अनेक भागांत मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात; भंडाऱ्यात केवळ 'इतके' विद्यार्थी शाळाबाह्य (संग्रहित फोटो)
No Uniform School : वडगाव मावळ : सतिश गाडे : शालेय शिक्षण घेताना नवीन वर्षी नवी पुस्तके, गणवेश घेणे याची प्रत्येक विद्यार्थ्याला उत्सुकता असते. मात्र शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात मात्र विद्यार्थ्यांना भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे. शालेय शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन तब्बल दीड महिनाहून अधिक काळ उलटला आहे. मात्र तरी देखील मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि नगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना अजूनही शालेय गणवेश प्राप्त झालेले नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांना जुने किंवा फाटलेले कपडे घालूनच शाळेत जावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
प्रशासनाच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये नाराजीचा वातावरण आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि नगरपालिका मिळून एकूण 292 शाळा कार्यरत आहेत. यामध्ये तब्बल 19 हजार 636 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शासनमार्फत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येतो. मात्र यंदाच्या वर्षी अद्याप कोणताही शाळेमध्ये गणवेश वितरण झाल्याचे चित्र दिसत नाही.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अनेक शाळांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजूत काढत जुने गणवेश किंवा सिव्हिल ड्रेस परिधान करून येण्यास सांगितले आहे. गणवेश खरेदी टेंडर प्रक्रिया, शिवणकाम आणि वितरणासाठी लागणाऱ्या वेळेचा प्रशासनाकडून चुकीचा अंदाज घेतला गेला आहे असे तो बोलले जात आहे. एप्रिल – मे महिन्यात टेंडर प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र यंदा ही प्रक्रिया जुनअखेरपर्यंत ही पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे शिवणकाम, साठवणूक आणि वितरणाच्या टप्प्यात विलंब झाला असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. मात्र प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा थेट परिणाम विद्यार्थी आणि पालकांवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे
गणवेश वेळेवर मिळणार नाही हे माहीत असूनही प्रशासनाला या विषयाचे कोणत्याही प्रकारचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही. गरीब कुटुंबातील मुलांना नवीन कपडे घेणं शक्य नाही. शासनाचे पैसे खर्च होऊनही त्याचा लाभ वेळेवर न मिळाल्यास त्याचा उपयोग काय असा सवाल विद्यार्थी व पालक करत आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याबाबत शिक्षकांमध्येही उदासीनता दिसून येते आहे. विद्यार्थ्यांच्या मनोबलावर याचा परिणाम होतोय एका वर्गातील काहींना जुन्या गणवेशा तर काहींना सिविल ड्रेसमध्ये पाहून विद्यार्थ्यांमध्ये संकोच आणि असमाधान वाढते, अशी खंत अनेक मुख्याध्यापकांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमुळे दरवर्षीच विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप पालक वर्गातून होत आहे. याबाबत मावळ तालुका शिक्षण विभागाकडून लवकरच गणवेश वितरण सुरू होईल अशी माहिती दिली जात आहे