्यव्यवसायाच्या ओट्यांचीही कामे केली जात आहेत.
वय २४ वर्ष! सुरु केले होते काम; आता साडे सात कोटींचा टर्न ओव्हर
वैयक्तिक लाभार्थी निवडीचे निकष महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम 1970 च्या 6 ऑगस्ट 2014 पर्यंत सुधारित अनुसूची 2 मधील परिच्छेद 4 मध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे वैयक्तिक लाभाची कामे देताना प्रवर्गातील कुटुंबांना प्राधान्य देण्याची तरतूद आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, निरधी सूचित जमाती (विमुक्त जाती), दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंबे व स्त्री तसेच शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेल्या कुटुंबांना या कामासाठी प्राधान्य दिले जाते. प्रतिदिन 248 रुपये मजुरी मनरेगाच्या कामावरील मजुरांना प्रतिदिन 248 रुपये मजुरी दिली जाते. वृक्ष लागवडीसाठी 100 दिवस कामे उपलब्ध करून दिली जातात. इतर कामे मोजमाप व कामानुसार मोबदल्याची रक्कम दिली जाते. विहिरीसाठी 3 लाख रुपयांपर्यंत कामानुसार रकमेची तरतूद केली आहे. ग्रामीण भागातील गरीब मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांना दैनंदिन गरजा भागवणे कठीण जाते. गरीब कुटुंब आर्थिक संकटात सापडू नये, यासाठी त्यांना कामे उपलब्ध करून दिली जातात.
UPI द्वारे केलेल्या ‘या’ व्यवहारांवर आकारले जाऊ शकते व्यापारी शुल्क, बदलामागील कारण काय?
आमगाव तालुक्यात 65 ग्रामपंचायतीमध्ये 47 कामे सुरू असून 9 हजार 712 मजूर कार्यरत आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्यात 56 कामांवर 15 हजार 126 मजूर आहेत. देवरी तालुक्यातील 72 कामांवर 26 हजार 161 मजूर कार्यरत आहेत. गोंदिया तालुक्यात 100 कामांवर 20 हजार 665 मजूर, गोरेगाव तालुक्यात 48 कामांवर 8 हजार 676 मजूर, सडक अर्जुनी तालुक्यात 52 कामांवर 12 हजार 255 मजूर, सालेकसा तालुक्यात 40 कामांवर 10 हजार 247 मजूर आणि तिरोडा तालुक्यात 79 कामांवर 17 हजार 39 मजूर काम करत आहेत.