मुंबई : एनसीबी (NCB) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. एनसीबीकडून चार जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. एकूण ४ कोटी रुपयांचा १९० किलो गांजा (NCB Seized 190 kg Ganja) एनसीबीकडून जप्त करण्यात आला आहे. छाप्यादरम्यान पोलिसांनी आंतरराज्य अंमली पदार्थांच्या तस्करीच्या रॅकेटच्या पुरवठ्यासाठी वापरल्या जाणार्या दोन कारही जप्त केल्या आहेत. चारही आरोपी मुंबईचे रहिवासी आहेत. गेल्या पाच वर्षांपासून मुंबईत विविध ठिकाणी ते गांजाचा पुरवठा करत होते.
[read_also content=”आरेसाठी पर्यावरणप्रेमी आक्रमक, वनशक्ती संस्थेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल https://www.navarashtra.com/maharashtra/now-areay-carshed-case-gone-to-supreme-court-hearing-tomorrow-309156.html”]
ओडिसातून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी गुप्तचर यंत्रणांशी संपर्क साधला. आरोपी पडघा, भिवंडी, ठाणे या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपींना टोल प्लाझावर अडवले. त्यानंतर त्यांच्या वाहनांची चौकशी केली. त्यानंतर गाडीमध्ये १९० किलो गांजा जप्त करण्यात आला. या व्यक्तींची चौकशी केल्यावर तस्करी करत असल्याची कबूली त्यांनी दिली.
आरोपी गेल्या पाच वर्षांपासून अवैध अंमली पदार्थांच्या तस्करी व्यवसायात आहेत. गांजा लागवडीचे केंद्र असलेल्या आंध्र प्रदेश-ओडिशा भागातून गांजा मुंबईत आणला जात असल्याची माहिती मिळाली आहे.