सिंधुदुर्ग : खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्यायालयाने शुक्रवारी भाजप आमदार नितेश राणे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. मात्र, छातीत दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.
सिंधुदुर्ग न्यायालयाने शुक्रवारी भाजपचे आमदार नितेश राणे आणि त्यांचे सहकारी राकेश परब यांना त्यांच्यासह इतरांविरुद्ध दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णालयात पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने आमदार नितेश राणे यांना पुढील उपचारांसाठी इतरत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना कोल्हापूरला नेण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे.
[read_also content=”मोफत LPG सिलेंडर हवाय, पेटीएमने आणलीये खास संधी! फायदा कसा घ्यावा ते जाणून घ्या सविस्तर https://www.navarashtra.com/technology/how-to-book-for-free-lpg-cylinder-on-paytm-nrvb-232986.html”]
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याशी संबंधित प्रकरणी नितेश राणे यांना अटक करण्यात आली आहे.
१०८ रूग्णवाहिका सज्ज असून रूग्णालयाच्या आवारात उभी करण्यात आली आहे. आमदार नितेश राणे यांच्या छातीत दुखत असल्याने व त्यांना थोडाफार त्रास होत असल्याने त्यांना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालय सीपीआर येथे पाठविणार असल्याची माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली.
नितेश राणे यांच्या छातीत दुखत असल्याने कोल्हापूरला हलविण्यात येत आहे. काल रात्री नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडीत झाल्यानंतर त्यांना कणकवलीहून ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल केल होतं