वसई किल्ल्यात अघोरी कृत्य, मुलीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या पिता पुजारी, मुलाला अटक
नांदेडमध्ये एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. एका तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली, मात्र, तरुण मुलाने असं आयुष्य संपलल्याने वडिलांना धक्का बसला आणि ते या धक्क्यातून सावरू शकले नाहीत. त्यांचाही मृत्यू झाला. मात्र मुलगा आणि पतीच्या मृत्यूने आईलाही हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, धायरीतील घटना; चालकावर गुन्हा दाखल
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सावरगाव नसरत गावात ही घटना घडली. अवघ्या 27 वर्षाच्या तरुण शेतकऱ्याने कर्ज आणि नापिकीला कंटाळून मृत्युला कवटाळलं. वडील भीमराव बेदरे यांची साडेतीन एकर कोरडवाहू शेती होती, या शेतीवर भारतीय स्टेट बँकेचं कर्ज होतं. त्यातच बेदरे आजारपणामुले अंथरुणाला खिळले होते. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी घरातील कर्त्या मुलगा म्हणजेच राहुलवर आली.
राहुल शेती सांभाळून आणि मिळेल ती मजुरी करुन आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करत होता. पण, शेतीतील नापिकी आणि कर्ज फेडता येत नव्हतं आणि वडिलांचे आजारपणामुळे त्यालाही नैराश्याने गाठलं. 10 जून रोजी याच नैराश्यातून त्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. वडिलांना याचा जबर धक्का बसला आणि अवघ्या दोनच दिवसात त्यांनीही प्राण सोडले. कुटुंबावर कोसलळलं. मुलगा आणि पतीच्या मृत्युच्या घटनेनंतर आई शोभाबाई यांनाही हृदयविकाराचा झटका आला. सुदैवाने त्या या धक्क्यातून सावरल्या असून त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे, पण घरात दु:खाचा डोंगर असताना त्या रुग्णालयात मृ्त्युशी झुंज देत होत्या.
ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाची आत्महत्या; लॉजमध्ये गळफास घेऊन संपवले जीवन
सावरगाव परिसरातील सर्व शेती कोरडवाहू असून सिंचनाची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे इथला शेतकरी नेहमीच अडचणीत असतो. त्यातूनच बेदरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. सरकारने बेदरे कुटुंबाला आर्थिक मदत करावी, तसंच या परिसरातील सिंचनाचा प्रश्न सोडवावा. गावापासून जवळ असलेल्या धोंड प्रकल्पातून पाण्याची सोय करावी,अशी मागणी ग्रामस्थांनी सरकारकडे केली आहे.