अखेर शिंदेंनी डाव टाकलाच! राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप
नागपूर: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे यांनी आज दोन मेळाव्यांना संबोधित केले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मी सांगितले होते की, निवडणूक जिंकल्यानंतर मी येईन. दरम्यान आज मी तुमच्या सर्वांचे आभार मानायला आलो आहे. तसेच निवडणूक जिंकल्यानंतर आमची जबाबदारी अधिक वाढली आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांनी पालकमंत्रीपदाचा तिढा आणि अन्य गोष्टींवर भाष्य केले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे नागपूर दौऱ्यात म्हणाले, “मला यापूर्वी सुद्धा जीवे मारण्याच्या धमक्या मिळलेल्या आहेत. डान्सबार बंद केले तेव्हाही धमक्या आल्या. अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. तसे प्रयत्नदेखील झाले, मात्र मी घाबरलो नाही. नक्षलवाद्यांनी देखील धमकी दिली होती. मात्र मी त्यांच्या धमक्यांना भीक घातली नाही. गडचिरोलीत पहिला औद्योगिक प्रकल्प सुरू करण्याचे काम मी केले.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. एसटीमध्ये महिलांना 50% ची सवलत बंद केली जाणार नाही. ” दहावीचा पेपर फुटल्याच्या प्रकरणावर बोलताना या प्रकरणाची चौकशी केली जाईल. कॉपीमुक्त महाराष्ट्र करण्याचा आमच्या सरकारचा संकल्प आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. गुन्हे शाखेने दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. 20 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांना अज्ञात व्यक्तीकडून गोरेगाव पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीकडून ईमेल आला होता. या मेलमध्ये एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी होती. मंत्रालय आणि जेजे मार्ग पोलिस स्टेशनलाही अशाच प्रकारचे धमकीचे मेल आले होते. हा मेल मिळताच पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला होता.
◻️LIVE | 🗓️ 21-02-2025
📍 नागपूर📹 पत्रकारांशी संवाद https://t.co/Jf7YTr9mYw
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 21, 2025
पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या दोघांकडून सध्या तपास यंत्रणा या दोघांनी एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी का दिली याचा शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींना नेमक्या कोणत्या कारणासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून हा ईमेल पाठवला, याचा शोध घेतला जात आहे. याबाबतचा तपास सुरु आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका व्यक्तीने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यादरम्यान त्यांच्या विमानावर दहशतवादी हल्ला करू शकतात असा दावा केला होता. पोलिसांनी इतर एजन्सींना माहिती दिली आणि तपास सुरू केला. ज्या वेळी हा फोन आला, त्या वेळी पंतप्रधान मोदी फ्रान्सचा दौरा पूर्ण करून अमेरिकेला जाणार होते.