ओमानला 173 धावांचे लक्ष्य (फोटो- सोशल मीडिया)
Asia Cup 2025: आशिया कप २०२५ मध्ये आतापर्यंत सहा सामने खेळवण्यात आले आहेत. आज संयुक्त अरब अमिराती आणि ओमान यांच्यात सातवा सामना सुरू आहे. ओमानने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व संयुक्त अरब अमिरातीच्या संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. दरम्यान संयुक्त अरब अमिरातीच्या संघाने 20 ओव्हर्स खेळत 172 धावा केल्या आहेत. दरम्यान संयुक्त अरब अमिरातीने ओमानला 173 धावांचे लक्ष्य दिले आहे.