होन्याळीच्या प्राथमिक शाळेत पहिलीत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या घरफाळा माफीचा निर्णय
वर्धा : शालेय शिक्षण विभागाच्या वतीने 100 शाळांना भेटी देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी नवीन शैक्षणिक वर्षात शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांची उपस्थिती, शाळेचे कामकाज, शैक्षणिक गुणवत्ता, सोयी-सुविधा यांची तपासणी करणार आहेत. या माध्यमातून शाळांची एकप्रकारे झाडाझडतीच होणार आहे.
मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच सर्व अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्याच्या पहिल्या दिवशी त्यांच्या मतदारसंघातील किंवा नजीकच्या किमान एका शाळेमध्ये भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. समाज, पालक यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक करणे व बालकांना आत्मविश्वासपूर्वक व्यक्त होणे तसेच दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे यासाठीच शाळांना भेटी देण्याचा उपक्रम राबविण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीतील निर्देशांच्या अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री ते जिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या अधिनस्थ विविध विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच जिल्हा स्तरावरील अन्य शासकीय यंत्रणेत कार्यरत वर्ग 1 व वर्ग 2 चे अधिकारी यांनी जिल्ह्यातील 100 शाळांना भेट देण्याचे नियोजन करावे लागेल, असे शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव विजय भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
शाळेस भेट देत असताना लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी भौतिक सुविधेचा दर्जा, विद्यार्थ्यांच्या खेळाच्या सुविधेचा दर्जा, शाळेतील पूरक व्यवस्था, शालेय व्यवस्थेचा दर्जा, विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या सवयी, शालेय पोषण आहार या सारख्या विविध विषयाबद्दल मार्गदशन करावे लागणार आहे.
धोकादायक बांधकामे, वापराअभावी, पाण्याअभावी बंद असलेली शौचालये या सारख्या मुलभूत समस्या आढळून आल्यास संबंधित यंत्रणेस तत्काळ आवश्यक पावले उचलण्याबाबत ठोस सूचनाही देणे आवश्यक आहे.