वास्तुपूजनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; पाच जणांचा खदानीत बुडून मृत्यू
नागपूर : कुही पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या पाचगाव पोलिस चौकी हद्दीतील गर्ग खदान परिसरात दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. सुरगाव ग्रामपंचायत हद्दीतील गर्ग खदान परिसरातील पाण्याच्या खड्चात बुडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने स्थानिकांना धक्का दिला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये रोशनी चंद्रकांत चौधरी (वय 32, रा. धुळे), तिचा मुलगा मोहित चंद्रकांत चौधरी (वय 12), मुलगी लक्ष्मी चंद्रकांत चौधरी (10, रा. धुळे), बहीण रंजना सूर्यकांत राऊत (वय 25, गुजरवाडी, रा. नागपूर) आणि एहतेश्याम मुक्तार अन्सारी (वय 20, रा. मोमिनपुरा, नागपूर) यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच कुही ठाणेदार भानुदास पिदूरकर, उमरेड एसडीपीओ आयपीएस वृष्टि जैन आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. स्थानिक लोकांनी आणि गोताखोरांच्या मदतीने 4 तासांच्या शोध मोहिमेच्या नंतर सर्व पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले. सर्व मृतकांचे शवविच्छेदनासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सरू केला आहे.
गर्ग खदानीतील दुर्घटनेनंतर खाण परिसरातील सुरक्षेच्या उपाययोजनांवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पाण्याच्या खोल खड्याजवळ ना कोणताही चेतावनी फलक, ना संरक्षक कुंपण किंवा अडथळा या निष्काळजीपणामुळे पाच निष्पाप जीव गमवावे लागले. ग्रामस्थांनी मागणी केली की, सुरगाव व पाचगाव परिसरातील सर्व खदानींमध्ये तातडीने सुरक्षा फलक, बॅरिकेट्स आणि चेतावणी चिन्हे लावावीत. तसेच अनधिकृत प्रवेशावर कठोर निबंध लावणारी ठोस कार्यवाही करावी. ही घटना केवळ अपघात नाही, तर व्यवस्थेतील त्रुटींचे प्रतिबिंब आहे. मृतांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी नागरिक पुढे सरसावले असून, प्रशासनाकडन सखोल तपास सरू आहे.
नागपूर येथील एहतेशाम मुक्तार अन्सारी हा रविवार (दि. 11) पासून बेपत्ता होता. त्याचा मामा मोहम्मद रफिक अन्सारी (रा. कुही फाटा) याने पाचगाव पोलिस चौकीत बेपत्ताबाबत तक्रार दाखल करताना मोबाईल लोकेशन गर्ग खदानजवळ दाखवत असल्याची माहिती दिली. त्यानंतर पाचगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शोधमोहीम सबवली असता, एका महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. तपासात आजूबाजूला पाच चपलांचे जोड, कपडे आणि एक दुचाकी आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी तत्काळ गोताखोरांना पाचारण केले. शोधमोहिमेदरम्यान पाण्यातून आणखी चार मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या प्रकरणी रोशनी चौधरी व रंजना राऊत यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार रोशनी दोन मुलांसह वास्तुपूजनाच्या कार्यक्रमासाठी नागपुरात आली होती. रविवारी (दि. 11) ती. रंजना आणि मुलांनीशी आंघोळीसाठी उमरेडकडे गेल्याचे सांगून बाहेर पडली होती. मात्र सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने शोध सुरू करण्यात आला, यानंतर चार जण बेपत्ता असल्याची तक्रार गणेशपेठ पोलिस ठाण्यात करण्यात आली. शेवटी पाचगाव खदान परिसरात मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर नातेवाइक घटनास्थळी दाखल झाले. सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले होते.