कल्याणमधील स्थानिक आणि तळागाळातील खेळाडूंना वाव मिळण्यासाठी आयोजित नमो चषक स्पर्धेला कल्याण पश्चिम मतदारसंघातून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल 30 हजार खेळाडू सहभागी झाले आहे. ही नक्कीच अभिमानास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील हे म्हंटले आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिमेत नमो चषक अंतर्गत कबड्डी स्पर्धेला केंद्रीय मंत्री कपिल पाटील उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात नमो चषक 2024 अंतर्गत विविध स्पर्धा खेळवल्या जात आहेत. या स्पर्धेमध्ये तब्बल 30 हजार इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झाले आहेत. माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून अतिशय भव्य स्वरूपात या स्पर्धा होत असून त्यामध्ये नक्कीच उद्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील असा विश्वासही केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे सह-कार्यालय मंत्री भरत राऊत यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघ आणि उत्कृष्ट खेळाडूंचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
आतापर्यत चित्रकला, बुद्धीबळ, फुटबॉल, क्रिकेट, कुस्ती, 100 /400 मीटर धावणे, बॅडमिंटन, एकांकिका, वक्तृत्व, नृत्य, कबड्डी आदी स्पर्धा संपन्न झाल्या आहेत. तर पुढील दिवसांत व्हॉलीबॉल, कॅरम, रस्सीखेच, गायन या स्पर्धाही घेण्यात येणार आहेत. ज्याला आधी झालेल्या स्पर्धांइतकाच मोठा प्रतिसाद मिळत आहे.
खोखो पाठोपाठ कबड्डीतही नरेंद्र पवार यांनी दाखवले प्राविण्य…
काही दिवसांपूर्वी नमो चषकात झालेल्या खो-खो स्पर्धेमध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या खोखोपटूचे प्रदर्शन घडवले होते. राजकरणात एक कसलेला खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवलेल्या माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कालच्या कबड्डी स्पर्धेतही आपल्यातील कबड्डीपटूचे कौशल्य दाखवून दिले. प्रतिस्पर्धी संघावर चढाई करत अतिशय चपळपणे एक गडी बाद करत पवार यांनी आपले कौशल्य सिद्ध केले.
यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस निखील चव्हाण, महीला मोर्चा प्रदेश सचिव प्रिया शर्मा, कल्याण शहर मंडल अध्यक्ष वरूण पाटील, कल्याण जिल्हा सरचिटणीस अमित धाक्रस, प्रेमनाथ म्हात्रे, ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख राजाभाऊ पातकर, कल्याण पश्चिम विधानसभा संयोजक अर्जून म्हात्रे, मा.नगरसेवक अर्जून भोईर, उपाध्यक्ष अनिल चौधरी, स्वप्निल काठे, कबड्डी स्पर्धेचे प्रमूख प्रताप टूमकर, सदा कोकणे, प्रदेश अनुसूचित मोर्चा उपाध्यक्ष डॉ. राजु राम, कल्याण जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस संदीप पाटील, गौरव गुजर, क्रीडा संयोजक संजय कारभारी, व्यापारी आघाडी अध्यक्ष रवी गुप्ता, उमेश पिसाळ, विनोद मुथा, राजेश ठाणगे, लिगल सेल उपाध्यक्ष ऍड.समृध्द ताडमारे, महेंद्र मिरजकर, समृध्दी देशपांडे, स्नेहल सोपरकर, दिपा शाह, जनार्दन कारभारी, मिलींद सिंह, अनंता पाटील, अभिमन्यू पाटील, ठाणे जिल्हा कबड्डी असोशियनचे सर्व पंच, शाळेचे व इतर कबड्डी खेळाडू, संघ व्यवस्थापक, क्रीडा शिक्षक व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.