राहुल लेकावळे यांचे स्थानिक नेत्यावर आरोप (संग्रहित फोटो)
कापूरहोळ : माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून सुसज्ज ग्रामसचिवालयाचे काम सुरू आहे. आमच्या काळात दोन वर्षांपूर्वी भूमिपूजन झालेल्या तलाठी कार्यालयाचे श्रेय भोर तालुक्यातील स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. वास्तविक, ते कोणत्या आधारावर श्रेय घेत आहे, याचा खुलासा करावा, अशी मागणी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य राहुल लेकावळे यांनी केला आहे.
गुंजवणी खोऱ्यातील विकासकामांचे भूमिपूजन आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पत्रकामध्ये मोहरी बुद्रुक ( ता. भोर ) येथे तलाठी कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आल्याचे नमूद केले होते. या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल लेकावळे यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर टीका करत आमदार शंकर मांडेकर यांना अंधारात ठेवून कोणत्याही प्रकारचं भूमिपूजन न करता केवळ गुंजवणी खोऱ्यातील नेते राजकारण करत असल्याचे टीका केली.
हेदेखील वाचा : Muralidhar Mohol यांच्याविरुद्ध पुण्यातील विरोधक एकटवले; धंगेकरापाठोपाठ आता वसंत मोरंनी देखील…
राहुल लेकावळे यांनी माहिती देताना सांगितले की, माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा केल्याने तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासकीय इमारतीसाठी निधी मंजूर केला आहे. सध्या काम प्रगतीपथावर असताना काही महाभागांनी सत्तेत असलेले आमदार शंकर मांडेकर यांना घेऊन तलाठी कार्यालयाचे भूमिपूजन केल्याचे गवगवा विरोधकाकडून केला जात आहे. मोघम श्रेय घेऊन नागरिकांची दिशाभूल करत आहे. विकासात राजकारण करू, असे देखील लेकावळे यांनी नमूद केले आहे.