नागपूर – नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी नागपुरात अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आले होते. नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी नागपुरातील संविधान चौकात भाजपने आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी केले. आमदार कृष्णा खोपडे हेही आंदोलनात सहभागी झाले होते. खोपडे म्हणाले, ठाकरे सरकारचे काही मंत्री जेलमध्ये आहेत. तर काही जेलमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत. मलिक यांनी दाऊतसोबत संबंध ठेऊन राज्याची बदनामी केली आहे.
नवाब मलिक यांचा प्रतिकरात्मक पुतळा ही जाळण्यात आला आहे. तर दुसरी पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार ही दाखल केली आहे. आमदार कृष्णा खोपडे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की मघील दोन वर्षात खूप घोटाळे झाले आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निर्लज्ज आहेत. या शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यावर टिका केली. या आंदोलनात भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यासही आंदोलनात सहभागी झाले होते. नवाब मलिक यांचे संबंध आतंकवाद्यांशी असल्याचे दिसत आहे. शिवाय मुंबई बाँबस्फोटाच्या आरोपींशी त्यांचे संबंध जोडले गेल्याचा आरोप व्यास यांनी केला.
[read_also content=”कर्मचाऱ्यासोबतचा वाद HR च्या अंगलट! रस्त्यात अडवून निर्माण केली दहशत, सहा जणांना अटक https://www.navarashtra.com/pune/paschim-maharashtra/pune/hr-car-vandalize-stone-pelting-after-fight-six-arrested-in-pune-245593.html”]