महादेवीबरोबरच आणखी तीन मठाधीपतींना नोटीस
कोल्हापूर : बेळगाव जिल्ह्यातील शेडवाळ येथील श्री शांतीसागर दिगंबर जैन आश्रम, श्री करे सिद्धेश्वर मठ, अलखनऊ तालुका रायबाग, गुरु महानतेश्वर स्वामी मंदिर बिछले जिल्हा रायचूर यांच्याकडे असलेल्या हत्तीबाबत वनताराने नोटीस बजावली आहे. तेथील तीन हत्तींची हालचाल होत असल्याचे कर्नाटक विभागाचे मत आहे. याप्रकरणी पर्यावरण कार्यकर्ते जी. आर. गोविंद यांनी २०२५ मध्ये न्यायालयात याचिका दाखल केली होती. या हत्तीच्या सुटकेसाठी त्यांनी मागणी केली होती.
कर्नाटक उच्च न्यायालयाने प्रतिवादींना 4 ऑगस्ट २०२५ पर्यंत हजर राहण्याची अथवा वकीलामार्फत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. या याचिकेत त्यांनी म्हटले की, हत्ती ध्रुवने २३ डिसेंबर २०२४ रोजी आपल्या महाताचा जीव घेतल्याची माहिती याचिकेत दिली आहे. ध्रुवला मानसिक आणि शारीरिक हालचाल एकांतास त्रास होत आहे. यामुळे या हत्तींना मुक्त अधिवासात सोडावे, असे याचिकेकर्त्यांनी नमूद केले आहे.
कित्तूर आणि चमन्ना प्राणी संग्रहालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी २१ जून २०२४ रोजी कर्नाटक वनविभागाला पत्र पाठवून पद्मा, ध्रुव, आणि उमा बेडक्याळ, जिल्हा बेळगाव हत्तीच्या गंभीर अवस्थेबाबत सांगितले होते. त्यानंतर काही महिन्यात उमा हत्तीचा मृत्यू झाला. परंतु, या पत्राचे प्रशासनावर दखल घेतली गेली नाही. याचिकाकर्त्यांनी जी. आर. गोविंद पर्यावरण तज्ञ आणि हत्ती संवर्धन कार्यकर्ते आहेत, त्यांनी देशभरात अनेक मंदिरे मठ आणि प्राणी संग्रहालयामध्ये कैदेत असलेल्या हत्तींच्या पुनर्वसनासाठी काम केले आहे.
याचिकाकर्त्यांनी शेडबाळची राजणीबाई उर्फ पद्मा हत्तीण, अलखनूरची ध्रुव हत्ती, अलकनूरची मेणका या हत्तीची हाल होत आहेत. संबंधित हत्तीची सुटका करून त्यांना बंगलोर येथील बाणेरघट्टी हत्ती पुनर्वसन केंद्रात हलवण्याची मागणी केली. हत्ती पद्माला पंधरा तासाने अधिक काळ बंदिस्त जागेत बांधली जात आहे. मिरवणुकीत कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता मानवी वस्तीत फिरवली जात आहे. त्या साखळ दंडाने बांधल्याने तिच्या पायाला जखमा झाल्याचे याचिकेत नमूद केले आहे.
ध्रुव नावाच्या हत्तीला जखमा झाल्या आहेत, त्याला आजार होण्याची शक्यता आहे. हत्ती नखाला बांधण्यात आलेल्या साखळ्यांमध्ये खिळे लावले गेले आहेत हे खिळे सतत तिच्या त्वचेला टोचत असल्यामुळे तिला प्रचंड वेदना होत असल्याचे फोटो जोडले आहेत.