८ वर्षांत ६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारची विधानसभेत कबुली
विधानसभेमध्ये लेखी उत्तरामधून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही स्पष्ट कबुली दिली. अंमलबजावणीसाठी ५.९७५.५१ कोटींची गरजः शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी गुरुवारी तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावेळी लेखी उत्तरामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही आकडेवारी सादर केली. उच्च न्यायालयाने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान शेतकरी योजनेतून पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशालाच हरताळ फासला असल्याचे चित्र आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ५,९७५.५१ कोटी रुपयांची गरज आहे.
दुसरीकडे, ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तब्बल एक अब्ज रुपयांची मदत जमा झाली. मात्र, राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केवळ ७५ हजार रुपये मिळाल्याची धक्कादायक माहिती आरटीआयमधून समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते वैभव कोकाट यांनी आरटीआय टाकून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये जमा झालेली रक्कम आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष झालेली मदत या संदर्भात विचारणा केली होती. यामधून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. (Farmer Loan Waiver)
Mumbai Missing Girl: मुंबईला कोणाची नजर लागली? 268 मुली गायब, तर 82 मुले बेपत्ता, मुलींची धक्कादायक
दरम्यान, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे मदत पॅकेज मोठ्या अपेक्षेने जाहीर झाले. मात्र, या मदतयोजनेतील लाभ प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचताना सुद्धा गंभीर तांत्रिक अडथळे उभे राहिल्याचे समोर आले आहे. ई-केवायसी पूर्ण नसणे, बँक व आधार माहितीतील तफावत, तसेच पोर्टलवरील तांत्रिक त्रुटींमुळे तब्बल ५ लाख ४२ हजार १४१ शेतकऱ्यांना घोषित मदत मिळालेली नाही. परिणामी या शेतकऱ्यांच्या नावावरची एकूण ३५५ कोटी ५५ लाख रुपयांची रक्कम तिजोरीतच पडून आहे.
७५,००० रुपयांचीच मिळाली शेतकऱ्यांना मदत
१ अब्ज रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीत जमा






