नागपूरमध्ये मोठा अपघात; सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांची बस उलटली
नागपूरमध्ये आज मोठा अपघात घडला आहे. विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन निघालेल्या बसचा अपघात झाला असून देवळी पेंढरी घाटात ही बस उलटली आहे. नागपुरात सहलीसाठी निघालेल्या बसला देवळी पेंढरी घाटात अपघात झाला. या अपघातात एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. निर्वाणी शिवानंद बागडे असे मृत मुलीचं नाव आहे. ती दहाव्या वर्गात शिकत असल्याची माहिती हाती आली आहे.
नागपुरातील सरस्वती हायस्कूलच्या सहलीतील वाहनाचा एक दुर्दैवी अपघात झाला. त्यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, हे अतिशय दुःखद आहे. त्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या अपघातात काही विद्यार्थी जखमी झाले, त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर एम्स रुग्णालयात उपचार… — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 26, 2024
अपघातात दोन विद्यार्थिनींना गंभीर जखमी झाल्या आहेत. सात ते आठ विद्यार्थीही जखमी झाले आहेत. दोन विद्यार्थीनींवर नागपूर एम्ससह वे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित विद्यार्थ्यांना किरकोळ स्वरूपाची जखम असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुर सरस्वती विद्या मंदिरचे ४७ विद्यार्थी आणि शिक्षक एका बसने सहलीसाठी निघाले होते. यादरम्यान देवळी पेंढरी घाटात बस आल्यानंतर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस घाटातचं उलटली. यात एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. इतर विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
नागपुरातील सरस्वती हायस्कूलच्या सहलीतील वाहनाचा एक दुर्दैवी अपघात झाला. त्यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, हे अतिशय दुःखद आहे. त्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात काही विद्यार्थी जखमी झाले, त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर एम्स रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांना सर्वतोपरी मदत जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. स्वतः जिल्हाधिकारी यांनी एम्समध्ये भेट देऊन पालकांशी संवाद साधला. मी सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे.