मंचरमध्ये भीषण अपघात (फोटो- टीम नवराष्ट्र)
मंचर येथील दोन क्रेनच्या साह्याने डंपर बाजूला काढण्यात आला असून जखमी रूपेश इंदोरे व शेख नवाब यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय मंचर या ठिकाणी उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघातातील मयत अजय राजू मिर हे नागापूर ता. आंबेगाव या ठिकाणी राहत असून लाल गायांचा व्यवसाय करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात . तसेच ड्रायव्हिंगचे कामही ते करत होते.या तरुणाचे मागे आई, वडील, दोन भाऊ, दोन बहिणी, पत्नी असा परिवार असून महिन्याभरापूर्वीच त्याच्या मुळ गावी त्याचा विवाह झाला होता. त्याच्या अपघाती निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.